फोटो सौजन्य: iStock
हिवाळा सुरु झाला आहे. या मोसमात अनेक ठिकाणी गारठा वाढतो, ज्यामुळे वातावरण एकदम आल्हादायक होते. तर दुसरीकडे अनेक लोकं थंड हवेच्या ठिकाणी जाण्यासाठी आतुर असतात. महाबळेश्वर, माळशेज घाट, आणि माथेरानला पर्यटकांची चांगलीच गर्दी पाहायला मिळते. अनेक जण या गुलाबी थंडीत कुठे तरी लॉंग ट्रीपवर जातात दिसतात. मात्र हिवाळ्यात कार चालवताना अनेक समस्या उद्भवू शकतात. यातीलच एक समस्या म्हणजे कारच्या विंडशिल्डवर धुकं साचणे.
हिवाळ्यात अनेक ठिकाणी धुकं पसरली जातात. यामुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यावली अनेक जण कारच्या विंडशिल्डवर असणाऱ्या वायपरचा वापर करतात. पण त्याव्यतिरिक्त, असे अनेक उपाय आहेत जे कारचालकांना ठाऊकच नाही आहे.
इलेक्ट्रिक स्कूटर बिनधास्त घ्या, पण घेण्याअगोदर त्याच्या बॅटरीची किंमत जाणून घ्या
हिवाळ्यात थंडी टाळण्यासाठी लोकं दुचाकीपेक्षा कार वापरण्यास जास्त प्राधान्य देतात. पण, हिवाळ्यात कार चालवताना सर्वात मोठी समस्या म्हणजे तुमच्या विंडशील्डवर साचणारे धुके. त्यामुळे कार चालवताना त्रास होत असतानाच अनेक वेळा अपघातही घडतात. अशा समस्यांना तुमच्यापासून दूर ठेवण्याचे काही उपाय आम्ही तुम्हाला सांगत आहोत. या पद्धती कारच्या विंडशील्डमध्ये साचलेले धुके साफ करण्यासाठी देखील उपयुक्त ठरू शकतात आणि थंडीच्या काळात तुम्ही या टिप्स फॉलो सुद्धा करू शकता व तुमची राइड अधिक सुरक्षित बनवू शकता.
बाहेरील थंड तापमान आणि आतून उष्ण तापमान यामुळे कारच्या विंडशील्डवर फॉगिंगची समस्या निर्माण होते. या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही कारचा एसी वापरू शकता. सर्व प्रथम, कारचा एसी चालू करा आणि कूल मोडवर सेट करा. यानंतर, एसी व्हेंट्स विंडस्क्रीनच्या दिशेने स्विच करा. असे केल्याने, विंडशील्डवरील धुके थोड्याच वेळात साफ होते.
जर तुम्हाला एसी किंवा हीटर वापरायचा नसेल तर तुम्ही कारची खिडकी थोडी उघडू शकता. असे केल्याने आत आणि बाहेरचे तापमान सारखेच होईल आणि त्यामुळे एसी हीटर न वापरता धुकं साफ होईल.
कारचे विंडशील्ड आतून आणि बाहेरून पूर्णपणे स्वच्छ करा. तसेच ब्लोअर आणि व्हेंट्स योग्यरित्या सेट करा आणि ब्लोअर सामान्य वेगाने चालवा. याशिवाय जर तुम्हला यासंबंधी अधिक माहिती हवी असेल तर तुमच्या जवळील सर्व्हिस सेंटर किंवा मेकॅनिकला भेट द्या.