फोटो सौजन्य- iStock
आज कारमध्ये सुरक्षिततेच्यादृष्टीने अनेक बदल केले जात आहेत. असंख्य लोक आजच्या काळात बुलेटप्रुफ कारला पसंती देत आहेत. मात्र तुम्हाला हे माहित आहे का? की भारतामध्ये मोठ्याप्रमाणात ग्राहकांची पसंती असलेल्या कारपैकी एक असलेल्या अल्टोसारख्या लहान कारनाही बुलेटप्रुफ बनवले जाऊ शकते. अल्टोसारख्या कारना बुलेटप्रुफ बनविण्यासाठी मोठी प्रक्रिया करावी लागते. . बुलेटप्रूफिंग म्हणजे बुलेटपासून संरक्षण देण्यासाठी कारमध्ये अनेक बदल करावे लागतात तसेच त्यासाठी बुलेटप्रूफ ग्लास, रिनफोर्स्ड बॉडी पॅनेल आणि टायर यांसारख्या विविध सुरक्षा उपायांचीही आवश्यकता असते. जाणून घेऊया बुलेटप्रुफिंगची प्रक्रिया
बुलेटप्रुफिंगचा खर्च:
कारच्या बुलेटप्रूफिंगची किंमत अनेक घटकांवर अवलंबून असते, जसे की आवश्यक संरक्षण पातळी व्यावसायिक दर्जा, किंवा उच्च सुरक्षा स्तर इत्यादीं सामान्यत: बुलेटप्रूफिंगसाठी खालील खर्च येऊ शकतो:
बुलेटप्रूफ ग्लाससाठी 3 लाख ते 6 लाख रुपयांपर्यंत खर्च येऊ शकतो. ग्लास लावण्यासाठी कारच्या खिडक्यांमध्ये मोठे बदल करावे लागतील.
बॉडी आर्मरिंग स्टील प्लेट्ससाठी 6 लाख ते 10 लाख रुपये खर्च, कारच्या पूर्ण बॉडीमध्ये स्टील किंवा इतर मजबूत सामग्री स्थापित करणे आवश्यक असते.
सस्पेंशन प्रणाली मजबूत करण्यासाठी 1 लाख ते 2 लाख रुपये खर्च
त्याशिवाय इंजिन अपग्रेड करणे टायर बुलेटप्रूफ बसवणे याकरिताही खर्च येऊ शकतो.
त्यामुळे अल्टोला बुलेटप्रूफ बनवण्याचा प्रयत्न केल्यास, साधारणत: किंमत 12 ते 20 लाख रुपयांपर्यंत खर्च येऊ शकतो. हा खर्च अल्टोच्या खरेदी किंमतीपेक्षा कैकपटीने जास्त आहे. मात्र ज्या व्यक्तींना आपली प्रत्येक कार बुलेटप्रुफ हवी असते त्या व्यक्ती अल्टो कारही बुलेप्रुफ करुन घेतात.
अल्टोमध्ये इतके मोठे बदल का करावे लागतात?
बॉडी स्ट्रक्चर: अल्टो सारख्या कारची रचना ही हलकी आणि पातळ स्वरुपातील असते, ज्यामुळे या कारला बुलेटप्रूफ बनवणे तसे आव्हानात्मक असते. मुख्य म्हणजे बुलेटप्रूफ सामग्रीतील घटक जसे की स्टील आणि बुलेटप्रूफ काच या जड असतात आणि कारची असणारी चेसिस अशा जड संरक्षक सामग्रीसाठी पुरेशा नसतात.
वजन: बुलेटप्रूफिंगमुळे कोणत्याही कारचे वजन लक्षणीय वाढते. अल्टो सारख्या लहान कारचे इंजिन आणि सस्पेन्शन सिस्टीम अतिरिक्त वजन नीट हाताळण्यास मजबूत नसतात. या वजनाचे योग्य व्यवस्थापन करण्यासाठी कारचे इंजिन, सस्पेंशन आणि ब्रेक सिस्टिममध्ये मोठे बदल करावे लागतात.
इंधनाचा वापर आणि कार्यक्षमता: ज्यावेळी कारचे वजन जास्त होते त्यावेळी कारच्या कार्यक्षमतेवर आणि इंधन कार्यक्षमतेवरही परिणाम होतो. त्यामुळे कारचा वेग आणि ड्रायव्हिंगवर परिणाम होऊ शकतो. कारचा वेग आणि ड्रायव्हिंग अनुभवावरही परिणाम होऊ शकतो.
बुलेटप्रुफिंगवर येणारा खर्च जास्त आहे मात्र एक नक्की ऑटोमोबाईल क्षेत्रातील मॉडिफिकेशनद्वारे अल्टोसारख्या लहान कारही बुलेटप्रूफ बनवणे तांत्रिकदृष्ट्या शक्य आहे.