फोटो सौजन्य: Social Media
सध्या जगभरातील लोकांचे लक्ष अमेरिकेतील निवडणुकीकडे लागले आहे. ही निवडणूक अमेरिकेच्या राष्ट्रपती पदासाठी घेतली जात आहे. या अध्यक्षीय निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प आणि डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार कमला हॅरिस यांच्यात चांगलीच चुरस पाहायला मिळाली. परंतु सरतेशेवटी डोनाल्ड ट्रम्प हे विजयी झाले.
रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेचे ४७ वे राष्ट्राध्यक्ष बनले आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष हे जगातील सर्वात शक्तिशाली व्यक्ती मानला जातो. अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या सुरक्षेसाठी नेहमीच विशेष व्यवस्था करण्यात येते. त्यात त्यांच्या लक्झरी आणि अधिक सुरक्षित कारचाही समावेश असतो. आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प ‘द बीस्ट’ नावाच्या लिमोझिनमधून प्रवास करणार आहेत. ही जगातील सर्वात सुरक्षित कार आहे. चला या कारमध्ये कोणते फीचर्स आहेत, ज्यामुळे ती पॉवरफुल बनते याबद्दल जाणून घेऊया.
हे देखील वाचा: EICMA 2024 मध्ये डोळ्यात भरणारी Royal Enfield Bear 650 लाँच, जाणून घ्या किंमत
अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या कारचे नाव द बीस्ट असे असते. ही कार जगातील सर्वात सुरक्षित कार मानली जाते. एक वृत्तानुसार, या कारवर गोळ्या किंवा बॉम्बचा काहीही परिणाम होत नाही. त्यामुळे याला आर्मर्ड कार म्हणूनही संबोधिले जाते. बॉम्ब हल्ल्यांना तोंड देण्यासाठी अतिरिक्त स्टील प्लेट्ससह ही कार मजबूत केली गेली आहे. एखाद्या हल्ल्यात जर या कारचे टायर खराब जरी झाले तरी या कारला चालण्यास कोणतीही अडचण येणार नाही.
द बीस्टच्या बाहेरील भागाबद्दल बोलायचे झाल्यास, ते 5 इंच जाड असलेल्या मिलिटरी ग्रेड आर्मरने सुसज्ज आहे. त्याचे दरवाजे 8 इंच जाडीचे आहेत. एकदा ते बंद केल्यावर त्याचे दरवाजे पूर्णपणे बंद होतात. हे दरवाजे इतके पॉवरफुल बनवण्यात आले आहे की रासायनिक हल्ल्यांनाही तोंड देण्याची क्षमता आहे. या कारचे दरवाजेच नाही तर खिडक्याही खूप मजबूत आहेत. ते इतके मजबूत आहे की गोळ्यां वर्षाव जरी त्यावर केला तरी याचा काहीही परिणाम होणार नाही.
‘द बीस्ट’ ही अमेरिकन राष्ट्राध्यक्षांची कार अनेक सेफ्टी फीचर्सनी सुसज्ज आहे. या कारमध्ये चक्क शॉटगन आणि अश्रुधुराच्या गोळ्यांचीही व्यवस्था करण्यात आली आहे. त्याचबरोबर यामध्ये राष्ट्रपतींच्या रक्तगटाच्या दोन ब्लड बॅग सुद्धा आपत्कालीन परिस्थितीत ठेवल्या जातात. तसेच ड्रायव्हरच्या सीटजवळ कम्युनिकेशन सेंटर आणि जीपीएस ट्रॅकिंग सिस्टीमही देण्यात आली आहे. कारच्या पुढील बाजूस ग्रीलखाली नाईट व्हिजन कॅमेराही बसवण्यात आला आहे.
या सेफेस्ट कारची किंमत सर्वसामान्यांना धडकी भरवणारी आहे. या बिस्ट नामक कारची किंमत 131 कोटी रुपये एवढी आहे.