Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

टाटा मोटर्सकडून Nexon iCNG लॉंच; कारमध्ये पॅनोरामिक सनरुफ आणि ड्युअल सिलेंडर तंत्रज्ञान

टाटा मोटर्सकडून Tata Nexon iCNG कार लॉंच करण्यात आली आहे. या कारच्या लॉंचिगमुळे टाटाकडून नेक्सॉन कारच्या लाईनअपमध्ये विस्तार केला गेला आहे. जाणून घ्या या कारची वैशिष्ट्ये, किंमत

  • By नारायण परब
Updated On: Sep 24, 2024 | 05:02 PM
फोटो सौजन्य- सोशल मीडिया

फोटो सौजन्य- सोशल मीडिया

Follow Us
Close
Follow Us:

Tata Motors कडून नेक्सॉन कारची सीएनजी व्हेरियंट लॉंच करण्यात आली आहे.   नवीन CNG व्हेरियंट लाँच करून टाटाकडून नेक्सॉन लाइन अपचा भारतात विस्तार केला आहे. Tata Nexon iCNG या नवीन व्हेरियंटची भारतीय बाजारपेठेतील एक्स-शोरूम किंमत ही 8.99 लाख रुपये आहे. या कारमध्ये  पॅनोरॅमिक सनरूफ आणि ड्युअल-सिलेंडर तंत्रज्ञान तसेच तब्बल 321 लीटरची बूट स्पेस आहे. या कारसह टाटाकडून नेक्सॉन ईव्ही देखील अपडेट करण्यात आली असून त्यामध्ये रेड डार्क प्रकारही सादर करण्यात आला आहे.

टाटा नेक्सॉन iCNG कारची वैशिष्ट्ये, ड्युअल-सिलेंडर तंत्रज्ञान

Nexon iCNG SUV च्या वैशिष्टांबद्दल बोलायचे झाल्यास या कारमध्ये एक मोठा पॅनोरॅमिक सनरूफ आहे. नेव्हिगेशन डिस्प्लेसह 10.25-इंच इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, सुरक्षिततेसाठी 6 एअरबॅग्ज, ESP ( इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी प्रोग्राम)  आणि संपूर्ण श्रेणीमध्ये मानक बाबींचा समावेश आहे. सर्वात प्रमुख म्हणजे या कॉम्पॅक्ट SUV मध्ये तब्बल  321 लीटरचे बूट स्पेस आहे. याकरिता टाटा मोटर्सकडून  ड्युअल-सिलेंडर तंत्रज्ञानाचा वापर केला आहे.  कंपनीने दावा केला आहे की,  Nexon iCNG ही कार ग्राहकांना जास्त सुरक्षा, आराम आणि सुविधा देईल.

हे देखील वाचा-ऑटोमोबाईल क्षेत्रात होणार धमाका; जगातील पहिल्या फ्लाईंग कारची झाली निर्मिती, 2025 मध्ये होणार विक्री

टाटा नेक्सॉन आयसीएनजी (Tata Nexon iCNG) पॉवरट्रेन

टाटा नेक्सॉन आयसीएनजी ही कार 1.2L टर्बो-पेट्रोल इंजिनद्वारे समर्थित आहे जे 100 Hp पॉवर आउटपुट आणि 170 Nm कमाल टॉर्क देते. कारचे  टर्बो-पेट्रोल इंजिन 6-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशनसह उपलब्ध असणार आहे. नवीन टाटा नेक्सॉन आयसीएनजी ही 8 वेगवेगळ्या प्रकारांमध्ये उपलब्ध असणार आहे. या 8 प्रकारांमुळे ग्राहकांना त्यांच्या पसंतीनुसार कार खरेदी करता येईल.

टाटा नेक्सॉन रेड डार्क प्रकार

टाटा नेक्सॉनमध्ये कंपनीने रेड डार्क प्रकार सादर केला आहे. हा प्रकार हॅरियर आणि सफारी सारख्या कारमध्ये  यशस्वी झाला आहे. या प्रकारात  मानक मॉडेलच्या तुलनेत अद्ययावत इंटीरियर आहे.

हे देखील वाचा-नवरात्री अगोदर Tata Motors कडून सवलतीची घोषणा, ‘या’ कारवर मिळत आहे जबरदस्त सवलत

टाटा नेक्सॉन अपडेटेड ईव्ही (Tata Nexon EV) 

टाटा मोटर्सकडून Nexon EV ही देखील अपडेट केली आहे. या कारची एक्स-शोरूम किंमत 13.99 लाख रुपये आहे.  Tata Nexon EV मध्ये एक मोठा 45 kWh बॅटरी पॅक आहे जो 489 किमीची रेंज ऑफर करतो असा दावा कंपनीकडून करण्यात येत आहे.  मात्र या बॅटरी पॅकची रिअल-वर्ल्ड रेंज 350-370 किमीच्या रेंजमध्ये असू शकते.

Web Title: Tata motors launch nexon icng the car features a panoramic sunroof and dual cylinder technology

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 24, 2024 | 05:02 PM

Topics:  

  • tata motors

संबंधित बातम्या

2 नव्या रंगाच्या पर्यायांसह Tata Punch EV, आता मिळणार अधिक फास्ट चार्जिंग; पहा फिचर्स
1

2 नव्या रंगाच्या पर्यायांसह Tata Punch EV, आता मिळणार अधिक फास्ट चार्जिंग; पहा फिचर्स

Tata Nexon EV च्या बेस व्हेरिएंटसाठी 2 लाखांचं डाउन पेमेंट केल्यास किती असेल EMI?
2

Tata Nexon EV च्या बेस व्हेरिएंटसाठी 2 लाखांचं डाउन पेमेंट केल्यास किती असेल EMI?

Tata Tiago vs Maruti Celerio: किंमत आणि मायलेजच्या बाबतीत कोणती कार आहे वरचढ?
3

Tata Tiago vs Maruti Celerio: किंमत आणि मायलेजच्या बाबतीत कोणती कार आहे वरचढ?

ऑगस्ट 2025 मध्ये Tata Motors ‘या’ कारवर देतेय बंपर डिस्काउंट, लाखो रुपये वाचवण्याची सुवर्ण संधी
4

ऑगस्ट 2025 मध्ये Tata Motors ‘या’ कारवर देतेय बंपर डिस्काउंट, लाखो रुपये वाचवण्याची सुवर्ण संधी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.