फोटो सौजन्य: Social Media
सीएनजी कारची विक्री खूप मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे. वाढत्या पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीमुळे अनेक जण इलेक्ट्रिक कार्ससोबतच सीएनजी कार्सचा सुद्धा विचार करत आहे. यामुळेच तर इलेक्ट्रिक कारसोबतच अनेक ऑटो कंपन्या सीएनजी कार्स सुद्धा मार्केटमध्ये आणत असतात. पण सीएनजी कार चालवताना सावधगिरी बाळगणे महत्वाचे आहे.
राजस्थानातच्या राजधानीत म्हणजेच जयपूरमध्ये एक भीषण अपघात घडला. जयपूर-अजमेर महामार्गावर एका एलपीजी टँकरला सीएनजी ट्रकची धडक बसली. यानंतर एकामागून एक अनेक वाहने एकमेकांवर आदळू लागली. पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास पेट्रोल पंपाजवळ हा अपघात झाला. या भीषण अपघातात आतापर्यंत सात जणांचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आली असून 35 हून अधिक जण रुग्णालयात दाखल आहेत.
सीएनजी वाहने किंवा ट्रक चालवताना विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. तुमची एक छोटीशी चूक एखाद्या मोठ्या अपघाताला आमंत्रण देऊ शकते, ज्यात मृत्यूचाही धोका असतो. जयपूर-अजमेर महामार्गावर, चालकाने चुकीच्या मार्गावर यू-टर्न घेतला आणि दुसऱ्या ट्रकला धडकली, परिणामी स्फोट झाला. परंतु इतरही अनेक कारणे आहेत ज्यांची काळजी न घेतल्यास चालकासह प्रवाशांना त्रास होऊ शकतो. चला त्याबद्दल जाणून घेऊया .
सीएनजी वाहनांमध्ये सेफ्टी फीचर्स असणे महत्त्वाचे आहे. अशा गाड्यांमध्ये लीक डिटेक्शन सिस्टम आणि प्रेशर चेक करण्यासाठीची यंत्रणा असणे आवश्यक आहे. यासोबतच अपघात आणि गॅस गळतीचा धोका कमी करण्यासाठी वाहनात शट-ऑफ व्हॉल्व्ह ठेवणेही बंधनकारक आहे.
वाहनातील हे सर्व सेफ्टी फीचर्स योग्य प्रकारे कार्यरत आहेत याचीही खात्री करण्याची गरज आहे. यासाठी वाहनातील सीएनजी किट, व्हॉल्व्ह आणि सील हे सर्व पूर्णपणे ठीक असले पाहिजेत. यापैकी कोणतेही उपकरण खराब झाल्यास ते त्वरित दुरुस्त करावे.
नवीन Bajaj Chetak 35 सिरीज लाँच, अनेक अॅडव्हान्स फीचर्ससह मिळाली जबरदस्त रेंज
सीएनजी वाहनांमधून प्रवास करणाऱ्या चालक आणि प्रवाशांनीही सुरक्षिततेच्या मार्गदर्शक तत्त्वांबाबत जागरूक असले पाहिजे. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीला कसे सामोरे जावे याचाही यात समावेश आहे.
तुम्ही तुमची सीएनजी कार ज्या गॅरेजमध्ये पार्क करत आहात त्या गॅरेजमध्ये व्हेंटिलेशन असणे महत्त्वाचे आहे. पार्किंगसाठी चांगली जागा असल्याने सीएनजीमधून निघणारा धूर गॅरेजमध्ये अडकणार नाही आणि बाहेर येण्यासाठी योग्य जागाही मिळेल.
वाहनात सीएनजी भरताना, हे लक्षात ठेवा की इंधन प्रमाणित सीएनजी फिलिंग स्टेशनवरूनच भरावे.
तुमच्यासाठी आपत्कालीन संपर्क क्रमांक असणे देखील महत्त्वाचे आहे. सीएनजीशी संबंधित कोणतीही दुर्घटना किंवा समस्या उद्भवल्यास, तुम्ही आपत्कालीन क्रमांकावर संपर्क साधू शकता आणि मदत मागू शकता.