फोटो सौजन्य: Social Media
भारतात येत्या 17 जानेवारीला Bharat Mobility 2025 हा ऑटो एक्स्पो आयोजित करण्यात आला आहे. या ऑटो एक्स्पोमध्ये अनेक वाहन उत्पादक कंपन्या सहभागी होणार आहे. तसेच या कार्यक्रमात अनेक उत्तम आणि दर्जेदार कार्स लाँच होणार आहे. त्यामुळेच अनेक कार्सप्रेमींचे लक्ष या कार्यक्रमाकडे लागलेले आहे.
याच ऑटो एक्स्पोमध्ये आता ह्युंदाईची इलेक्ट्रिक क्रेटा लाँच होणार आहे. कंपनीने ही कार लाँच करण्यापूर्वी त्याचे तंत्रज्ञान, फीचर्स आणि सेफ्टी फीचर्सची माहिती जारी केली आहे. त्यात कोणत्या प्रकारचे तंत्रज्ञान आणि फीचर्स दिले जातील, त्याबद्दल आज आपण जाणून घेऊया.
Hyundai द्वारे Creta EV मध्ये सर्वोत्तम तंत्रज्ञान दिले जाईल. कंपनीकडून मिळालेल्या माहितीनुसार, त्यात इन कार पेमेंट देखील दिले जाईल. जेणेकरून चार्जिंगच्या वेळी इन्फोटेनमेंट स्क्रीनवरून पेमेंट करता येईल. याशिवाय डिजिटल की, शिफ्ट बाय वायर, सिंगल पेडल ड्राईव्ह, व्हेईकल टू लोड असे तंत्रज्ञान या कारमध्ये देण्यात येणार आहे.
कार उत्पादक कंपन्याच्या पाठोपाठ आता ‘या’ इलेक्ट्रिक स्कूटर कंपनीने सुद्धा वाढवल्या किंमती
Hyundai Creta EV मध्ये कंपनीकडून अनेक उत्तम फीचर्स देखील दिली जातील. यात अॅडव्हान्स क्लायमेट कंट्रोल, बोसची 8 स्पीकर ऑडिओ सिस्टीम, 10.25 इंच ड्युअल कर्व्हिलिनियर स्क्रीनसह एचडी इन्फोटेनमेंट, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, कूल्ड ग्लोव्ह बॉक्स, 268 भाषांमधील व्हॉईस कमांड, पॅनोरॅमिक सनरूफ, ह्युंदाई ब्लूलिंक कनेक्टिव्हिटी यांसारखी फीचर्स पाहायला मिळतील.
Hyundai Creta EV मध्ये प्रवाशांच्या सुरक्षेवरही खूप लक्ष दिले जाईल. यामध्ये उच्च शक्तीचे स्टील वापरले जाणार आहे. याशिवाय, यात 19 सेफ्टी फंक्शन्ससह लेव्हल-2 ADAS, सहा एअरबॅग्ज, ऑल व्हील डिस्क ब्रेक, EPB, ऑटो होल्ड, हिल होल्ड असिस्ट, ESC, VSM, Isofix चाइल्ड अँकरेज, TPMS सारखी सेफ्टी फीचर्स मिळतील. यासोबतच SVM, BVM, रेन सेन्सिंग वायपर, पार्किंग सेन्सर हे सेफ्टी फीचर्स म्हणून दिले जाणार आहेत.
40 वर्षात पहिल्यांदाच Tata ने Maruti दिला झटका! WagonR ला मागे सारत ही SUV बनली नंबर एक कार
क्रेटाचे इलेक्ट्रिक व्हर्जन कंपनी 17 जानेवारी 2025 रोजी ऑटो एक्सपो 2025 मध्ये लाँच करेल.
Hyundai Creta electric SUV च्या एक्स-शोरूम किंमतीची नेमकी माहिती लाँचच्या वेळी उपलब्ध होईल. पण त्याची संभाव्य एक्स-शोरूम किंमत 20 ते 25 लाख रुपये असू शकते अशी अपेक्षा आहे.
मारुती ग्रँड विटारा इलेक्ट्रिक देखील ऑटो एक्सपो 2025 मध्येच लाँच केली जाईल. त्यानंतर Hyundai Creta EV थेट मारुती ग्रँड विटारा इलेक्ट्रिक, JSW MG ZS EV, Tata Curvv EV सारख्या इलेक्ट्रिक SUV शी स्पर्धा करेल.