फोटो सौजन्य: istock
2024 संपायला आता काही आठवड्यांचा अवधी शिल्लक आहे. हे वर्ष ऑटोमोबाइल क्षेत्रासाठी नक्कीच भरभराटीचा होता. या वर्षात अनेक ऑटो कंपनीज नवनवीन प्रयोग केले. याच वर्षी आपण बजाजची सीएनजी बाईक पहिली, जी जगातील पहिली सीएनजी बाईक आहे. पण जसजसे हे वर्ष संपत चालले आहे, तसतसे अनेक ऑटो कंपनीज सुद्धा आपल्या कार्सच्या किंमती वाढवण्याचा निर्णय सुनावत आहे.
निसान, मर्सडिज, बीएमडब्ल्यू, आणि मारुती सुझुकी अशा वाहन उत्पादक कंपन्यांनी आपल्या कार्सच्या किंमती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे नक्कीच कार खरेदीदारांचा खिसा अजूनच रिकामा होण्याची शक्यता आहे. यातच आता टोयोटा कंपनी सुद्धा आपल्या एका लोकप्रिय कारची किंमत वाढवण्याच्या तयारीत आहे.
हिवाळ्यात ड्राईव्ह करताना जर कारच्या विंडशिल्डवर साचत असेल धुकं, तर वेळीच करा ‘हा’ उपाय
टोयोटा इनोव्हा हायक्रॉस ही एमपीव्ही आहे. कंपनीने या कारच्या किंमतीत वाढ केली आहे. इनोव्हा हायक्रॉसच्या किंमतीत 36 हजार रुपयांपर्यंत वाढ झाली आहे. कारच्या किंमतीत वाढ झाल्यानंतर या कारची एक्स-शोरूम किंमत 19.94 लाख रुपयांवरून 31.34 लाख रुपये झाली आहे. या दरवाढीमुळे नक्कीच ग्राहकांच्या खिश्याला कात्री बसणार आहे.
टोयोटा इनोव्हा हायक्रॉस सहा ट्रिमसह बाजारात उपलब्ध आहे. या कारचे GX, GX(O), VX, VX(O), ZX आणि ZX(O) व्हेरियंट भारतीय बाजारपेठेत समाविष्ट आहेत. त्याच्या एंट्री लेव्हल व्हेरियंट GX आणि GX(O) ची किंमत 17 हजार रुपयांनी वाढली आहे. त्याचवेळी, या कारच्या मिड-व्हेरियंट VX आणि VX(O) च्या किंमतीत 35 हजार रुपयांनी वाढ झाली आहे. इनोव्हाच्या टॉप मॉडेल्स ZX आणि ZX(O) च्या किंमतीत 36 हजार रुपयांनी वाढ करण्यात आली आहे.
इलेक्ट्रिक स्कूटर बिनधास्त घ्या, पण घेण्याअगोदर त्याच्या बॅटरीची किंमत जाणून घ्या
मीडिया रिपोर्ट्सनुसार, इनोव्हा हायक्रॉसचा वेटिंग पिरियड ही कमी झाला आहे. या कारच्या पेट्रोल व्हेरियंटसाठी तुम्हाला ४५ ते ६० दिवस प्रतीक्षा करावी लागू शकते. जर तुम्ही आज याच्या टॉप व्हेरियंटसाठी बुक केले तर तुम्हाला सहा महिन्यांनंतर या कारच्या चाव्या मिळतील. तर पेट्रोल हायब्रीड व्हेरियंटसाठी तुम्हाला ४५ दिवस वाट पाहावी लागेल. गेल्या महिन्यापर्यंत या वाहनाचा वेटिंग पिरियड आठ महिन्यांवर पोहोचला होता.
टोयोटा इनोव्हा हायक्रॉस 2.0-लिटर पेट्रोल इंजिनसह सुसज्ज आहे. कारमध्ये बसवलेले हे इंजिन 172 एचपी पॉवर देते. या इंजिनमध्ये ऑटोमॅटिक गिअर बॉक्सही बसवण्यात आला आहे. इनोव्हामध्ये मजबूत हायब्रिड तंत्रज्ञानासह 2.0 लिटर पेट्रोल इंजिनचा पर्याय देखील आहे, जो 184 एचपीची शक्ती देतो.
इनोव्हा 7-सीटर आणि 8-सीटर कॉन्फिगरेशनसह येते. सुरक्षेसाठी हे वाहन 6 SRS एअरबॅगने सुसज्ज आहे. ही कार सात रंगांच्या ऑप्शन्ससह बाजारात आहे.