फोटो सौजन्य: Social Media
आपली स्वतःची कार विकत घेणे हा आयुष्यातील अनेक सुखद क्षणांपैकी एक क्षण आहे. अनेक जण कार खरेदी करताना लोनची मदत घेताना दिसतात. त्यातही आता मार्केटमध्ये इलेक्ट्रिक कार्सला चांगली मागणी मिळत असल्यामुळे ग्राहक या कार्स खरेदी करण्याकडे सुद्धा विशेष लक्ष देताना दिसत आहे.
गेल्या काही महिन्यांपासून भारतीय मार्केटमध्ये एमजी मोटर्सची Windsor EV मोठ्या प्रमाणात विकली जात आहे. या कारमध्ये असणारे फीचर्स आणि त्याचा दमदार परफॉर्मन्स ग्राहकांना आकर्षित करत आहे. जर तुम्ही सुद्धा ही इलेक्ट्रिक कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. आज आपण जाणून घेऊया की एमजी विंडसर ईव्ही एक्सक्लुझिव्ह व्हेरियंट खरेदी करण्यासाठी जर तुम्ही 3 लाखाचे डाउन पेमेंट केले तर तुम्हाला किती EMI द्यावा लागू शकतो, त्याबद्दल जाणून घेऊया. पण त्याआधी या कारची किंमत सुद्धा माहित असणे महत्वाचे.
JSW MG ने CUV सेगमेंटमध्ये Windsor EV ला आणले आहे. या कारचे मिड-व्हेरियंट एक्सक्लुझिव्ह कंपनीने भारतीय बाजारपेठेत 14,49,800 रुपयांच्या एक्स-शोरूम किंमतीवर ऑफर केली आहे. ही कार दिल्लीत खरेदी केल्यास 7330 रुपये आरटीओला भरावे लागतील, 75 हजार रुपयांचा विमा, 14498 रुपयांचा टीसीएस चार्ज भरावा लागेल. त्यानंतर MG Windsor EV Excite ची रोडची किंमत 1546628 रुपये इतकी आहे.
जर तुम्ही या कारचे एक्सक्लुझिव्ह व्हेरियंट विकत घेतले, तर बँकेकडून फक्त कारच्या एक्स-शोरूम किंमतीवर फायनान्स केले जाईल. अशा परिस्थितीत, 3 लाखांचे डाउन पेमेंट केल्यानंतर, तुम्हाला बँकेकडून सुमारे 12.46 लाख रुपये फायनान्स करावा लागेल. जर बँकेने तुम्हाला 9 टक्के व्याजासह सात वर्षांसाठी 12.46 लाख रुपये दिले, तर तुम्हाला पुढील सात वर्षांसाठी प्रत्येक महिन्याला 20057 रुपयांचा ईएमआय भरावा लागेल.
40 वर्षात पहिल्यांदाच Tata ने Maruti दिला झटका! WagonR ला मागे सारत ही SUV बनली नंबर एक कार
जर तुम्ही बँकेकडून 12.46 लाख रुपयांचे कार कर्ज सात वर्षांसाठी 9 टक्के व्याजदराने घेतले तर तुम्हाला सात वर्षांसाठी दरमहा 20057 रुपयांचा ईएमआय भरावा लागेल. अशा परिस्थितीत, MG Windsor EV च्या मिड व्हेरियंट एक्सक्लुसिव्हसाठी तुम्हाला सात वर्षांत सुमारे 4.38 लाख रुपये व्याज म्हणून द्यावे लागतील. त्यानंतर या कारची एक्स-शोरूम, ऑन-रोड आणि व्याजासह एकूण किंमत सुमारे 19.84 लाख रुपये होईल.
एमजी मोटर्सची ही कार Tata Nexon EV, Tata Curvv EV आणि Mahindra च्या XUV 400, BE 6e सारख्या SUV ला आव्हान देते.