Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ahilyanagar News: अतिक्रमणाविरोधात दुसऱ्यांदा नोटीस बजावण्याचे काम सुरु, कारवाई प्रक्रिया झाली गतिमान

राष्ट्रीय महामार्ग 561 (जामखेड-अहिल्यानगर) व राष्ट्रीय महामार्ग 548 (जामखेड-बीड) या दोन राष्ट्रीय महामार्गालगत केलेल्या अतिक्रमणांवर नगरपरिषदेने कारवाईची प्रक्रिया अधिक वेगवान केली आहे.

  • By मयुर नवले
Updated On: Mar 01, 2026 | 08:16 PM
अतिक्रमणाविरोधात दुसऱ्यांदा नोटीस बजावण्याचे काम सुरु

अतिक्रमणाविरोधात दुसऱ्यांदा नोटीस बजावण्याचे काम सुरु

Follow Us
Follow Us:
  • अहिल्यानगरमध्ये अतिक्रमणाविरोधात जोरदार कारवाई
  • National Highway 561 आणि National Highway 548 वर अतिक्रमणाविरोधात कारवाई
  • जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
जामखेड शहरातून जाणाऱ्या National Highway 561 (जामखेड–अहिल्यानगर) आणि National Highway 548 (जामखेड–बीड) या दोन राष्ट्रीय महामार्गालगत झालेल्या अतिक्रमणांवर नगरपरिषदेने कारवाईची प्रक्रिया वेगाने सुरू केली आहे.

शहर हद्दीत नगरपरिषदेची पूर्वपरवानगी न घेता स्टॉर्म वॉटर लाईनपासून तीन मीटर अंतराच्या आत उभारण्यात आलेली बांधकामे नियमबाह्य असल्याचा ठपका ठेवत प्रशासनाने पहिल्या टप्प्यात नोटिसा बजावल्या आहेत. बीड रस्त्यावरील १७३ आणि नगर रस्त्यावरील १७६ अशा एकूण ३४९ अतिक्रमणधारकांना नोटिसा देण्यात आल्या असल्याची माहिती प्रशासनाने दिली.

Ahilyanagar News: गोदड महाराज मंदिरात नवे विश्वस्त, संतप्त ग्रामस्थांकडून मंदिरासमोर धरणे आंदोलन

विशेष म्हणजे, नोटीस बजावल्यानंतर दिलेल्या विहित मुदतीत एकाही अतिक्रमणधारकाने आवश्यक कागदपत्रे सादर करून लेखी स्पष्टीकरण नगरपरिषदेकडे दिले नाही, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे. दरम्यान, आता दुसऱ्या टप्प्यातील नोटिसांचे वितरण सुरू करण्यात आले आहे.

नगरपरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजय साळवे यांच्या स्वाक्षरीने देण्यात आलेल्या नोटिशीत संबंधितांना बांधकाम परवानगी, जागेची मालकी कागदपत्रे, मोजणी नकाशा आदी पुरावे तीन दिवसांच्या आत सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. अन्यथा संबंधित बांधकाम अनधिकृत समजून ते संबंधित यंत्रणेमार्फत हटवले जाईल आणि त्याचा खर्च संबंधितांकडून वसूल केला जाईल, असा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे.

Kolhapur News : जनतेच्या घामाचा पैसा, लाचखोरांच्या घशात! प्रशासन अधिकारीच भ्रष्ट, नागरिकांनी कोणाकडे मागावा न्याय?

प्रशासनाच्या मते, शहरातील प्रस्तावित पाणीपुरवठा योजना आणि भुयारी गटार योजनेच्या कामांना अडथळा निर्माण होऊ नये, तसेच रस्ते सुरक्षेच्या दृष्टीने अडथळे दूर करणे आवश्यक असल्यामुळे ही कारवाई केली जात आहे.

अटींचे उल्लंघन असल्याचा दावा

राष्ट्रीय महामार्गांवरील नियंत्रण अधिकार प्रामुख्याने संबंधित विभाग आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे असतात. मात्र, शहर हद्दीत स्थानिक स्वराज्य संस्थेची बांधकाम परवानगी घेणे आणि नाले किंवा स्टॉर्म वॉटर लाईनपासून सुरक्षित अंतर राखणे बंधनकारक असते.

या नियमांचे उल्लंघन करून उभारण्यात आलेली बांधकामे कायदेशीर चौकटीत बसत नसल्याचा दावा नगरपरिषदेने केला आहे.

कारवाईकडे शहराचे लक्ष

दरम्यान, काही उद्योजकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून अतिक्रमणधारकांच्या समर्थनार्थ भूमिका मांडली आहे. तर अतिक्रमणे हटवण्याच्या मागणीसाठी अवधूत पवार यांनी दोन दिवस उपोषण केले असून ५ मार्चपर्यंत साखळी आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.

या पार्श्वभूमीवर प्रशासन आणि नागरिकांमध्ये संवादातून तोडगा निघतो की संघर्ष तीव्र होतो, याकडे संपूर्ण जामखेड शहराचे लक्ष लागले आहे.

Web Title: Ahilyanagar news action against encroachment on national highway 561 and national highway 548

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 01, 2026 | 08:16 PM

Topics:  

  • Ahilyanagar
  • Karjat Jamkhed
  • Marathi News

संबंधित बातम्या

LPG Cylinder Rules : 16 ऑगस्टनंतर ‘या’ ग्राहकांना मिळणार नाही LPG सिलिंडर? कनेक्शन चालू ठेवण्यासाठी त्वरित करा ‘हे’ काम
1

LPG Cylinder Rules : 16 ऑगस्टनंतर ‘या’ ग्राहकांना मिळणार नाही LPG सिलिंडर? कनेक्शन चालू ठेवण्यासाठी त्वरित करा ‘हे’ काम

Share Market Weekly Outlook : शेअर बाजारात तेजी की मंदी? 17 ते 21 ऑगस्टमध्ये ठेवा बारीक लक्ष; ‘हे’ ट्रिगर्स ठरवणार मार्केटची दिशा
2

Share Market Weekly Outlook : शेअर बाजारात तेजी की मंदी? 17 ते 21 ऑगस्टमध्ये ठेवा बारीक लक्ष; ‘हे’ ट्रिगर्स ठरवणार मार्केटची दिशा

Vaping Ban Demand : लहान मुलं नशेच्या विळख्यात? चॉकलेट-फळांच्या फ्लेवरमध्ये निकोटीन प्रॉडक्ट्स; कठोर कायद्याची मागणी
3

Vaping Ban Demand : लहान मुलं नशेच्या विळख्यात? चॉकलेट-फळांच्या फ्लेवरमध्ये निकोटीन प्रॉडक्ट्स; कठोर कायद्याची मागणी

Designer Rakhi Business Idea : डिझायनर राख्यांना मोठी मागणी! फक्त ‘इतक्या’ रुपयांच्या गुंतवणूकीत सुरु करा व्यवसाय
4

Designer Rakhi Business Idea : डिझायनर राख्यांना मोठी मागणी! फक्त ‘इतक्या’ रुपयांच्या गुंतवणूकीत सुरु करा व्यवसाय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.