फोटो सौजन्य: Social Media
फक्त भारतात नव्हे तर जगभरात रॉयल एन्फिल्डच्या बाईक्स खूप लोकप्रिय आहेत. या बाईक आपल्या आकर्षित लूक आणि दमदार परफॉर्मन्ससाठी ओळखल्या जातात. भारतात तर प्रत्येक तरुणाला रॉयल एन्फिल्डच्या बाईक्सची भूरळ पडली असते. म्हणूनच तर कित्येक जण बुलेटस्वार होण्यासाठी पैश्यांची बचत करण्यास सुरुवात करतात. कंपनी सुद्धा ग्राहकांची हि क्रेज पाहून नवनवीन बाईक लाँच करत असतात.
सध्या इटलीमधील मिलान येथे आयोजित EICMA 2024 होत आहे. याच इव्हेंटमध्ये Royal Enfield ने Bear 650 Scrambler ग्लोबल लॅव्हेलवर लाँच केली आहे. कंपनीची ही बाईक Interceptor 650 वर बेस्ड आहे. ही बाईक अनेक उत्तमोत्तम फीचर्सने सुसज्ज आहे. चला जाणून घेऊया, हे बाईक किती पॉवरफुल आहे आणि त्याची किंमत असणार आहे.
Royal Enfield Bearer 650 Scrambler ची किंमत (एक्स-शोरूम) 3,39,000 रुपयांनी सुरु होते. ही बाईक पाच कलर ऑप्शनमध्ये आणली आहे. या कलर ऑप्शन्सच्या आधारे बाईकची किंमतही बदलत आहे.
Bear 650 ला रेट्रो लूक देण्यात आला आहे, जो तुम्ही Royal Enfield Interceptor 650 मध्ये देखील पाहिला असेल. कंपनीने ही बाईक वेगळी दिसण्यासाठी काही बदल केले आहेत. ज्यामध्ये रंग आणि ग्राफिक्सचा समावेश आहे.
बाईकच्या बाजूच्या पॅनलवर कॉम्पिटिशन नंबर बोर्ड लावण्यात आला आहे, जो बाइकला स्पोर्टी लूक देतो. त्यात आणखी थोडा बदल करून बाईकला मॉडर्न बनविण्यात आले आहे.
यामध्ये कॉम्पॅक्ट दिसणारा 2-इन-1 एक्झॉस्ट वापरण्यात आला आहे. बाईकचे इंजिन क्रँककेस, पिस्टन हेड आणि एक्झॉस्ट एंडला मॅट ब्लॅक फिनिश देण्यात आले आहे, ज्यामुळे बाईकला एक वेगळी ओळख मिळते.
या बाईकमध्ये 648cc एयर आणि ऑइल-कूल्ड पॅरलल-ट्विन मोटर आहे. हे इंजिन 7150rpm वर 47.4 PS ची पॉवर व 5150rpm वर 56.5 Nm चा पीक टॉर्क जनरेट करते.
या रॉयल एन्फिल्डच्या नवीन बाईकमध्ये 4-इंचाचा TFT कन्सोल आहे. कन्सोलमध्ये स्मार्टफोन कनेक्टिव्हिटी आणि गूगल मॅप्सद्वारे संपूर्ण नेव्हिगेशन आणि म्युजिक कंट्रोल यांसारखे फीचर्स देण्यात आले आहेत.
Bear 650 हे ट्विन-क्रेडल फ्रेमवर बांधले गेले आहे, जे 43mm इनव्हर्टेड फोर्क आणि ट्विन-शॉक एब्जॉर्बरशी जोडलेले आहे. यात इनवर्टेड फोर्क 130mm व्हील ट्रॅव्हल आणि ट्विन-शॉक एब्जॉर्बर 115mm व्हील ट्रॅव्हल दिला गेला आहे. Bear 650 चे ग्राउंड क्लीयरन्स 184mm आहे.