फोटो सौजन्य: iStock
देशात बाईक विक्री खूप मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे. यामुळे दुचाकी उत्पादक कंपन्या सुद्धा दमदार फीचर्स असणाऱ्या बाईक लाँच करत आहे. खरंतर आपल्या स्वतःच्या बाईकवर रायडींग करण्याची बातच काही और आहे. पण बाईक राइड करून झाल्यानंतर अशा अनेक गोष्टी असतात, ज्या नंतर नजरेस येत असतात. त्यापैकीच एक गोष्ट म्हणजे बाईकमधून येणारा टिकटिक आवाज.
EV स्वस्त होणार? लिथियम बॅटरीत वापरली जाणारी कोबाल्ट पावडर स्वस्त, अर्थमंत्र्यांची घोषणा
ज्यांना बाईक चालवण्याची आवड आहे, ते रस्त्यावर खूप मजा करून बाईक चालवतात. तुम्हीही तुमची बाईक अशीच चालवत असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. कारण अशाप्रकारे बाईक चालवल्यानंतर तुम्ही ती पार्क करता तेव्हा त्याच्या इंजिनमधून एक विचित्र आवाज येतो, जो टिक टिक करण्यासारखा असतो. हा आवाज ऐकल्यानंतर तुमच्या मनात अनेक प्रश्न उद्भवू शकतात की हा आवाज का येतो. चला हा आवाज येण्यामागचे कारण जाणून घेऊया.
जेव्हा तुम्ही तुमच्या बाईकवरून लांबचा प्रवास करता आणि ती कुठेतरी थांबवता तेव्हा त्यातून एक टिकटिक आवाज येऊ लागतो. बाईकवरून लांबचा प्रवास केल्यानंतर इंजिन गरम झाल्यावर हा आवाज येतो. जेव्हा इंजिन हळूहळू थंड होते, तेव्हा टिकटिक आवाज देखील थांबतो.
दुचाकीच्या सायलेन्सरमधून धुराच्या स्वरूपात हानिकारक पदार्थ बाहेर पडतात, ज्यामध्ये कार्बन मोनोऑक्साइड देखील असतो. याशिवाय त्यात हायड्रोकार्बन आणि नायट्रोजन ऑक्साईड देखील असते. यामुळे, बाईकच्या सायलेन्सरमध्ये एक कॅटॅलिटिक कन्व्हर्टर बसवले जाते. हे कन्व्हर्टर या हानिकारक पदार्थांसह एकत्रित होते आणि कार्बन मोनोऑक्साइडचे कार्बन डायऑक्साइडमध्ये रूपांतर करते.
होंडाच्या ‘या’ कार झाल्या महाग; इतक्या रुपयांनी झाली किमतीत वाढ, नवीन किंमत काय?
बराच वेळ बाईक चालवल्यानंतर सायलेन्सर गरम होतो, ज्यामुळे कन्व्हर्टरमधील पाईप्स गरम होतात. गरम झाल्यानंतर पाईपचा विस्तार होतो. जेव्हा बाईकचा पाईप थंड होऊ लागतो तेव्हा तो हळूहळू आकुंचन पावू लागतो. त्यात अनेक थर असतात, जे वेगवेगळ्या वेगाने थंड होतात. या काळात ते एकमेकांवर घासतात. जेव्हा ते एकमेकांवर घासतात तेव्हा इंजिन थंड होत असते. या प्रक्रियेमुळे बाईकमधून टिकटिक आवाज येतो.
बाईकमधून येणारा टिकटिक आवाज बहुतेकदा फक्त नवीन सिरीजमधील वाहनांमध्येच ऐकू येतो. जुन्या बाईकमध्ये तुम्हाला हा आवाज ऐकू येत नाही. बाईकमधून येणारा टिकटिक आवाज फक्त BS4 आणि BS6 बाईकमधून येतो. खरंतर, अलिकडच्या काळात लाँच होणाऱ्या बाईकमध्ये कॅटॅलिटिक कन्व्हर्टर बसवलेले असते, जे गरम झाल्यावर फैलावतो आणि नंतर थंड झाल्यावर टिकटिक आवाज करू लागते.