फोटो सौजन्य: iStock
भारतात सब-4 मीटर SUV सेगमेंटला सर्वाधिक पसंती मिळते. यामुळेच अनेक ऑटो कंपन्या या सेगमेंटमध्ये नवनवीन मॉडेल्स लाँच करत असतात. ह्युंदाई व्हेन्यू आणि टाटा नेक्सॉन या दोन कार्समध्ये नेहमीच टक्कर पाहायला मिळते. जर तुम्ही या दोघांपैकी एक खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर खाली दिलेली तुलना तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकते.
टाटा नेक्सॉन हे मॉडेल डिझाइन आणि फीचर्ससाठी ओळखले जाते. यामध्ये शार्क फिन अँटेना, बाय-फंक्शन एलईडी हेडलॅम्प्स, एलईडी डीआरएल्स, रूफ रेल्स, पॅनोरॅमिक सनरूफ, 10.25 इंच इन्फोटेनमेंट सिस्टम, डिजिटल डिस्प्ले, व्हेंटिलेटेड सीट्स, एअर प्युरिफायर, 360 डिग्री कॅमेरा, क्रूझ कंट्रोल आणि वायरलेस चार्जिंगसारखी प्रीमियम फीचर्स मिळतात.
दुसरीकडे, ह्युंदाई व्हेन्यू देखील फीचर्सच्या बाबतीत मागे नाही. यात एलईडी हेडलॅम्प्स, ऑटो हेडलॅम्प, कनेक्टेड टेल लॅम्प्स, डी-कट स्टीअरिंग, अँबियंट लाइटिंग, 8 इंचाची टचस्क्रीन, वायरलेस अँड्रॉइड ऑटो आणि ॲपल कारप्ले, रिमोट इंजिन स्टार्ट आणि तीन ड्रायव्हिंग मोडस मिळतात.
टाटा नेक्सॉन पेट्रोल, डिझेल आणि सीएनजी अशा तिन्ही व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे.
1.2 L पेट्रोल: 88.2 PS / १७० Nm
1.2 L CNG: 73.5 PS
1.5 L डिझेल: 84.5 PS / 260 Nm
मॅन्युअल व ऑटोमॅटिक ट्रान्समिशन दोन्ही पर्याय उपलब्ध आहेत.
ह्युंदाई व्हेन्यूमध्ये देखील तीन इंजिन पर्याय आहेत.
1.2 L NA पेट्रोल: 83 PS / 113.8 Nm
1.0 L टर्बो पेट्रोल: 120 PS / 172 Nm
1.5 L डिझेल: 116 PS / 250 Nm
टाटा नेक्सॉनने Global NCAP कडून 5-स्टार सेफ्टी रेटिंग मिळवले आहे. यामध्ये 6 एअरबॅग्ज, ABS, EBD, हिल होल्ड, ESP, ट्रॅक्शन कंट्रोल, TPM आणि ISOFIX माउंट्स मिळतात.
ह्युंदाई व्हेन्यू देखील 6 एअरबॅग्ज, डॅशकॅम, ABS, EBD, हिल असिस्ट, ESC, रियर कॅमेरा आणि ADAS (अॅडव्हान्स ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टम) सह येते. ADAS मुळे ती थोडी अधिक प्रगत मानली जाते.
टाटा नेक्सॉन: ₹8 लाख – ₹15.60 लाख (एक्स-शोरूम)
ह्युंदाई व्हेन्यू: ₹7.94 लाख – ₹13.62 लाख (एक्स-शोरूम)
व्हेन्यू किंमतीच्या बाबतीत थोडी स्वस्त आहे, पण नेक्सॉन अधिक पर्याय आणि अधिक फीचर्स ऑफर करते.
जर तुम्हाला अधिक इंजिन पर्याय, मजबूत सुरक्षा रेटिंग आणि प्रीमियम फीचर्स हवे असतील तर टाटा नेक्सॉन हे चांगले पर्याय ठरेल. पण आधुनिक लुक, ADAS फीचर्स आणि कमी किमतीत जर तुम्ही उत्तम कार शोधत असाल तर मग ह्युंदाई व्हेन्यू तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन ठरेल.