फोटो सौजन्य: @Hemtonick_ (X.com)
भारतीय बाजारात अनेक कार उत्पादक कंपन्या आहेत, ज्या बेस्ट कार ऑफर करत असतात. ग्राहक देखील आपापल्या आवश्यकतेनुसार कार खरेदी करत असतात. पण 2025 मध्ये अनेक कंपन्यांनी आपल्या कारच्या किंमतीत वाढ केली आहे. यामुळेच आता कार खरेदी करताना ग्राहकांच्या खिशाला जास्त कात्री बसत आहे.
साऊथ कोरियाची वाहन निर्माता कंपनी, ह्युंदाईने देशात अनेक उत्तम कार ऑफर केल्या आहेत. भारतीय बाजारपेठेत, एसयूव्ही सोबत, हॅचबॅक सेगमेंटमधील वाहने देखील खूप लोकप्रिय आहेत. या सेगमेंटमध्ये ह्युंदाई i20 ची N-Line व्हर्जन देखील आणते. रिपोर्ट्सनुसार, ही कार खरेदी करणे आता महाग झाले आहे. कंपनीने i20 N-Line च्या किमती किती वाढवल्या आहेत? कोणता व्हेरियंट कितीने महाग झाला आहे? आता ते किती किमतीत खरेदी करता येईल. याबद्दल आपण जाणून घेणार आहोत.
Toyota च्या SUV Land Cruiser 300 ची बुकिंग दणक्यात सुरु, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स
ह्युंदाईने प्रीमियम हॅचबॅक सेगमेंटमध्ये सादर केलेली ह्युंदाई आय२० एन-लाइन महाग केली आहे. यापूर्वी कंपनीने अनेक कार आणि एसयूव्हीच्या किंमती वाढवल्या होत्या. आता हॅचबॅक कार देखील महाग झाली आहे.
रिपोर्ट्सनुसार, ह्युंदाईने i20 N-Line ची किंमत 4,000 रुपयांपर्यंत वाढवली आहे. त्याच्या निवडक व्हेरियंटच्या किमतीत चार हजार रुपयांची वाढ करण्यात आली आहे. त्याच्या बेस व्हेरियंटच्या किंमतीत कोणताही बदल झालेला नाही. हॅचबॅक कारच्या एंट्री-लेव्हल N6 MT आणि N6 MT ड्युअल टोन व्हेरियंटच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही.
ह्युंदाईने प्रीमियम हॅचबॅक म्हणून ऑफर केलेल्या i20 N-Line च्या बेस व्हेरियंटची किंमत आता 9.99 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे. त्याच्या टॉप व्हेरियंटची एक्स-शोरूम किंमत 12.56 लाख रुपये आहे.
2025 मध्ये Renault ने ‘या’ 2 कार केल्या अपडेट, किंमतीत सुद्धा केले बदल? जाणून घ्या
ह्युंदाईच्या आय20 एन-लाइनमध्ये, कंपनीने एक-लिटर टर्बो पेट्रोल इंजिन दिले आहे. ज्यामुळे त्याला 120 पीएसची पॉवर आणि 172 न्यूटन मीटरचा टॉर्क मिळतो. हे 7 स्पीड डीसीटी ट्रान्समिशन देते.
Hyundai i20 N-Line मध्ये 6 एअरबॅग्ज, ABS, EBD, ESC, VSM, HAC, चारही चाकांवर डिस्क ब्रेक, पार्किंग सेन्सर, फ्रंट फॉग लॅम्प, ESS, कीलेस एंट्री, ISOFIX चाइल्ड अँकरेज, LED लाईट्स, 16 इंच अलॉय व्हील्स, शार्क फिन अँटेना, स्पोर्टी ब्लॅक इंटीरियर, रेड अँबियंट लाईट, सनरूफ, क्रूझ कंट्रोल, इको, नॉर्मल आणि स्पोर्ट्स ड्रायव्हिंग मोड्स, वायरलेस चार्जर, कूल्ड ग्लोव्ह बॉक्स, 10.25 इंच इन्फोटेनमेंट सिस्टम, आठ इंच डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, बोस प्रीमियम साउंड सिस्टम, OTA अपडेट्स अशी अनेक फीचर्स आहेत.