फोटो सौजन्य: Social Media
देशात अशा अनेक कार्स आहेत ज्या त्यांच्या परफॉर्मन्ससाठी ओळखल्या जातात. या कार्स मार्केटमध्ये लोकप्रिय तर आहेतच पण याव्यतिरिक्त त्यात मोठी फॅमिली सुद्धा सहज बसू शकते. ग्राहक कुठलीही कार खरेदी करताना एक गोष्ट लक्षात ठेवतात ती म्हणजे कारमधील स्पेस. कारण याच स्पेसमध्ये अनेक जणांसाठी असणारी ऐसपैस जागा महत्वाची असते.
आज देशात अनेक ऑटो कंपन्यांनी उत्तम आणि कम्फर्टेबल कार्स उपलब्ध करून दिल्या आहेत. यातीलच एक कंपनी म्हणजे मारुती सुझुकी. मारुती सुझुकीने देशात स्वस्तात मस्त अशा किती तरी कार्स ऑफर केल्या आहेत. यातील काही कार्स तर लाँच होऊन वर्ष उलटली आहेत तरी सुद्धा आजही मार्केटमध्ये त्यांची मागणी कमी होताना दिसत नाही आहे. आज आपण अशाच एका कारबद्दल जाणून घेणार आहोत, ज्याला अनेक वर्षांपासून ग्राहकांचे प्रेम मिळत आहे.
बाईक असो वा स्कूटर, कधीच करू नका टाकी फुल्ल, होऊ शकते भीषण घटना, जाणून घ्या कारणं
मारुती ही देशातील नंबर वन कार कंपनी आहे. कंपनीकडे प्रत्येक सेगमेंटमधील वाहने आहेत ज्यांना भारतात आणि भारताबाहेर जास्त मागणी आहे. कंपनीच्या लाइनअपमध्ये एक वाहन असे देखील आहे ज्याची किंमत फक्त 5.32 रुपये आहे. या कारमध्ये 7 लोकांचे कुटुंब आरामात बसू शकते. ही कार भारतात खूप लोकप्रिय आहे. तसेच या कारचा मायलेज देखील चांगला आहे. मारुती सुझुकी इको (Maruti Suzuki Eeco) असे या कारचे नाव आहे. ही एक लोकप्रिय 7 सीटर कार आहे. या इको कारचा उपयोग अनेक वेळा स्कूल व्हॅन म्हणून केला जातो.
Maruti Suzuki Eeco कंपनी खाजगी आणि कार्गो व्हेरियंटमध्ये विकली जाते. या कारचा विविध उपयोगांसाठी वापर करता येतो. डिलिव्हरी व्हॅन, स्कूल व्हॅन आणि ॲम्ब्युलन्स म्हणून ही 7 सीटर कार बाजारात खूप लोकप्रिय आहे. याशिवाय, या कारमध्ये मोठी स्पेस देखील आहे. फॅक्टरी फिटेड सीएनजी किटमुळे या कारला जबरदस्त मायलेजही मिळाला. त्याच्या बेस व्हेरियंटची किंमत 5.27 लाख रुपयांपासून सुरू होते आणि टॉप व्हेरियंटसाठी 6,53,000 रुपयांपर्यंत जाते.
मारुती सुझुकी Eeco मध्ये 1.2 लीटर नॅचरली एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन आहे जे 81 PS पॉवर आणि 104.4 Nm टॉर्क निर्माण करते. हे इंजिन 5-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्ससह जोडलेले आहे. ही कार पेट्रोलमध्ये 19.71 किमी प्रति लीटर मायलेज देते, तर सीएनजीमध्ये ती 26.78 किमी प्रति किलो मायलेज देऊ शकते. त्यामुळेच अनेक ग्राहकांची पहिली पसंती ही मारुती सुझुकीच्या इको कारलाच असते.