
Tesla Cybertruck Production Shift Focuses on Cybercab Robotaxi
2027 च्या मध्यापर्यंत सायबरट्रकचे प्रोडक्शन थांबणार
टेस्लाचे सीईओ एलॉन मस्क यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर दिलेल्या माहितीनुसार, कंपनी टेक्सास गिगाफॅक्टरीमध्ये सायबरट्रकचे प्रोडक्शन 2027 च्या मध्याच्या आसपास बंद करण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. या निर्णयामागे Cybercab चे प्रोडक्शन वाढवण्याचा उद्देश आहे. सायबरट्रकचे प्रोडक्शन दुसऱ्या कारखान्यात हलवले जाणार की पूर्णपणे थांबवले जाणार, याबाबत कंपनीने स्पष्ट माहिती दिलेली नाही.
टेस्लाची नवी ऑफर! आता महिन्याच्या ₹१९,९९० च्या EMI वर घरी आणा ‘मॉडेल Y’! जाणून घ्या डिटेल्स
सायबरट्रकची ग्राहकांना डिलिव्हरी 2023 च्या अखेरीस सुरू झाली होती. 2019 मध्ये सादर झालेल्या या इलेक्ट्रिक पिकअपकडून मस्क यांना मोठ्या विक्रीची अपेक्षा होती. त्यांनी वर्षाला 250,000 वाहनांच्या विक्रीचा अंदाज व्यक्त केला होता. पण प्रत्यक्ष आकडे या अपेक्षेपासून दूर राहिले. Kelley Blue Book च्या आकडेवारीनुसार, अमेरिकेत 2025 मध्ये सायबरट्रकच्या 20,237 युनिट्सची विक्री झाली. 2024 मधील 38,965 युनिट्सच्या तुलनेत ही विक्री 48% घटली.
सायबरकॅब रोबोटॅक्सीला प्राधान्य
Tesla Cybercab हे कंपनीचे 2 सीटर स्वयंचलित वाहन आहे. या मॉडेलमध्ये पारंपरिक स्टिअरिंग व्हील आणि पेडल्स नाहीत. 2024 मध्ये सादर झालेल्या या वाहनाचा वापर रोबोटॅक्सी सेवेसाठी करण्याची मस्क यांची योजना आहे. टेक्सास कारखान्यात सायबरकॅबचे प्रोडक्शन एप्रिल 2026 मध्ये सुरू झाले, तर ऑस्टिनमध्ये सशुल्क राइड सेवा सप्टेंबरमध्ये सुरू झाल्याची माहिती समोर आली आहे.
सायबरट्रकच्या स्टेनलेस स्टील बॉडी आणि कोनीय डिझाइनमुळे काही देशांमध्ये विक्रीसाठी अडचणी निर्माण झाल्या. युरोपमध्ये पादचारी सुरक्षेसंबंधी नियमांमुळे या वाहनाला मंजुरी मिळणे कठीण ठरले. त्यामुळे टेस्लाला अपेक्षित जागतिक विस्तार साधता आला नाही. सायबरट्रकचे प्रोडक्शन कमी करून सायबरकॅबला प्राधान्य देणे म्हणजे टेस्ला इलेक्ट्रिक कार उत्पादक कंपनीकडून AI, रोबोटिक्स आणि स्वयंचलित वाहतुकीच्या दिशेने वाटचाल करत असल्याचे संकेत आहेत.