फोटो सौजन्य: Social Media
दिवाळी, एक असा सण जो प्रत्येक भारतीयाचा आवडता सण आहे. या शुभ काळात आपण आपल्या जवळच्या व्यक्तींना भेटतो, त्यांच्यासाठी भेटवस्तू घेऊन जातो. कर्मचारी लोकांना या काळात बोनस मिळतो. एकंदरीत या काळात सगळीकडे चैतन्यमय वातावरण असते. अनेक जण दिवाळीच्या शुभमुहूर्तावर नवीन कार सुद्धा घरी आणतात.
आता कारचा विषय निघाला आहे आणि टाटा मोटर्सचे नाव येणार नाही असे होणार नाही. भारतीय ऑटोमोबाइल क्षेत्रात टाटा मोटर्स हे असे नाव आहे ज्याच्या कार्स आजही लोकं डोळे झाकून विकत घेत असतात. याच कंपनीची लोकप्रिय कार म्हणजे टाटा पंच.
हे देखील वाचा: यंदाच्या दिवाळीत फक्त 1 लाखात घरी आणा Maruti Suzuki Ertiga, दरमहा भरा एवढा हप्ता
देशातील आघाडीची ऑटोमोबाईल उत्पादक कंपनी टाटा मोटर्सने भारतीय बाजारपेठेत पंच ही मायक्रो SUV म्हणून ऑफर केली आहे. दर महिन्याला हजारो लोकं ही कार खरेदी करत असतात. अशा परिस्थितीत, जर तुम्ही त्याचे बेस व्हेरिएंट Pure खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर 2 लाख रुपयांचे डाउन पेमेंट केल्यानंतर दरमहा किती ईएमआय भरावा लागेल याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.
Tata द्वारे Pure हे पंचचे बेस व्हेरियंट म्हणून ऑफर केले जाते. एसयूव्हीच्या या व्हेरियंटची एक्स-शोरूम किंमत 6.13 लाख रुपये आहे. जर राजधानी दिल्लीत ही कार खरेदी केले तर याची ऑन रोड किंमत सुमारे 6.91 लाख रुपये असेल. 6.13 लाख रुपयांच्या एक्स-शोरूम किंमतीशिवाय, या किंमतीमध्ये सुमारे 43 हजार रुपयांचा आरटीओ आणि सुमारे 35 हजार रुपयांचा विमा देखील समाविष्ट आहे. ही किंमत तुमच्या जवळील शोरुमनुसार वर खाली होऊ शकते.
हे देखील वाचा: यंदाच्या दिवाळीत ‘अशाप्रकारे’ घ्या Zero Down Payment वर कार
तुम्ही या Tata SUV चा बेस व्हेरियंटला Pure खरेदी केल्यास, बँकेकडून फक्त एक्स-शोरूम किंमतीवर फायनान्स केला जाईल. अशा परिस्थितीत, 2 लाखांचे डाउन पेमेंट केल्यानंतर, तुम्हाला सुमारे 4.91 लाख रुपयांची रक्कम बँकेकडून फायनान्स करावी लागेल. जर बँकेने तुम्हाला सात वर्षांसाठी नऊ टक्के व्याजासह 4.91 लाख रुपये दिले, तर तुम्हाला पुढील सात वर्षांसाठी दरमहा केवळ 7900 रुपयांचा ईएमआय भरावा लागेल.
जर तुम्ही बँकेकडून नऊ टक्के व्याजदराने सात वर्षांसाठी 4.91 लाख रुपयांचे कार लोन घेतले तर तुम्हाला सात वर्षांसाठी दरमहा 7900 रुपयांचा ईएमआय भरावा लागेल. अशा स्थितीत, सात वर्षांत तुम्हाला टाटा पंचच्या प्युअर व्हेरियंटसाठी सुमारे 1.72 लाख रुपये व्याज द्यावे लागतील. त्यानंतर तुमच्या कारची एक्स-शोरूम, ऑन-रोड आणि व्याजासह एकूण किंमत सुमारे 6.63 लाख रुपये असेल.