फोटो सौजन्य: Social Media
भारतात अनेक लक्झरी कार्सची क्रेझ पाहायला मिळते. त्यातही या कार्स अनेक सेलिब्रेटीज आणि नेते मंडळी वापरत असल्यामुळे सर्वसामान्य सुद्धा या कार्सबद्दल चर्चा करत असतात. देशात अनेक ऑटो कंपनीज आहेत ज्या लक्झरी कार्सचे उत्पादन करीत असतात. त्यातीलच एक कंपनी म्हणजे रोल्स रॉयस.
देशातील अनेक उद्योगपती, सेलिब्रेटीज आणि नेते मंडळींकडे रोल्स रॉयसच्या कार्स पाहायला मिळतात. Rolls-Royce ही जगातील सर्वात प्रीमियम आणि महागडी कार आहे. मुकेश अंबानींपासून ते शाहरुख खानपर्यंत सर्वजण यात प्रवास करत असतात.
रोल्स रॉयसच्या कारची किंमत इतकी जास्त आहे की प्रत्येकाला ती विकत घेणे शक्य नाही. हीच गोष्ट लक्षात घेऊन आम्ही तुम्हाला सांगत आहोत की बँकेकडून कर्ज घेऊन रोल्स रॉयस खरेदी करता येऊ शकते की नाही. यासोबतच जर तुम्ही ही कार कर्जावर घेण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला किती डाउन पेमेंट भरावे लागेल आणि त्याची EMI किती असेल याबद्दल सुद्धा जाणून घेऊया.
Nissan चा प्रवास बंद होण्याच्या वाटेवर? कंपनीने दिले स्पष्टीकरण
Rolls-Royce भारतीय बाजारात चार कार विकते, ज्या Rolls-Royce Cullinan, Ghost, Phantom आणि Spectre आहेत. आज आपण Rolls-Royce Phantom च्या ऑन-रोड किंमत, EMI आणि डाउन पेमेंटची संपूर्ण माहिती जाणून घेऊयात.
राजधानी दिल्लीत Rolls-Royce Phantom ची एक्स-शोरूम किंमत 8.99 कोटी रुपयांपासून सुरू होते आणि त्याच्या टॉप मॉडेलची किंमत 10.48 कोटी रुपयांपर्यंत जाते. ही कार दोन व्हेरियंटमध्ये येते. याचे बेस मॉडेल सीरीज II आहे आणि टॉप मॉडेल रोल्स-रॉइस फँटम एक्स्टेंडेड व्हीलबेस आहे.
जर तुम्ही ही कार कर्ज घेऊन खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर त्याची ऑन-रोड किंमत RTO, विमा आणि इतर शुल्कांसह 10,32,84,983 (10.32 कोटी) पर्यंत जाऊ शकते.
जर तुम्हाला रोल्स-रॉईस फँटम खरेदी करायची असेल तर पूर्ण रक्कम भरण्याऐवजी तुम्ही बँक किंवा फायनान्स कंपनीकडून कर्ज देखील मिळवू शकता. जर तुम्ही या कारसाठी 2 कोटी रुपये डाऊन पेमेंट केले व 7 वर्षांसाठी 9.8 टक्के व्याजदराने कर्ज घेतले तर तुम्हाला बँकेकडून 8,32,84,983 (रु. ८.३२ कोटी) कर्ज घ्यावे लागेल. त्याच वेळी, यासाठी तुम्हाला दरमहा 13,74,038 रुपयांचा EMI भरावा लागेल.
तसेच ही कार लोनवर घेतल्यास तुम्हाला 3,21,34,207 रुपयांचा इंटरेस्ट रेट द्यावा लागेल. यामुळे तुम्हाला या प्रीमियम कारसाठी एकूण 11.54 कोटी रुपये द्यावे लागतील.
Rolls-Royce Phantom मध्ये 6.75-litre twin-turbo V12 इंजिन आहे, जे 570 PS पॉवर आणि 900 Nm पीक टॉर्क जनरेट करते. यामध्ये मोठे इन्फोटेनमेंट युनिट, फ्रंट मसाज सीट्स, फ्रंट व्हेंटिलेटेड सीट्स आणि वायरलेस फोन चार्जर यांसारखी फीचर्स आहेत.
कारच्या सेफ्टी फीचर्सबद्दल सांगायचे तर, यात चाइल्ड सेफ्टी लॉक, कीलेस एंट्री, एअरबॅग, एबीएस, रिअर पार्किंग सेन्सर, रिअर पार्किंग कॅमेरा, यूएसबी सपोर्ट, ब्लूटूथ सपोर्ट, स्टीयरिंग माउंटेड ऑडिओ, मल्टी फंक्शन स्टीयरिंग व्हील पॉवर, ॲडजस्टेबल एक्सटीरियर रिअर व्ह्यू मिरर यांचा समावेश आहे.