Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

WangonR चे हायब्रीड मॉडेल 2025 मध्ये होणार लॉंच! कारच्या नवीन जनरेशनमध्ये असणार हे बदल

मारुती सुझुकीची सर्वात लोकप्रिय कार असणारी वॅगन आर ही मध्यमवर्गीयांची आवडती कार आहे. कंपनीकडून नवीन जनरेशन वॅगन आर कार लॉंच करण्याची  तयारी सुरु आहे. जाणून घ्या याबाबत  

  • By नारायण परब
Updated On: Nov 12, 2024 | 10:22 PM
फोटो सौजन्य- सोशल मीडिया

फोटो सौजन्य- सोशल मीडिया

Follow Us
Close
Follow Us:

भारतातील ऑटोमोबाईल क्षेत्रातील विक्रीमध्ये अव्वल असणारी कंपनी  मारुती सुझुकीच्या कार्सनी अनेक दशके देशातील ग्राहकांवर राज्य केले आहे. बजेट कार आणि कारमधील वैविध्यपुर्ण प्रकारामुळे ग्राहकांचा भरघोस प्रतिसाद या कारना मिळाला आहे. अल्टो 800, अर्टिगा, वॅगन आर, स्विफ्ट, स्विफ्ट डिझायर अशा कंपनीच्या अनेक कार आहेत ज्यांनी भारतीय बाजारपेठेत इतिहास रचला आहे. आता कंपनीकडून नवीन जनरेशन वॅगन आर कार लॉंच करण्याची  तयारी सुरु आहे. जाणून घ्या याबाबत

मारुती सुझुकीची सर्वात लोकप्रिय कार असणारी वॅगन आर ही मध्यमवर्गीयांची आवडती कार आहे.  ही कार बॉक्सी केबिनच्या रूपात एक विशिष्ट शैली ऑफर करते. वॅगन आरची सध्याची जनरेशन ही या कारची  तिसरी जरनरेशन आहे आणि ती CNG पर्यायासहितही उपलब्ध आहे. तथापि, मीडिया रिपोर्ट्नुसार, कारची नवीन जनरेशन ही  संपूर्ण हायब्रीड असणार आहे.

हे देखील वाचा- CNG कार घेण्याचा विचार करताय? ‘या’ आहेत बेस्ट गाड्या

Wagon R  च्या नव्या जनरेशनचे इंजिन

या रिपोर्ट्नुसार  नवीन जनरेशन Suzuki WagonR ही पहिली मिनी-कार असेल जी कंपनी हायब्रिड सेटअपसह ऑफर करणार आहे. नवीन हॅचबॅक इनलाइन 3 DOHC, 0.66-लिटर हायब्रिड इंजिन ऑफर करेल. ICE इंजिन 54PS जनरेट करणार आहे, तर इलेक्ट्रिक मोटर 10PS जनरेट करेल. तर कारचे टॉर्क आउटपुट अनुक्रमे 58Nm आणि 29.5 Nm असेल. कारमध्ये इलेक्ट्रिक कंटिन्युटी व्हेरिएबल ट्रान्समिशन (eCVT) असेल.

Wagon R  ची रचना 

मारुती सुझुकी वॅगन-आरचे जपान मधील व्हेरिएंट हे पूर्णपणे हायब्रिड रचनेत असणार आहे. कारची 3395 मिमी लांबी, 1475 मिमी रुंदी आणि 1650 मिमी उंची असणार आहे. वॅगन आर कारचा व्हीलबेस हा 2460mm असेल तर कर्बचे वजन हे 850 kg असणार आहे. जपानच्या व्हेरिएंटमध्ये तेथील ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सरकते दरवाजे असतील. नवीन जनरेशन Wagon-R ही  2025 मध्ये सुरुवातीच्या  महिन्यात लॉंच होण्याची अपेक्षा करण्यात येत आहे.

हे देखील वाचा- इलेक्ट्रिक स्कूटर घेत आहात? Honda Activa EV येण्याची वाट पहा, सिंगल चार्जमध्ये मिळेल 150 KM ची रेंज

Wagon R ची किंमत, कार्यक्षमता 

कारच्या उत्सर्जनाचा विचार केल्यास, ICE च्या तुलनेत सुझुकी वॅगनआर फुल हायब्रिडचे  उत्सर्जन कमी असेल. WagonR हायब्रीडची रनिंग कॉस्ट ही ICE ट्रिमपेक्षा कमी असेल. या कारची कार्यक्षमता ही उत्तम असण्याची अपेक्षा केली जात आहे. मात्र त्याबद्दल कारच्या लॉंचिग नंतरच कळेल.  ग्रँड विटारा हायब्रिड 27.97 kmpl ची इंधन-कार्यक्षमता देते आणि हे WagonR (म्हणजे 25.19 kmpl) पेक्षा चांगले आहे. WagonR हायब्रीडचे मायलेज 30 kmpl असू शकते. सध्याचे कारचे  सीएनजी (CNG) प्रकार  33.47 किमी/किलो मायलेज देते. ही कार भारतामध्ये लॉंच झाल्यास या कारची एक्स शोरुम किंमत ही अंदाजे 10 लाखांच्या आत असू शकते.

Web Title: The wangonr hybrid model will be launched in 2025 there will be significant changes in the new generation of car

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 12, 2024 | 10:21 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.