फोटो सौजन्य: Social Media
भारतीय बाजारात अनेक उत्तम कार उत्पादक कंपन्या आहेत, ज्या बेस्ट आणि चांगला परफॉर्मन्स देणाऱ्या कार्स ऑफर करत असतात. यातीलच एक विश्वासाचे नाव म्हणजे टाटा मोटर्स. टाटा मोटर्सने देशात बेस्ट कार्स ऑफर केल्या आहेत. यामुळेच तर ग्राहक सुद्धा टाटाच्या कार्स खरेदी करताना डोळे झाकून विश्वास ठेवत असतात. कंपनीच्या अनेक बेस्ट कार्स सध्या मार्केटमध्ये उपलब्ध आहे. त्यातीलच एक म्हणजे टाटा हॅरियर.
टाटा हॅरियर आपल्या दमदार परफॉर्मन्ससाठी ओळखली जाते. तुम्ही कंपनीच्या मध्यम आकाराच्या एसयूव्ही टाटा हॅरियरचे बेस व्हेरियंट स्मार्ट डिझेल खरेदी करण्याचा विचार करत असाल आणि 3 लाख रुपये डाऊन पेमेंट केल्यानंतर कार घरी आणू इच्छित असाल, तर तुम्हाला दरमहा किती ईएमआय भरावा लागेल? हे आपण या बातमीत जाणून घेणार आहोत. पण त्याआधी या कारच्या बेस व्हेरियंटची किंमत जाणून घेऊया.
Tata Motors ने Tata Harrier चे बेस व्हेरियंट म्हणून स्मार्ट ऑफर केले आहे. याची एक्स-शोरूम किंमत 14.99 लाख रुपये आहे. ही कार राजधानी दिल्लीत खरेदी केल्यास आरटीओसाठी सुमारे 1.95 लाख रुपये आणि विम्यासाठी सुमारे 71 हजार रुपये मोजावे लागतील. यासोबतच टीसीएस चार्ज म्हणून 15,000 रुपये शुल्कही घेतले जाईल. त्यानंतर रस्त्यावरील टाटा हॅरियर स्मार्ट डिझेलची किंमत सुमारे 17.80 लाख रुपये होते.
जर तुम्ही या कारचे बेस व्हेरियंट स्मार्ट डिझेल खरेदी केले, तर बँकेकडून फक्त एक्स-शोरूम किंमतीवर फायनान्स केले जाईल. अशा परिस्थितीत, 3 लाख रुपयांचे डाउन पेमेंट केल्यानंतर, तुम्हाला बँकेकडून सुमारे 14.80 लाख रुपयांचे फायनान्स करावे लागेल. जर बँक तुम्हाला 9 टक्के व्याजासह सात वर्षांसाठी 14.80 लाख रुपये देत असेल, तर तुम्हाला पुढील सात वर्षांसाठी दरमहा 23821 रुपयांचा ईएमआय भरावा लागेल.
‘या’ आहेत भारतातील सर्वात स्वस्त स्पोर्ट्स बाईक, किंमत 2 लाखांपेक्षा कमी
जर तुम्ही बँकेकडून 14.80 लाख रुपयांचे कार लोन सात वर्षांसाठी 9 टक्के व्याजदराने घेतले तर तुम्हाला सात वर्षांसाठी दरमहा 23821 रुपयांचा ईएमआय भरावा लागेल. अशा स्थितीत, तुम्ही टाटा हॅरियर स्मार्ट डिझेलसाठी सात वर्षांत सुमारे 5.20 लाख रुपये व्याज द्याल. त्यानंतर तुमच्या कारची एक्स-शोरूम, ऑन-रोड आणि व्याजासह एकूण किंमत सुमारे 23 लाख रुपये असेल.
टाटा मोटर्स हॅरियरला एक पॉवरफुल एसयूव्ही म्हणून ऑफर करते. या कारची थेट स्पर्धा मारुती ग्रँड विटारा, टोयोटा अर्बन क्रूझर हायराईडर, ह्युंदाई क्रेटा, किया सेल्टोस यांसारख्या सर्वोत्तम एसयूव्हीशी आहे.