फोटो सौजन्य: iStock
जगभरात टेस्ला कंपनीच्या कारचा बोलबाला सगळीकडेच पाहायला मिळत आहे. टेस्लाच्या लक्झरी कार हाय परफॉर्मन्स आणि महागड्या किंमतीमुळे ओळखल्या जातात. कंपनीचे सीईओ एलोन मस्क देखील आपल्या कार जास्तीतजास्त देशांपर्यंत कसे पोहचवता येईल याबाबत विचार करत आहे. भारतात देखील अनेक कारप्रेमींकडून टेस्लाची वाट पहिली जात आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलिकडेच अमेरिका दौरा केला. तिथे, पंतप्रधान मोदी जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि इलेक्ट्रिक कार उत्पादक कंपनी टेस्लाचे मालक एलोन मस्क यांना भेटले. एलोन मस्क आणि पंतप्रधान मोदी यांच्या भेटीनंतर, टेस्ला कंपनीने भारतात जॉब ओपनिंग सुरू केली आहे. यावरून लवकरच टेस्ला भारतात एंट्री मारणार असे चिन्ह दिसत आहे. त्याच वेळी, कार विक्रीसाठी एक बुकिंग पोर्टल देखील सुरू केले जाणार आहे.
तीन नव्या व्हेरियंट्ससह 2025 Kia Seltos दणक्यात लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स
अमेरिकन इलेक्ट्रिक कार उत्पादक टेस्ला भारतीय बाजारपेठेत टॉप-डाऊन दृष्टिकोनासह प्रवेश करण्याची तयारी करत आहे. कंपनीची योजना आहे की ते प्रथम त्यांचे महागडे मॉडेल भारतात लाँच करेल आणि त्यानंतर स्वस्त मॉडेल भारतात आणेल. येत्या काही महिन्यांत टेस्लाच्या इलेक्ट्रिक कारचा पहिला स्टॉक मुंबईजवळील बंदरावर उतरवला जाऊ शकतो. त्याच वेळी, त्यांची विक्री या वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत मुंबई, दिल्ली आणि बेंगळुरू या तीन प्रमुख शहरांमध्ये सुरू केली जाऊ शकते.
आता तीन प्रश्न उद्भवतात की कंपनी भारतात टेस्ला त्यांच्या कार तयार करेल का? टेस्ला भारतात कोणते मॉडेल लाँच करेल? आणि भारतात येणाऱ्या टेस्ला कार अमेरिका, चीन आणि जर्मनीतील कोणत्या कारखान्यातून पुरवल्या जातील? भारत टेस्लाला इम्पोर्ट ड्युटीत किती सूट देतो यावर हे सर्व अवलंबून आहे. त्याच वेळी, भारतात उत्पादनासाठी गुंतवणूक करणाऱ्या कार उत्पादकांवरील शुल्क खूपच कमी आहे. असे असूनही, टेस्ला भारतात आपली वाहने तयार करण्याचा विचार करत असल्याचे कोणतेही संकेत नाहीत. सध्या फक्त टेस्लाच्या कार आयात केल्या जाण्याची शक्यता आहे.
Hyundai च्या कार खरेदी करण्यासाठी महत्वाची बातमी, कंपनीची ‘ही’ कार झाली महाग
यापूर्वी, 40 हजार डॉलर्स (सुमारे ३५ लाख रुपये) पेक्षा जास्त किमतीच्या देशात आयात केलेल्या वाहनांवर 110% मूलभूत सीमाशुल्क आकारले जात होते, जे आता कमी करण्यात आले आहे. आता त्यांच्यावर 70% बेसिक कस्टम ड्युटी सीमाशुल्क आकारले जाते. त्याच वेळी, सरकारसोबत सामंजस्य करार केल्यानंतर, 35 हजार डॉलर्स (सुमारे 30 लाख रुपये) पेक्षा जास्त किमतीच्या वाहनांवर 15% शुल्क आकारले जाईल, ज्याची अट अशी असेल की 8 हजारांपेक्षा कमी ईव्ही आयात केल्या पाहिजेत.