फोटो सौजन्य- सोशल मीडिया
रॉयल एनफिल्डच्या ( Royal Enfield) बाईकचा वेगळाच करिष्मा आहे. ही कंपनी भारतात मध्यम वजनाच्या बाईक्स बनवत असली तरी काळाप्रमाणे होणाऱ्या बदलाचा विचार करत कंपनी स्वच्छ इंधनावर (क्लीन एनर्जी) चालणाऱ्या बाइक्सही तयार करत आहे. रॉयल एनफिल्डकडून हल्लीच एक टीझर जारी करण्यात आला आहे. जो टीझर कंपनीच्या पहिल्या इलेक्ट्रिक बाइकचा अधिकृत टीझर असून ज्यामध्ये 4 नोव्हेंबर 2024 ही तारीख राखून ठेवण्याची माहिती देण्यात आली आहे. सोशल मीडियावर याबाबत माहिती मिळणार आहे. या इलेक्ट्रीक बाईकसाठी कंपनी दोन वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर काम करत आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे कंपनीने बाईकच्या साऊंड इफेक्टबद्दल माहिती दिली आहे. जाणून घेऊया त्याबद्दल
बाईकच्या साऊंड इफेक्टचे काय ?
रॉयल एनफिल्डच्या पेट्रोल बाईक या त्यांच्या आवाजाकरिता प्रसिध्द आहेत. तो आवाज त्यांचा सिगनेचर आवाज आहे. मात्र इलेक्ट्रिक बाइक ही आवाज करणारी नसणार आहे. कंपनीने स्पष्ट केले आहे की, येणाऱ्या इलेक्ट्रिक बाइक्समध्ये साउंड इफेक्टसाठी स्पीकर वापरणार नाहीत, कारण ते बनावट दिसतील. पेट्रोल इंजिनमध्ये बाईकचा साऊंड इफेक्ट येतो. मात्र त्याची प्रतिकृती इलेक्ट्रिक बाईकमध्ये करणे शक्य नाही.
दोन प्लॅटफॉर्मवर निर्मितीचे काम
रॉयल एनफिल्डकडून इलेक्ट्रिक बाईक्स साठी दोन वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर काम केले जात आहे. यापैकी एक प्लॅटफॉर्म कंपनीमध्येच विकसित केले जात आहे, तर दुसरे प्लॅटफॉर्म हे युरोपियन स्टार्टअप कंपनी स्टार्क फ्यूचरच्या सहकार्याने विकसित केले जात आहे. 2022 मध्ये, Royal Enfield ने Stark Future स्टार्टअप मधील 10.35% स्टेक विकत घेतला, जो 50 दशलक्ष युरो म्हणजेच भारतीय रुपयांप्रमाणे अंदाजे 439 कोटी रुपयांचा होता. संशोधन आणि विकास, तांत्रिक परवाना आणि उत्पादन यामध्ये सहकार्य करणे हा या भागीदारीचा मुख्य उद्देश आहे.
2025 मध्ये बाईक होणार लॉंच
मात्र, कंपनी नवी इलेक्ट्रीक बाईक त्वरीत लॉंच करणार नाही. रॉयल एनफिल्डला इलेक्ट्रिक वाहन सेगमेंटने उत्साही रायडर्समध्ये योग्य आकर्षण निर्माण करायचे आहे. त्यामुळे कंपनी लॉंचिगसाठी अत्यंत विचारपूर्वक पावले टाकत आहे. रॉयल एनफिल्डचे पहिली इलेक्ट्रिक बाईक मॉडेल 2025 मध्ये लॉन्च केली जाण्याची अपेक्षा आहे. ज्याप्रमाणे सध्याच्या पेट्रोल इंजिन श्रेणीमध्ये कंपनीच्या अनेक मॉडेल्स आहेत त्याचप्रमाणे भविष्यात इलेक्ट्रिक बाइक्सच्या संपूर्ण श्रेणी देखील रॉयल एनफिल्डकडून सादर केली जाईल.