भारतातील प्रत्येक पिढी त्यांच्या तरुणवयात गाड्यांचे शौकीन राहिली आहे. प्रत्येक पिढीची गाड्यांसंदर्भात एक वेगळी आवड आहे. पण, विंटेज कार्स येथे प्रत्येक पिढीची आवड आहे. भारताने गाड्यांचा वारसा जपला आहे. भारतातील काही गाड्या भारतीय संस्कृतीचा भाग बनून गेला आहे. पूर्वीच्या राजकारणी लोकांमध्ये वापरली जाणारी हिंदुस्थान एंबॅसेडर त्याकाळी एक परंपरा बनून गेली होती. जवळजवळ सगळ्याच राजकारण्यांकडे ही गाडी दिसून यायची. चला तर मग पाहुयात तरुणांच्या मनावर राज्य करणाऱ्या 'या' व्हिंटेज कार्सबद्दल.
पूर्वीच्या भारतात 'या' गाड्यांनी रस्ते गाजवले आहेत. (फोटो सौजन्य - Social Media)
ब्रिटिश मॉरिस ऑक्सफर्डवर आधारित, एंबॅसेडर भारतातील एक प्रतिष्ठेची कार आहे. पूर्वीच्या काळी, समाजात विशिष्ट मान असणारे लोकं या गाडीचा वापर करत असत.
फिएट ११०० ही गाडी तामिळनाडू आणि महाराष्ट्रात जास्त लोकप्रिय आहे. या कारने 50-60 च्या दशकात बाजार गाजवला होता.
फोर्ड मस्टँग ही क्लासिक अमेरिकन कार उच्च कार्यक्षमता आणि आकर्षक डिझाइनसाठी ओळखली जाते. आजही तरुणांमध्ये या कारसाठी वेड दिसून येतो.
बेंटली मार्क VI या ब्रिटिश लक्झरी कारला रॉयल आणि सेलेब्रिटीजमधील आवडता पर्याय मानला जातो.
रोल्स रॉयस सिल्व्हर घोस्टची विलासी रचना आणि उत्कृष्टता आजही आश्चर्यचकित करते.