फोटो सौजन्य: iStock
लक्झरी कार्स प्रत्येकाच्या चर्चेचा विषय ठरतात. आजही रस्त्याच्या कडेला जर एखादी लक्झरी कार उभी असेल तर अनेक जण तिच्या अवतीभोवती फिरत असतात, काही जण फोटो काढताना दिसतात. अनेक सेलिब्रेटीज सुद्धा या लक्झरी कार्स वापरताना दिसतात ज्याचा मोठा प्रभाव लोकांवर पडत असतो. त्यामुळे प्रत्येकाला लक्झरी कार्सची भुरळ पडली असते.
जगभरात अनेक लक्झरी कार उत्पादक कंपनीज आहे. त्यातीलच एक म्हणजे रोल्स रॉयस. या कंपनीच्या अनेक कार्स आज जगभरात लोकप्रिय आहेत. रोल्स रॉयस नेहमीच लक्झरी वाहनांसाठी ओळखली जाते. अनेक बॉलिवूडचे सेलिबेट्रीज सुद्धा रोल्स रॉयसच्या कार वापरताना दिसतात.
हे देखील वाचा: कार आणि बाईकसाठी वापरले जाणारे पेट्रोल जेट विमानात सुद्धा वापरले जाते का?
आता या कार उत्पादक कंपनीने एक अशी कार मार्केटमध्ये आणली आहे ज्याचे केबिन 18 कॅरेट सोन्याचे आहे. जेम्स बाँड या आयकॉनिक चित्रपटात दिसलेल्या रोल्स रॉयस कारला लक्षात घेऊन ही कार तयार करण्यात आली आहे. या चित्रपटातील खलनायक गोल्डफिंगरने या चित्रपटात रोल्स रॉयस फँटमचा वापर केला होता.
Rolls-Royce वेगवेगळ्या प्रकारे कार कस्टमाइज करण्यासाठी ओळखली जाते. सोन्याने बनवलेली ही कार 1937 च्या फँटम III प्रमाणे डिझाइन केली गेली आहे, जी डबल टोन कॉम्बिनेशनसह येते. ही कार काळ्या आणि पिवळ्या रंगात आणण्यात आली आहे.
या कारवरील स्पिरिट ऑफ एक्स्टसीच्या पुतळ्यावर 18 कॅरेट सोन्याचा लेप लावला आहे. या लक्झरी कारमध्ये 21-इंच काळ्या व्हील्समध्ये फ्लोटिंग सिल्व्हर हबकॅप्स आहेत. या व्हील्सच्या सहाय्याने कार गोल्डफिंगरच्या कारसारखी बनवण्यात आली आहे.
हे देखील वाचा: Tata Punch साठी 2 लाखाचे डाऊन पेमेंट केल्यास फक्त भरावा लागेल ‘इतका’ EMI
रोल्स रॉयस गोल्डफिंगरच्या केबिनमधील एलिमेंट्स सोन्याचे बनलेले आहेत. या कारमध्ये 18 कॅरेट सोन्याची पट्टी बसवण्यात आली आहे. 1964 च्या जेम्स बॉंड चित्रपटात गोल्ड फिंगरने एक ओळ म्हटली होती – ‘हे सोने आहे, मिस्टर बाँड’, ही ओळ ग्लोव्हबॉक्सवर लिहिली गेली आहे, जेणेकरून चित्रपटाची थीम संपूर्ण आतील भागात दिसू शकेल. चित्रपटात गोल्डफिंगर कारमधून सोन्याची तस्करी करत असतो.
Rolls-Royce Phantom Goldfinger च्या बूट-स्पेसमध्ये 007-लोगो प्रोजेक्टर इन्स्टॉल करण्यात आला आहे. या कारच्या लायसन्स प्लेटवर AU 1 लिहिलेले आहे, कारण रसायनशास्त्रात सोन्याचे चिन्ह AU आहे. यावरून ही कार सोन्यापासून बनली आहे याची माहिती मिळते.