फोटो सौजन्य: Social Media
सध्या देशभरात उत्साहाचे वातावरण आहे. याचे कारण म्हणजे सुरु झालेला सणासुदीचा काळ. या काळात प्रत्येकजण नवनवीन गोष्टी खरेदी करत असतो. तसेच कित्येक जण या काळात नवीन कार विकत घेत असतात.
खरंतर कार घेणं हे प्रत्येक मध्यमवर्गीय व्यक्तीचे स्वप्न असते. हेच स्वप्न कित्येक जण सणासुदीच्या काळात पूर्ण करताना दिसतात. अनेक ऑटो कंपनीज सुद्धा या काळात आपल्यां वाहनांवर विशेष सूट देताना दिसतात तर काही कंपनीज स्पेशल एडिशन कार्स लाँच करत असतात. नुकतेच जपानी उत्पादक Toyota ने क्रॉस ओव्हर SUV Toyota Taisor चे लिमिटेड एडिशन लाँच केले आहे. चला या कारबद्दल अधिक माहीत जाणून घेऊया.
Toyota Taisor ही Toyota ने भारतीय बाजारात क्रॉस ओव्हर SUV म्हणून ऑफर केली आहे. त्याचे नवीन व्हर्जन कंपनीने सणासुदीच्या काळात लाँच केले आहे. विशेष बाब म्हणजे या SUV चे नवीन व्हर्जन केवळ 31 ऑक्टोबरपर्यंत विक्रीसाठी उपलब्ध केली जाईल.
Toyota Urban Cruiser Taisor च्या लिमिटेड एडिशनमध्ये काही ॲक्सेसरीज मोफत दिल्या जात आहेत. यासाठी कंपनीकडून कोणतेही अतिरिक्त शुल्क घेतले जाणार नाही. अशा परिस्थितीत एसयूव्हीसोबत 20160 रुपयांच्या सहा ॲक्सेसरीज दिल्या जातील. यामध्ये ग्रे आणि लाल रंगात फ्रंट आणि रियर अंडर स्पॉयलर, प्रीमियम डोअर सिल गार्ड, हेडलॅम्प आणि फ्रंट ग्रिलसाठी क्रोम गार्निश, बॉडी साइड मोल्डिंग, डोअर व्हिझर प्रीमियम आणि All-weather 3D मॅट्ससह वेलकम डोअर लॅम्प यांचा समावेश आहे.
हे देखील वाचा: Maruti Suzuki Baleno चे नवे रिगल एडिशन लॉंच! ग्राहकांना दिवाळीनिमित्त दिला नवा पर्याय
ही एसयूव्ही पेट्रोल, सीएनजी आणि टर्बो इंजिनच्या ऑप्शनसह विक्रीसाठी उपलब्ध करते. त्याची एक्स-शोरूम किंमत 7.73 लाख रुपयांपासून सुरू होते व त्याचे टॉप व्हेरियंट 12.87 लाख रुपयांच्या एक्स-शोरूम किंमतीत उपलब्ध आहे. यासाठी 11,000 रुपयांमध्ये ऑनलाइन किंवा ऑफलाइन पद्धतीने बुकिंग करता येईल.
ही SUV टोयोटा कंपनीने भारतीय बाजारात क्रॉसओवर SUV म्हणून आणले आहे. त्याची थेट स्पर्धा मारुती फ्रंटएक्स, निसान मॅग्नाइट, रेनॉल्ट किगर, ह्युंदाई व्हेन्यू, किया सोनेट, मारुती ब्रेझा यांसारख्या एसयूव्हीशी असणार आहे.