फोटो सौजन्य: Social Media
कुठलीही कार विकत घेताना पूर्वी कारच्या किंमतीवर जास्त लक्ष दिले जायचे. पण आजही स्थिती बदलावी आहे. आजचा ग्राहक किंमतीसोबतच कारच्या सेफ्टीवर सुद्धा विशेष लक्ष देताना दिसतो. म्हणूनच कित्येक ऑटो कंपन्या हल्लीच्या कार्समध्ये अत्याधुनिक सेफ्टी फीचर्स समाविष्ट करताना दिसत आहे. काही कार्सची NCAP क्रॅश टेस्ट देखील होत असते, ज्यात त्यांना सेफ्टी रेटिंग्स देण्यात येतात. या क्रॅश टेस्टवर अनेक ग्राहकांचे बारीक लक्ष असते. काही लोकं तर याच टेस्टच्या रिझल्ट्सवर कार खरेदी करत असतात. चला आज आपण जाणून घेऊया, कोणत्या कार्सची क्रॅश टेस्ट झाली आहे आणि त्याचे रिझल्ट्स काय होते.
नवीन जनरेशनची मारुती डिझायर नुकतीच भारतीय बाजारपेठेत दाखल झाली आहे. लाँच होण्यापूर्वी त्याच्या जागतिक NCAP टेस्ट झाल्या. याला ग्लोबल NCAP क्रॅश टेस्टमध्ये अडल्ट ऑक्यूमेंट प्रोटेक्शनमध्ये 5-स्टार सुरक्षा रेटिंग आणि लहान मुलांच्या संरक्षणामध्ये 4 स्टार्स मिळाले आहेत. यामुळे 5-स्टार ग्लोबल NCAP रेटिंग प्राप्त करणारी मारुती सुझुकीची ही पहिली कार ठरली आहे. या कारला अडल्ट ऑक्यूमेंट प्रोटेक्शनमध्ये 34 पैकी 31.24 गुण मिळाले आहेत आणि चिल्ड्रन ऑक्यूमेंट प्रोटेक्शनमध्ये 49 पैकी 39.20 गुण मिळाले आहेत.
मारुतीची पहिली इलेक्ट्रिक कार eVitara चा टिझर रिलीज, Bharat Mobility 2025 मध्ये होऊ शकते सादर
महिंद्राच्या बोलेरो निओला ग्लोबल NCAP टेस्टिंगमध्ये प्रौढ आणि लहान मुलांच्या संरक्षणासाठी 1 स्टार मिळाला आहे. महिंद्रा बोलेरो निओने अडल्ट ऑक्यूमेंट प्रोटेक्शनमध्ये 34 पैकी 20.26 गुण आणि लहान मुलांच्या संरक्षणात 49 पैकी 12.71 गुण मिळवले आहेत.
अलीकडेच Honda Amaze ची नवीन जनरेशन भारतात लाँच झाली आहे. तथापि, त्याच्या नवीन जनरेशनची ग्लोबार क्रॅश टेस्टिंग घेण्यात आलेली नाही. त्याच वेळी, त्याच्या जुन्या जनरेशनने अडल्ट ऑक्यूमेंट प्रोटेक्शनमध्ये 2-स्टार सेफ्टी रेटिंग आणि मुलांच्या ऑक्यूमेंट प्रोटेक्शनमध्ये शून्य स्टार्स मिळाले आहे. या कारला अडल्ट ऑक्यूमेंट प्रोटेक्शनमध्ये 34 पैकी 27.85 गुण आणि चिल्ड्रन ऑक्यूमेंट प्रोटेक्शनमध्ये 49 पैकी 8.58 गुण मिळाले आहेत.
Year Ender 2024: ‘या’ आहेत 2024 मधील सर्वात Best SUV, लाँच होताच ग्राहकांची बुकिंगसाठी झुंबड
Tata Nexon फेसलिफ्टला ग्लोबल NCAP कडून 5-स्टार सुरक्षा रेटिंग मिळाले आहे. त्याला अडल्ट ऑक्यूमेंट प्रोटेक्शनमध्ये 34 पैकी 32.22 गुण मिळाले आहेत आणि चिल्ड्रन ऑक्यूमेंट प्रोटेक्शनमध्ये 49 पैकी 44.52 गुण मिळाले आहेत.
या इलेक्ट्रिक हॅचबॅकची 2024 मध्ये ग्लोबल NCAP द्वारे क्रॅश-टेस्टिंग करण्यात आली होती, ज्यामध्ये त्याला चिल्ड्रन ऑक्यूमेंट प्रोटेक्शनमध्ये झीरो स्टार्स आणि लहान मुलांच्या संरक्षणात 1 स्टार्स मिळाला आहे. त्याच वेळी, अडल्ट ऑक्यूमेंट प्रोटेक्शनमध्ये 34 पैकी 20.86 गुण आणि चिल्ड्रन ऑक्यूमेंट प्रोटेक्शनमध्ये 49 पैकी 10.55 गुण मिळाले आहेत.