फोटो सौजन्य: iStock
आपली स्वतःची कार किंवा बाईक असणे, त्यावर मस्तपैकी लॉंग रूटवर फिरायला जाणे हे प्रत्येकाचे स्वप्न असते. पण पहिले वाहन चालवण्यासाठी ड्रायव्हिंग लायसन्स असणे फार महत्वाचे आहे. कित्येक तरुण 18 वर्षाचे झाल्यावर लगेचच ड्रायव्हिंग लायसन्ससाठी अर्ज करतात. ड्रायव्हिंग लायसन्स आधी आपल्याला लर्निंग लायसन्स मिळत असते. यानंतर अंदाजे 1 महिन्यात आपल्याला RTO कार्यालयात जाऊन ड्रायव्हिंग टेस्ट द्यावी लागते. ही टेस्ट पास झाल्यावरच आपण ड्रायव्हिंग लायसन्ससाठी पात्र ठरतो. हेच ड्रायव्हिंग लायसन्स हरवल्यास अनेक जण गोंधळात पडून जातात आणि नेमके करावे काय याबद्दल त्यांच्या मनात प्रेषण चिन्ह उभा राहतो.
Maruti Suzuki च्या ‘या’ कारसमोर Ertiga सुद्धा आहे फेल, देते दमदार मायलेज
जर तुमचे ड्रायव्हिंग लायसन्स हरवले असेल, तर तुम्हाला नवीन ड्रायव्हिंग लायसन्स काढण्यासाठी जास्त प्रयत्न करण्याची गरज नाही. आज आम्ही तुम्हाला याबद्दलची सर्वात सोपी प्रक्रियेबद्दल सांगणार आहोत, ज्याचे अनुसरण करून तुम्ही सहजपणे पुन्हा एकदा DL बनवू शकता. चला याबद्दल जाणून घेऊया.
सर्वात पहिले तुमच्या जवळच्या पोलीस स्टेशनात जाऊन ड्रायव्हिंग लायसन्स हरवल्याची तक्रार दाखल करा. यावेळी एफआयआरची एक कॉपी स्वतःकडे सुद्धा ठेवा. याच कॉपीची पुढे अर्ज करण्यास गरज भासू शकते.
जिथून तुमचे ड्रायव्हिंग लायसन्स जारी करण्यात आला होता त्या RTO (Regional Transport Office) सोबत संपर्क साधा.
RTO कडून “डुप्लिकेट ड्रायव्हिंग लायसन्स” साठी अर्ज फॉर्म (Form LLD) मिळवा. हा फॉर्म काळजीपूर्वक भरा आणि आवश्यक कागदपत्रे त्यासोबत जोडा.
डुप्लिकेट परवान्यासाठी शुल्क भरा. हे शुल्क राज्यानुसार बदलण्याची शक्यता आहे.
तुमचा फोटो आणि बायोमेट्रिक तपशील आरटीओ कार्यालयात घेतला जाईल. तुमचे डॉक्युमेंट तपासले जातील आणि पडताळले जातील.
वाहतुकीच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या. यानंतर “डुप्लिकेट ड्रायव्हिंग लायसन्स” चा पर्याय निवडा. फॉर्म भरा, महत्वाची कागदपत्रे अपलोड करा आणि फी भरा. यानंतर, लायसन्स पोस्टाद्वारे तुमच्या पत्त्यावर पाठविला जाईल. ही ऑनलाईन प्रक्रिया खूप सोपी आहे. ही प्रोसेस फॉलो करून तुम्ही घरबसल्या ड्रायव्हिंग लायसन्स मिळवू शकता.