फोटो सौजन्य: Social Media
सध्या देशभरात अनेक कार्स लाँच होत आहे. यामध्ये अनेक कंपनीजच्या कार्स उपलब्ध आहे. प्रत्येक ऑटो कंपनीज आपल्या ग्राहकांसाठी विशेष फीचर्स असणाऱ्या कार्स उपलब्ध करून देते. नुकतेच Nissan Motor India ने भारतात आपल्या Nissan Magnite चा फेसलिफ्ट व्हर्जन लाँच केले आहे. ही SUV खरेदी करण्यासाठी सगळ्यांनाच वेड लागले आहे. ही SUV भारतात 5.99 लाख रुपयांमध्ये लाँच करण्यात आली आहे.
ज्या किंमतीत या कारमध्ये लाँच केले गेले आहे, त्यात आपल्याला मजबूत हँडलिंग ऑफर करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले आहेत. ही कार पटकन पिकअप उचलते आणि उत्कृष्ट नियंत्रण देते. यामुळे या कारची सुरक्षितता वाढते आणि रहदारीच्या परिस्थितीतही ते सहज हाताळता येते.
सामान्यतः लोक प्रश्न विचारतात की स्वस्त वाहनांमध्ये केबिनचा आवाज आणि व्हायब्रेशन खूप जास्त आहे, परंतु या कारमध्ये ही समस्या जाणवणार नाही. या कारच्या केबिनमध्ये तुम्हाला खूप कमी आवाज आणि व्हायब्रेशन पाहायला मिळते. यामुळे तुमचा ड्रायव्हिंग अनुभव अधिक चांगला होतो.
कम्फर्टच्या बाबतीत कंपनीने या कारमध्ये कुठलीही तडजोड केली नाही आहे, रस्ता कोणताही असो, आरामाच्या बाबतीत ही कार तुम्हाला निराश करणार नाही.
या कारमध्ये 1.0-लिटर NA पेट्रोल इंजिन आहे जे 71 एचपी पॉवर आणि 96 एनएम पीक टॉर्क जनरेट करते. त्याचा दुसरा इंजिन पर्याय 1.0-लिटर टर्बो-पेट्रोल युनिट आहे जो 99 hp पॉवर आणि 160 Nm पर्यंत पीक टॉर्क जनरेट करतो. या कारचे ट्रान्समिशन देखील असेच ठेवले आहे ज्यामध्ये 5-स्पीड मॅन्युअल, 5-स्पीड AMT आणि CVT उपलब्ध आहेत.
ग्राहकांना मॅग्नाइटमध्ये ब्लॅक-अँड-ऑरेंज थीम अपहोल्स्ट्री मिळते, त्यासोबत 7-इंचाचा डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले मिळतो. या SUV मध्ये ग्राहकांना इंटिरिअरसाठी गडद थीम, सभोवतालची लाइटिंग आणि चार कलरमध्ये आर्मरेस्ट मिळतात.
कुठल्याही कारमधील सेफ्टी फीचर्स खुप महत्वाचे असतात. या कारच्या सेफ्टी फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर ग्राहकांना 6 एअरबॅग सेटअप, EBD सह ABS, ट्रॅक्शन कंट्रोल आणि टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम (TPMS) पाहायला मिळतात.