फोटो सौजन्य: Social Media
भारतीय ऑटोमोबाईल क्षेत्रात रोज नवनवीन कार्स लाँच होत आहे. आता याला अधिकच जोर येणार आहे, याचे कारण म्हणजे आता सणासुदीचा काळ समीप आला आहे. या सणासुदीच्या काळात अनेक जण आपल्याला नवीन गोष्टी खरेदी करताना दिसतात. तर कित्येक जण नवीन कार विकत घेताना दिसतात. अशावेळी जर तुम्ही सुद्धा नवीन कार घेण्याच्या विचारात असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे.
SUV सोबत, MPV सेगमेंटमधील वाहनांची मागणी देखील भारतीय बाजारपेठेत सातत्याने वाढताना दिसत आहे. हे लक्षात घेऊन किया सणासुदीच्या काळात दोन नवीन कार लाँच करण्याच्या तयारीत आहे. चला या नवीन कार आणि त्यांच्या किंमतीबद्दल जाणून घेऊया.
Kia Carnival MPV येत्या 3 ऑक्टोबरला सहा आणि सात सीट पर्यायांसह लाँच होईल. या कारची नवीन जनरेशन भारतीय बाजारपेठेत आणली जाणार आहे. यापूर्वी, कंपनी कार्निव्हलची जुनी जनरेशन भारतात विक्रीसाठी उपलब्ध करून देत होती, जी 2023 च्या मध्यात बंद करण्यात आली होती.
Kia Carnival सोबतच कंपनी 3 ऑक्टोबरला आणखी एक कार लाँच करणार आहे. Kia EV9 सहा आणि सात सीट पर्यायांसह लाँच होणार आहे, जी एक इलेक्ट्रिक कार असणार आहे. यामध्ये अनेक उत्कृष्ट फीचर्स देखील देण्यात येणार आहेत. तसेच, हे प्रीमियम इलेक्ट्रिक एसयूव्ही सेगमेंटमध्ये लाँच केले जाईल. कंपनी ते CBU म्हणून भारतात आणणार आहे.
या दोन्ही कारच्या किमतींची माहिती कंपनीकडून लाँचच्या वेळीच दिली जाईल. परंतु नवीन जनरेशन किया कार्निव्हलची एक्स-शोरूम किंमत सुमारे 50 लाख रुपये असू शकते अशी अपेक्षा आहे. तर लाँचच्या वेळी, Kia EV9 इलेक्ट्रिक SUV ची अपेक्षित किंमत सुमारे 80 लाख रुपये असू शकते.
Kia ने Kia Sonet ही भारतीय बाजारपेठेत सर्वात स्वस्त कार म्हणून ऑफर केली आहे. यानंतर, Kia Seltos मध्यम आकाराच्या SUV सेगमेंटमध्ये विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. बजेट MPV सेगमेंटमध्ये Kia Carens तर Kia EV6 प्रीमियम EV म्हणून विकली जात आहे.