फोटो सौजन्य: iStock
ऑटोमोबाइल क्षेत्रात प्रत्येक ऑटो कंपनी चांगलाच नफा कमावेल असे नसते. काही कंपनीचे दिवाळे सुद्धा निघून जाते. काही वेळेस चांगली सेल न झाल्यामुळे ऑटो कंपनीजला काही कठोर निर्णय सुद्धा घ्यावे लागतात. हीच स्थिती आता निसान कंपनीची झाली आहे.
भारतीय कार मार्केटमध्ये Magnite आणि X-Trail सारख्या कार्सची विक्री करणारी जपानची तिसरी सर्वात मोठी ऑटोमोबाईल उत्पादक कंपनी निसान मोटर कॉर्पोरेशन बंद होण्याच्या मार्गावर आहे. विक्रीतील घट आणि कंपनीच्या तोट्यात वाढ हे त्यामागील मुख्य कारण आहे.
आता नव्हे तर 1999 सालीच Mahindra ने बनवली होती त्यांची पहिली EV, जाणून घ्या Bijlee बद्दल
फ्रेंच वाहन उत्पादक कंपनी रेनॉल्टने निसानमधील आपली हिस्सेदारी अर्ध्याहून कमी करून 15 टक्क्यांपर्यंत आणली आहे. एका अहवालानुसार, परिस्थिती अशी आहे की जर कंपनीला 12-14 महिन्यांत एक चांगला गुंतवणूकदार मिळाला नाही, तर निसानला त्यांचे कामकाज सुरू ठेवण्यात अडचणी येऊ शकतात. जे नक्कीच कंपनीसाठी धोक्याची घंटा आहे.
2002 पर्यंत निसानमधील रेनॉल्टची हिस्सेदारी 43 टक्के होती. निसानसाठी हा एक मोठा आधार होता, जो आता संपुष्टात येत आहे. फायनान्शिअल टाईम्सच्या वृत्तानुसार, निसानकडे आपल्या अस्तित्वासाठी फक्त जवळपास एक वर्ष शिल्लक आहे. त्यामुळे कंपनी नवीन गुंतवणूकदाराच्या शोधात आहे. ज्यासाठी निसान बँका आणि विमा कंपन्यांसारखे विश्वासू गुंतवणूकदार शोधत आहे. सिंगापूरचे एफिसिमो कॅपिटल मॅनेजमेंट आणि हाँगकाँगचे ओएसिस मॅनेजमेंट यासारखे गुंतवणूकदार निसानमध्ये स्वारस्य दाखवत आहेत. ही एक चांगली बाब आहे.
या महिन्याच्या सुरुवातीला निसानने 9,000 कामगारांना कामावरून काढून टाकले आहे. यासोबतच कंपनीने उत्पादनात 20 टक्के कपात केली आहे. याशिवाय कंपनीचे सीईओ माकोटो उचिदा यांनीही त्यांच्या पगारात 50 टक्के कपात केली आहे. खरं तर, निसानला सप्टेंबर तिमाहीत 510 कोटी रुपयांचा तोटा झाला होता, तर वर्षभरापूर्वी कंपनीला सुमारे 10 हजार कोटी रुपयांचा नफा झाला होता.
अखेर Honda Activa EV लाँच, जाणून घ्या फीचर्सपासून ते किंमतीपर्यंतची इत्यंभूत माहिती
1999 साली निसानची परिस्थिती खूपच नाजूक होती. यावेळी, रेनॉल्टने 36.8 स्टेक घेऊन कंपनीला बुडण्यापासून वाचवले होते, परंतु त्यानंतरच्या वर्षांत, दोन कंपनीजमध्ये गव्हर्नन्स आणि इक्विटीशी संबंधित विवाद वाढले. यानंतर, 2002 मध्ये, रेनॉल्टने निसानमधील आपली भागीदारी 43 टक्के वाढवली. त्याच वेळी, 2016 मध्ये, मित्सुबिशी मोटर्सचा समावेश करून भागीदारी पुढे नेण्यात आली.
निसान रिस्ट्रक्चरिंग स्कीमअंतर्गत मित्सुबिशी मोटर्समधील आपला 34% हिस्सा कमी करणार आहे, जी कंपनी 24 टक्क्यांवर आणणार आहे. चीन आणि अमेरिकेतील घटत्या विक्रीला तोंड देण्यासाठी निसान इलेक्ट्रिक वाहनांच्या क्षेत्रात होंडासोबत नवीन पार्टनरशिप करण्याचे प्रयत्न करत आहे.
निसान कंपनी बंद होणार का या प्रश्नावर स्वतः कंपनीने भाष्य केले आहे. कंपनी म्हणते की धोरण म्हणून आम्ही तकलादू अहवालांवर भाष्य करत नाही. निसान आपल्या भारतातील ऑपरेशन्स, डीलर्स, भागीदार आणि ग्राहकांसाठी सदैव वचनबद्ध आहे. या वर्षाच्या सुरुवातीला Nissan X-TRAIL आणि New Nissan Magnite च्या लाँचिंगच्या वेळी जाहीर केलेल्या प्लॅनिंगच्या मार्गावर आम्ही आहोत.