Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘बहुरुपी’अशोक सराफची पंच्याहत्तरी

४ जून रोजी अशोक सराफआपल्या वयाची पंचाहत्तरी पूर्ण करीत आहे. जन्म ४ जून १९४७ चा. अशोक सराफला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. खरं तर अशोक सराफचा अभिनय ‘प्रवास’थोडक्यात सांगता येणारा नाही हेच त्याचे मोठे यश आहे.

  • By Aparna Kad
Updated On: May 29, 2022 | 01:08 PM
‘बहुरुपी’अशोक सराफची पंच्याहत्तरी
Follow Us
Close
Follow Us:

एकदा मी सचिन पिळगावकरला विचारले, तुझ्या दिग्दर्शनातील चित्रपटात अशोक सराफ असणे हे अगदी हुकमी झाले आहे, यामागचे कारण काय?

माझ्या दिग्दर्शनातील पहिला चित्रपट ‘मायबाप’ या चित्रपटाच्या वेळीचमाझी अशोक सराफशी मैत्री झाली. त्यानंतर मी दिग्दर्शिलेल्या ‘सव्वा शेर ‘मध्ये माझी भूमिका नव्हती. पण अशोक सराफची दुहेरी भूमिका होती.माझ्यापेक्षा अशोक सराफ दहा वर्षांनी मोठा आहे. अधिक मॅच्युअर्ड आहे. त्याज्या पध्दतीने स्वतःचा फिटनेस जपला आहे आणि कारकिर्दीला आकार दिला आहे, यासाठी मी त्याचे विशेष कौतुक करतो… सचिन पिळगावकर म्हणाला.

यावेळी ही गोष्ट सांगण्याचे विशेष कारण म्हणजे, ४ जून रोजी अशोक सराफआपल्या वयाची पंचाहत्तरी पूर्ण करीत आहे. जन्म ४ जून १९४७ चा.   अशोकसराफला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. खरं तर अशोक सराफचा अभिनय “प्रवास”थोडक्यात सांगता येणारा नाही हेच त्याचे मोठे यश आहे.

माझा अशोक सराफशी  तब्बल चाळीस वर्षांचा अतिशय निकटचा संबंध आहे.

मराठी चित्रपट तर झालेच पण अगदी रंगभूमी आणि दूरचित्रवाणी  अशातीनही माध्यमातून आपल्या ‘बहुरुपी बहुरंगी बहुढंगी ‘ अशा वाटचालीने उत्तमठसा उमटवण्यात यशस्वी ठरलेला  एक कलाकार म्हणजे अशोक सराफ. अभिनयक्षेत्रातील  त्याच्या  वाटचालीने पन्नाशी पार केली आहे.

अशोक सराफबद्दल काही गोष्टी थोडक्यात सांगायचा प्रयत्न करतो,  संपूर्ण नाव अशोक लक्ष्मण सराफ. तो  मूळचा  बेळगावचा . तर गोव्यातील शांतादुर्गा ही त्याची देवी. लहानपणी  चिखलवाडीत राह्यचा तेव्हा  त्याच्यासमोरच्या सोसायटीत सुनील गावसकर राह्यचे. त्यामुळे शालेय वयात हे दोघेएकत्रपणे ‘गल्ली क्रिकेट ‘ खेळलेत. अगदी स्थानिक बालनाट्यातही भूमिकासाकारलीय.  गिरगावातील गोखले एज्युकेशन सोसायटीच्या अर्थात डी जी. टी.हायस्कूलमधून अकरावी शालांत परीक्षेपर्यंत शिकल्यावर मग चौपाटीच्या विल्सनकॉलेजमध्ये बी. ए. पर्यंत मजल मारली. त्याचे मामा गोपिनाथ सावकार यांचीस्वतःची नाटक कंपनी असल्याने तो बालपणापासूनच नाटकाच्या वातावरणात वाढला.अगदी सहा वर्षांचा असतानाच एका एकांकिकेत सहभाग घेऊन रौप्य पदक पटकावले. तेअजूनही जपून ठेवलयं. काही वर्षातच मामाच्या ‘संशयकल्लोळ ‘या नाटकातहीभूमिका साकारली. शाळेत गॅदरींगमध्ये कायमच पुढे. पण आपल्या शाळेचेप्रिन्सिपल दातार सर यांचा  तो  छान नक्कल करत.

कॉलेजमध्ये असताना आंतर काॅलेज नाट्य स्पर्धा गाजवल्या. याच काळात म्हणजेवयाच्या १७\१८ व्या वर्षी व्यावसायिक रंगभूमीवर पाऊल टाकले. पहिलचं नाटक ‘ययाती आणि देवयानी ‘. अशातच १९६८ साली तो स्टेट बँकेत नोकरीला लागला. तेथेनट आणि नाटककार रमेश पवार यांची भेट झाली. दोघांनी मिळून ‘एकटा ‘ हीएकांकिका सादर केली. अशी वाटचाल सुरु असतानाच १९७१ साली निर्माता आणिदिग्दर्शक गजानन जागिरदार यांच्या ‘दोन्ही घरचा पाहुणा ‘ या चित्रपटातसॅनेटरी इन्स्पेक्टरची भूमिका मिळाली. ही छोटीशीच भूमिका होती आणि याचाकरियरसाठी फारसा फायदा झाला नाही. १९७२ साली ‘ हिमालयाची सावली ‘ यानाटकाने अशोक सराफ अभिनयाच्या क्षेत्रात स्थिरावत गेला, पण त्यांच्याकरियरने मोठा टेक ऑफ घेतला तो दादा कोंडके यांच्या ‘पांडू हवालदार ‘ याचित्रपटातील सखाराम हवालदार या भूमिकेतून! १९७५ ची ही गोष्ट. हा चित्रपटसुपर हिट तर ठरलाच पण तेराव्या महाराष्ट्र राज्य चित्रपट महोत्सवातसर्वोत्कृष्ट विशेष अभिनेत्याचा पुरस्कारही अशोक सराफ यांनी पटकावला. पणकाय गंमत पहा, अगदी आजही अशोक सराफ म्हटले की ‘पांडू हवालदार ‘मधील त्याचीसखाराम हवालदार ही व्यक्तिरेखा असे समीकरण पहिलं आठवतं. ‘शेंटिंमेंटल ‘ याचित्रपटात त्याने पोलीस साकारला तेव्हाही ‘पांडू हवालदार ‘ची चर्चा रंगली.

दूरचित्रवाणीच्या छोट्या पडद्यावरील ‘हम पांच’ सारख्या मालिकेमध्येहीत्याने  अभिनय केला.  अशोक सराफ हा एक मराठीतील हुकमी प्रेक्षकवर्ग निर्माणकेलेला स्टार आहे.  अभिनेत्री निवेदिता जोशी ह्या सराफच्या पत्नी असूनत्यांना एक मुलगा आहे. अशोक सराफची वैशिष्ट्ये बरीच आहेत. अष्टपैलूअदाकारी, उत्कृष्ट अभिनय, सहज विनोद प्रवृत्ती, अचूक टायमिंग, चेहऱ्यावरीलकमालीचे हावभाव ही त्यांच्या अभिनयाची वैशिष्ट्य होत.

चित्रपटक्षेत्रात मामा या नावाने अशोक सराफ  प्रसिद्ध आहे त्याचा एक किस्सा आहे.एकदा तो कोल्हापूरमध्ये शूटिंग करीत असताना त्याचा एक चाहता आपल्या मुलीलाघेऊन तेथे आला. त्या मुलीने अशोक सराफ यांजकडे बोट दाखवत विचारलं हे कोण? त्या चाहत्याने सहज म्हटले, ते मामा!… आणि त्या दिवसापासून तो मराठीचित्रपटसृष्टीत मामा म्हणून ओळखला जाऊ लागला .

अशोक सराफच्या काही  वैशिष्ट्यपूर्ण भूमिकांचा उल्लेख हवाच. दादा कोंडकेयांच्या ‘पांडू हवालदार’मधील इरसाल पोलीस, ‘राम राम गंगाराम’मधील म्हमद्याखाटीक, तसेच गोंधळात गोंधळमधला पॅन्टवाला मदन, अरे संसार संसारमधलाडॅम्बीस, स्री लंपट सावकार, गुपचूप गुपचूपमधला प्रोफेसर धोंड, तो गोव्याचाअसल्याने मध्येच त्याचे ‘किन्या गो’ असे म्हणणे. ‘कशाला उद्याची बात ‘मधीलअत्यंत लाचार, अगतिक असा विमा एजंट, ‘सगे सोयरे ‘मधला एक नंबरचा बेवडेबाजअप्पा सोनार, ‘एक डाव भुताचा ‘मधील खंडोजी भूत,  गुलछडी या चित्रपटातीलविनोदी ढंगाचा नायक गजा, या चित्रपटात त्याने चक्क लुगडे नेसलेय, बिनकामाचानवरामधील इरसाल नवरा, कुलस्वामिनी अंबाबाई या चित्रपटातील सासूरवाडीतराहणारा, ‘जुगलबंदी ‘ या चित्रपटातील खलनायक, ‘खरा वारसदार ‘ याचित्रपटातील वेडा, ‘वजीर’मधील कावेबाज धूर्त मुख्यमंत्री  आणि ‘बहुरुपी ‘मधील विविध सोंगं घेऊन हसवणे, करमणूक करणे असा सावळ्या नावाचा युवक, ज्याच्या पत्नीचा अकाली अंत झाला आहे आणि पाच वर्षाचा त्याला मुलगा आहे. पणजवळ अजिबात पैसा नाही. औषधाअभावी त्याचा मुलगा तडफडून मृत्यू पावतो.

अशाबहुढंगी भूमिका त्याने लीलया साकारल्या. मराठी रसिकांच्या गळ्यातील ताईतअसणाऱ्या अशोक सराफ यांचा नाटक, सिनेमा आणि दूरचित्रवाणी या त्रिस्थळीझपाटल्यासारखं परन्तु दर्जेदार काम केले, आजही करतोय   आणि प्रत्येकमाध्यमात त्याने  अभिनयाची पारितोषिके व पुरस्कार मिळविले आहेत. विशेषम्हणजे १९८४ सालच्या महाराष्ट्र राज्य चित्रपट महोत्सवात अशोक सराफचीभूमिका असलेले सव्वा शेर, ठकास महाठक, श्रध्दा, हेच माझे माहेर, बिनकामाचानवरा, बहुरुपी, गुलछडी वगैरे मिळून एकूण ११ चित्रपट होते हे विशेषच आहे.

चित्रपटातअखंड बडबड करणारी विनोदी पात्रे साकारणारा अशोक सराफ याचा स्वभाव मात्रशांत व केवळ मित्र-मंडळीतच मिसळणारा आहे. खरं तर अशोक सराफला कामापुरतंबोलकं करता येईल, पण इतरवेळी त्याच्याशी चांगले संबंध असले तरच तो मनापासूनबोलणार.

ऐंशीच्या दशकात लक्ष्मीकांत बेर्डेसमवेतत्याची जोडी प्रचंड गाजली आणि या जोडगोळीने मुंबई ते माॅरीशस, धूम धडाका, अशी ही बनवाबनवी  अशा अनेक मराठी चित्रपटात भूमिका साकारल्या. तरकालांतराने त्याने रंगभूमीवर पुनरागमन करताना

‘अनधिकृत’ नाटकात भूमिका साकारली.  ‘मनोमिलन’नंतर  अशोक सराफने  सारखं छातीत दुखतंय!या विनोदी नाटकात भूमिका केली.  पत्नील निवेदिता जोशीसोबत त्यांनी एकनिर्मिती संस्था स्थापन करुन ‘टन टना टन’ (मराठी) व काही हिंदी मालिकाबनवल्या. “हम पांच” या झी वाहिनीवरील हिंदी मालिकेने त्यांना विशेषलोकप्रियता मिळवून दिली. हिंदी चित्रपटसृष्टीत त्याने ‘दामाद’,  याचित्रपटाद्वारे पाऊल ठेवले. हिंदी चित्रपटात त्याने मोठ्या प्रमाणावरभूमिका साकारल्या पण आपल्या क्षमतेनुसार भूमिका न मिळाल्याची खंत तो कायमचबोलून दाखवतो.  घरदार, घर घर की कहानी, सिंघम , ‘करण अर्जुन’, ‘कोयला’, ‘येस बॉस’, ‘जोडी नं.१’  सिंघम  हे अशोक सराफ अभिनीत काही उल्लेखनीय हिंदी  चित्रपट.

अमेरिकेतील सिएटल येथे  झालेल्याबृहन्महाराष्ट्र कन्व्हेन्शन २००७ येथे विजय केंकरे दिग्दर्शित ‘हे रामकार्डिओग्राम’ या नाटकाद्वारे त्याने परदेशी रंगमंचावरही पाऊल ठेवले.

अशोक सराफ चक्क चित्रपटासाठी गायलादेखिल आहे. बिपीन वर्टी दिग्दर्शित ‘सगे सोयरे ‘ आणि स्मिता तळवळकर दिग्दर्शित ‘कळत नकळत ‘ या चित्रपटांसाठीत्याने पाश्वगायन केले. अशोक सराफने  अभिनय केलेल्या मराठी काही

चित्रपटांची  नावे…सावित्री, यज्ञ,  गुलछडी, खिचडी, ठकास महाठक, दोन बायका फजितीऐका,  आयत्या  घरात घरोबा , आमच्या सारखे आम्हीच, आत्मविश्वास, बायको असावीअशी, माल मसाला, जखमी वाघिण, नवरी मिळे नवऱ्याला,  गंमत जंमत, भुताचा भाऊ, माझा पती करोडपती, अशी ही बनवाबनवी, एक डाव भुताचा,  एक डाव धोबीपछाड, एकउनाड दिवस, सगळीकडे बोंबाबोंब, साडे माडे तीन, कुंकू, घनचक्कर, फुकट चंबूबाबुराव, वजीर,अनपेक्षित, एकापेक्षा एक, अफलातून,सुशीला, वाजवा रे वाजवा, शुभमंगल सावधान , जमलं हो जमलं,लपंडाव, चौकट राजा, मुंबई ते मॉरिशस,  धमालबाबल्या गणप्याची,   बाळाचे बाप ब्रम्हचारी, प्रेम करू या खुल्लम खुल्ला, गुपचुप गुपचुप, सव्वा शेर, गोष्ट धमाल नाम्याची,  हेच माझं माहेर,  गोंधळातगोंधळ, चोरावर मोर , आयडियाची कल्पना, हू तू तू, मी शिवाजीराजे, ह्रदयातसमथिंग समथिंग, जीवन संध्या अशा अनेक मराठी चित्रपटात भूमिका साकारल्या. यानावांवरुनच अशोक सराफने अनेक प्रकारच्या व्यक्तीरेखा साकारत यशस्वी वाटचालकेल्याचे दिसते.

आज वयाच्या पंचाहत्तरीत  अशोकसराफ फिट आणि अॅक्टीव्ह आहे हे विशेषच आहे. आजही अशोक सराफ  आपल्याचित्रपटाच्या प्रमोशनसाठी मिडियात जातो, नवीन पिढीशी छान संवाद साधतो  हेविशेषच आहे. पूर्वी या कलाकारांच्या घरी जाऊन आम्ही सिनेपत्रकार मुलाखत घेतअसू, त्या व्यक्तीगत भेटी होत, ‘माणूस ‘ म्हणून एकमेकांशी ओळख होई, भेटहोई. आज वृत्तपत्र अथवा चॅनलच्या ऑफिसमध्ये जाऊन कलाकार मुलाखती देतात.अनेकदा तर अशोक सराफच्या कारकिर्दीच्या वयापेक्षा त्याला प्रश्न करणारेपत्रकार लहान वयाचे असतात. पण अशोक सराफने हा बदल स्वीकारला आहे. अशाप्रसंगी एकाद्याची फिरकी घेतो. पण या बदलत्या परिस्थितीचे त्याला अचूक भानआहे. हीच त्याची गोष्ट मला जास्त महत्वाची वाटते आणि त्याच सहजतेने ‘प्रवाहपिक्चर ‘च्या पार्टीत त्याची भेट झाली….

अनेकवर्षे आम्ही एकमेकांना भेटत असताना त्यात कधीच व्यावसायिकपणा नसतो हेचविशेष. अशा अशोक सराफला पंचाहत्तरीनिमित्ताने पुन्हा एकदा खूप खूपशुभेच्छा!

दिलीप ठाकूर

glam.thakurdilip@gmail.com

Web Title: Ashok sarafs 75th birthday on 4th june 2022 nrak

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 29, 2022 | 12:50 PM

Topics:  

  • ashok saraf
  • entertainment
  • Marathi Entertainment News

संबंधित बातम्या

‘घरत गणपती’ चित्रपटगृहात पुन्हा झळकणार, गणेशोत्सवात धमक्यात साजरा होणार!
1

‘घरत गणपती’ चित्रपटगृहात पुन्हा झळकणार, गणेशोत्सवात धमक्यात साजरा होणार!

Govinda- Sunita Ahuja: सुनीता आहुजाची घटस्फोटासाठी न्यायालयात याचिका दाखल, गोविंदावर केले गंभीर आरोप
2

Govinda- Sunita Ahuja: सुनीता आहुजाची घटस्फोटासाठी न्यायालयात याचिका दाखल, गोविंदावर केले गंभीर आरोप

‘बिग बॉस’ फेम सबा खान केले गुपचूप लग्न, कुटुंब आणि जवळचे मित्र सेलिब्रेशनमध्ये झाले सामील
3

‘बिग बॉस’ फेम सबा खान केले गुपचूप लग्न, कुटुंब आणि जवळचे मित्र सेलिब्रेशनमध्ये झाले सामील

लॉस एंजेलिसच्या रस्त्यांवर अर्धनग्न अवस्थेत फिरला रॅपर Lil Nas X, पोलिसांनी केली अटक
4

लॉस एंजेलिसच्या रस्त्यांवर अर्धनग्न अवस्थेत फिरला रॅपर Lil Nas X, पोलिसांनी केली अटक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.