Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मध्यम वर्गीय लोकांना परवडणारी कार उपलब्ध करून देणाऱ्या Osamu Suzuki यांचे निधन

सुझुकी मोटर कॉर्पोरेशनचे माजी अध्यक्ष ओसामू सुझुकी यांचे वयाच्या ९४ व्या वर्षी निधन झाले. ते 1978 ते 2021 पर्यंत कंपनीचे प्रमुख होते. चला त्यांच्याबद्दल जाणून घेऊया.

  • By मयुर नवले
Updated On: Dec 28, 2024 | 03:59 PM
फोटो सौजन्य: Social Media

फोटो सौजन्य: Social Media

Follow Us
Close
Follow Us:

देशात अनेक उत्तम अशा बेस्ट कार उत्पादक कंपन्या आहेत, ज्या बजेट फ्रेंडली कार्स बाजारात उपलब्ध करून देत असतात. यातीलच एक विश्वासाची कंपनी म्हणजे मारुती सुझुकी. या कंपनीने देशात ग्राहकांसाठी स्वस्तात मस्त अशा कार्स ऑफर केल्या आहेत. मारुती सुझुकीला भारतात मोठे करण्यात अनेक जणांचे हात आहे, त्यातीलच एक म्हणजे ओसामू सुझुकी.

ओसामू सुझुकी हे सुझुकी मोटर कॉर्पोरेशनचे एक्स चेअरमन होते. 1978 ते 2021 पर्यंत ते सुझुकी कंपनीचे अध्यक्ष आणि CEO होते. अशा या थोर व्यक्तिमत्व असणाऱ्या व्यक्तीचे बुधवारी निधन झाले.

भारतीय ऑटोमोटिव्ह उद्योगाला नवी दिशा देणारे ओसामू सुझुकी यांचे वयाच्या ९४ व्या वर्षी निधन झाले आहे. शुक्रवारी जपानच्या सुझुकी मोटर कॉर्पोरेशनने दिलेल्या माहितीनुसार, ‘लिम्फोमा’मुळे 25 डिसेंबरला त्यांचा मृत्यू झाला. 1981 मध्ये मारुती इंडस्ट्रीज लिमिटेड सोबत संयुक्त एंटरप्राइझ तयार करण्यासाठी तत्कालीन भारत सरकारसोबत भागीदारी करण्याचा धोका पत्करण्यासाठी सुझुकींना ओळखले जाते.

मुंबईच्या कोस्टल रोडवर Lamborghini ने घेतला पेट, 9 कोटी किंमतीच्या कारमध्ये सुद्धा सेफ्टी नाही का?

त्यावेळी भारत ही लायसन्स व्यवस्था अंतर्गत बंद अर्थव्यवस्था होती. म्हणूनच, सुझुकींना देशातील ऑटोमोटिव्ह उद्योगाला प्रोत्साहन देणारी आणि नवीन दिशा देणारी व्यक्ती म्हणून ओळखले जाते. जेव्हा सरकारने 2007 मध्ये सुझुकी मोटर कॉर्पोरेशनसह कंपनीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला तेव्हा मारुती उद्योग लिमिटेड, मारुती सुझुकी इंडिया लिमिटेडची स्थापना झाली. ओसामू सुझुकी हे मारुती सुझुकी इंडिया लिमिटेडचे ​​संचालक आणि अध्यक्ष होते.

मारुती सुझुकी इंडिया लिमिटेड (MSIL) चे अध्यक्ष आर. सुझुकींच्या मृत्यूबद्दल सी भार्गव म्हणाले, ” माझंही असे म्हणणे आहे की त्यांच्या दूरदृष्टी, इतर कोणीही घ्यायला तयार नसलेली जोखीम पत्करण्याची त्यांची तयारी, भारताबद्दलचे त्यांचे अगाध आणि अढळ प्रेम आणि एक शिक्षक म्हणून त्यांची प्रचंड क्षमता याशिवाय भारतीय ऑटोमोटिव्ह उद्योग आज महासत्ता बनला नसता.

जुन्या वाहनांना हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसवणे अनिवार्य; या तारखेपर्यंत ऑनलाईन नोंदणी करणे आवश्यक

ओसामू सुझुकी यांच्या निधनानंतर पीएम मोदी भावुक

यांच्या निधनावर पंतप्रधान मोदी म्हणतात,”जागतिक ऑटोमोटिव्ह उद्योगातील एक दिग्गज व्यक्तिमत्व असलेले ओसामु सुझुकी यांच्या निधनाने खूप दुःख झाले. त्यांच्या दूरदर्शी कार्याने गतिशीलतेबद्दलच्या जागतिक धारणांना आकार दिला. त्यांच्या नेतृत्वाखाली, सुझुकी मोटर कॉर्पोरेशन एक जागतिक पॉवरहाऊस बनले, आव्हानांना यशस्वीरित्या तोंड देत, नवीन इनोव्हेशन आणि विस्ताराला चालना देत आहे. त्यांना भारताबद्दल खूप प्रेम होते आणि मारुतीसोबतच्या त्यांच्या सहकार्याने भारतीय ऑटोमोबाईल बाजारपेठेत क्रांती घडवून आणली.

Deeply saddened by the passing of Mr. Osamu Suzuki, a legendary figure in the global automotive industry. His visionary work reshaped global perceptions of mobility. Under his leadership, Suzuki Motor Corporation became a global powerhouse, successfully navigating challenges,… pic.twitter.com/MjXmYaEOYA — Narendra Modi (@narendramodi) December 27, 2024

मध्यम वर्गीयांना परवडणारी कार उपलब्ध करून दिली

ओसामू सुझुकींच्या दूरदृष्टीने भारतात 1983 साली मारुती 80 लाँच झाली होती. त्यावेळी या कारची किंमत 47 हजार 500 रुपये होती, जी सर्वसामान्याना परवडणारी होती. या कारच्या निर्मिती प्रक्रियेत ओसामू सुझुकी स्वतः कार्यरत होते.

Web Title: Suzuki motor corporation ex chairman osamu suzuki passes away

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 28, 2024 | 03:59 PM

Topics:  

  • Maruti Suzuki

संबंधित बातम्या

भारतात स्वस्त तर पाकिस्तानातील किमतीने नागरिक त्रस्त! ‘या’ कारच्या किमती एकदा जाणून घ्याच
1

भारतात स्वस्त तर पाकिस्तानातील किमतीने नागरिक त्रस्त! ‘या’ कारच्या किमती एकदा जाणून घ्याच

लोकप्रिय Hyundai Creta की नवीन Maruti Victoris, कोणती मिड साइझ SUV बेस्ट?
2

लोकप्रिय Hyundai Creta की नवीन Maruti Victoris, कोणती मिड साइझ SUV बेस्ट?

Maruti Fronx Hybrid केव्हा लाँच होणार? जाणून घ्या अपेक्षित किंमत
3

Maruti Fronx Hybrid केव्हा लाँच होणार? जाणून घ्या अपेक्षित किंमत

किती वेळ OLA-Uber ने फिरणार? नवीन GST मुळे ‘ही’ कार झाली अजूनच स्वस्त, यंदाच्या दसऱ्यात खरेदी कराच
4

किती वेळ OLA-Uber ने फिरणार? नवीन GST मुळे ‘ही’ कार झाली अजूनच स्वस्त, यंदाच्या दसऱ्यात खरेदी कराच

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.