
फोटो सौजन्य: Gemini
या यादीत पहिल्या क्रमांकावर Maruti Fronx Hybrid आहे. टेस्टिंगदरम्यान ही कार अनेकदा दिसली आहे, जिथे टेलगेटवर ‘Hybrid’ बॅजिंग आणि ‘Fronx’ लोगोची नवी पोजिशनिंग स्पष्टपणे दिसली. डिझाइनमध्ये मोठे बदल नसले तरी फ्रंट ग्रिल आणि बंपर्समध्ये हलके अपडेट्स मिळणार आहेत. ही मारुतीच्या इन-हाउस Strong Hybrid टेक्नोलॉजीवर आधारित असेल, जी Z12E 1.2-liter 3-cylinder पेट्रोल इंजिनला इलेक्ट्रिक मोटर आणि बॅटरी पॅकशी जोडते. या एसयूव्हीचा मायलेज 35 kmpl पेक्षा जास्त असण्याची अपेक्षा आहे.
जुन्या वाहनधारकांना धक्का! 10–15 वर्षांवरील गाड्यांच्या फिटनेस टेस्ट फीमध्ये ‘इतकी’ मोठी वाढ
फीचर्समध्ये HUD, 360-degree camera, वायरलेस कनेक्टिव्हिटी, 6 airbags आणि Level-2 ADAS (LiDAR sensor सह) मिळू शकतात. लॉन्च 2026 च्या सुरुवातीला होण्याची शक्यता आहे. किंमत 8 लाख रुपये पासून सुरू होऊ शकते.
दुसऱ्या क्रमांकावर Mahindra XUV 3XO EV आहे. ही सब-4 मीटर इलेक्ट्रिक SUV, सध्याच्या XUV 3XO प्लॅटफॉर्मवर आधारित असून XUV400 ची उत्तराधिकारी ठरणार आहे. अलीकडेच महाबलीपुरम (तामिळनाडू) येथे टेस्टिंगदरम्यान ही SUV स्पॉट झाली. फ्रंट एंड पूर्णपणे कॅमोफ्लॉज्ड होता, परंतु साइड प्रोफाइल आणि रिअर एंड विद्यमान मॉडेलसारखेच दिसत होते.
Eco मोड कधी वापरावा? आणि पॉवर मोड कधी? बाईकचे परफॉर्मन्स टिकवा…
Maruti Brezza ही कॉम्पॅक्ट SUV सेगमेंटमधील सर्वाधिक विक्री होणाऱ्या कारपैकी एक आहे. 2022 मध्ये लाँच झालेल्या ब्रेजाला आता मिड-सायकल फेसलिफ्ट मिळणार आहे. अलीकडे गुरुग्राममध्ये पूर्णत: कॅमोफ्लॅज्ड स्वरूपात टेस्टिंगदरम्यान ती दिसली. व्हिडिओ फुटेजनुसार साइड प्रोफाइल रिवॅम्प्ड आहे, फ्रंट फेसिया अधिक फ्रेश दिसतो आणि रिअरमध्ये CNG स्टिकरसह अंडरबॉडी CNG टँक आहे. या कारचा मायलेज अंदाजे 20-25 kmpl असेल.