Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 10 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

नाट्यजागर : आता ‘लक्ष्य’ राज्यनाट्यस्पर्धेकडे!

दोनवर्षाच्या मध्यंतरानंतर पुन्हा एकदा 'रंगभूमीची प्रयोगशाळा' असलेल्या ६१ व्या राज्यनाट्यस्पर्धेचे पडघम वाजू लागले आहेत. सांस्कृतिक विभाग कामाला लागलाय तर संहितांचे बेंडोळे हाती घेऊन नाटकवालेही घराबाहेर पडलेत. तालमी, तारखांची जुळवाजूळवी, परीक्षकांची मान्यता, सारंकाही जोरात सुरू झालय. आता साऱ्यांचे 'लक्ष्य' या स्पर्धेकडे लागलंय.

  • By Vivek Bhor
Updated On: Sep 18, 2022 | 06:00 AM
नाट्यजागर : आता ‘लक्ष्य’ राज्यनाट्यस्पर्धेकडे!
Follow Us
Follow Us:

दोन वर्षापूर्वी थोडक्यात अंतिम फेरीत शिरण्याची संधी हुकली. पण आता पूर्व तयारीत प्राथमिक फेरीतून अंतिम फेरीत पोहचण्याचे ‘लक्ष्य’ आहे. मोर्चेबांधणी सुरू आहे!’ – एखाद्या योद्धाप्रमाणे रणांगणावर झेप घेण्याच्या तयारीत असलेल्या एका नवोदित रंगकर्मीचे हे बोल. बोरिवलीच्या प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृहाच्या कट्ट्यावर त्याची भेट झाली. नाटकाबद्दलची त्याची ऊर्जा ही थक्क करून सोडणारी किंबहुना राज्यनाट्यस्पर्धेचे श्रेष्ठत्व अधोरेखित करणारी…. असे शेकडो-हजारो रंगकर्मी आज स्पर्धेसाठी ‘इन ॲक्शन’ आहेत.

हौशी प्राथमिक फेरी यंदा १५ नोव्हेंबर २०२२ पासून विविध केंद्रावर राज्यभरात सुरू होणार आहे. तर हिंदी, संस्कृत संगीत अंतिम फेरी १ जानेवारी २०२३ पासून एकाच केंद्रावर सुरू होईल. बालनाट्यस्पर्धा तसेच दिव्यांग बालनाट्य स्पर्धाही त्यासुमारास होणार आहे.

पुणे, संभाजीनगर, नागपूर, अमरावती या महसूल विभागातील स्पर्धक संस्थेसाठी नजीकच्याच कार्यालयातच संपर्क व प्रवेशिका स्वीकारण्यात आल्या आहेत. यंत्रणा सज्ज आहे एक विशेष वेबसाईटही राज्यशासनाच्या सांस्कृतिक विभागाने सुरू केलीय. जेणेकरून राज्यभरातील रंगकर्मी एका छताखाली आणण्याचा त्यामागला प्रयत्न आहे. राज्यभरातली शासकीय यंत्रणा जी सांस्कृतिक कला, क्रीडा, नाट्य विषयक प्रकल्प राबविते ती आज सक्रीय झालीय. अर्थात कोरोनाच्या मध्यंतरामुळे काही अडचणी जरूर आहेत पण फाईलींवरली धूळ दूर करून सारी जुळवाजूळवी चालू आहे.

आज व्यावसायिक रंगभूमीवरल्या दिग्गजांची यादी जर तपासली तर शंभरटक्के रंगकर्मी हे राज्यनाट्यस्पर्धेतून बाहेर पडले आहेत. स्पर्धेची चढाओढ, त्यासाठीचे दिवसरात्र प्रयत्न अन् नवनवीन प्रयोग या दिव्यातून सारेजण गेलेत. उभ्या देशभरातच नव्हे तर जगभरातली ही ६१ वर्षे सातत्याने सुरू असलेली स्पर्धा आहे. (अर्थात काही अपवाद वगळता.) नाटकवेड्या मराठी रंगकर्मींचे तसेच रसिकांचेही एक हक्काचे व्यासपिठच बनलंय.

गेल्या पन्नास एक वर्षातली स्पर्धक संस्थांच्या नावावरून नुसती नजर जरी फिरवली तर थक्क होणं भाग पडतं. मुंबईची रंगायन, अविष्कार, बहुरूपी, उन्मेष, प्रयोग, रूपवेध, निनाद, थिएटर युनिट, प्रयोग, रंगशारदा, रूपारेल कॉलेज, पार्ले कॉलेज, फर्ग्युसन, झेविअर, मुंबई विद्यापीठ, सचिवालय, जिमखाना, बेस्ट कला क्रीडा केंद्र एक ना दोन. यादी अपूर्ण राहील. प्रारंभीच्या काळातील काही निवडक नाटके आणि त्याचे दिग्दर्शक यावर शोध घेतला तर तिथेही बदलत्या रंगभूमीचे दर्शन होतेय.

पुरुषोत्तम दारवेकर (चंद्र नभीचा ढळला), भालबा केळकर (पवनकाठचा धोंडी), विजया मेहता (खोटे), ससा आणि कासव, नंदकुमार रावते (सागरा माझा प्राण), मधुकर तोरडमल (सैनिक नावाचा माणूस), डॉ. जब्बार पटेल (अशी पाखरे येती), अमोल पालेकर (वल्लभपूरची दंतकथा), रत्नाकर मतकरी (प्रेमकहाणी) सतीश आळेकर (महानिर्वाण), जयदेव हट्टंगडी (चांगुणा), कुमार सोहोनी (अरूपाचे रूप), वृंदावन दंडवते (दृष्टचक्र), दिलीप कोल्हटकर (सटतपुतुलिका), अजित भुरे (अनाहत), विजय केंकरे (ऑथेल्लो)… ही यादी देखिल अपूर्ण राहील. बदलते विषय, तंत्र-मंत्र रंगकर्मी यांचा जो प्रवास झालाय त्याचे यथार्थ दर्शनच राज्य नाट्य स्पर्धेच्या प्रवाहातून नजरेत भरते.

पहिला महाराष्ट्र राज्य हौशी नाट्यमहोत्सव हा १९६०-६१ यावर्षी झाल्याची शासनदरबारी अधिकृत नोंद आहे. त्यानुसार नागपूरच्या रंजन कला मंदिराने सादर केलेले ‘चंद्र नभीचा ढळला’ या नाटकाला प्रथम तर जनता केंद्र माझगांवचे वाल्मिकी याला द्वितीय क्रमांक मिळाला. लेखनाचाही अनुक्रमे पुरुषोत्तम दारव्हेकर आणि प्रेमानंद तोडणकर यांना पुरस्कार मिळाला. पुढल्या वर्षी म्हणजे ६२-६३ यावर्षी दादरच्या रंगायनने सादर केलेले ससा आणि कासव हे प्रथम क्रमांकावर तर दुसऱ्यावर नागपूरच्या रंजन कला मंदिरांचे काळी माती खारे पाणी हे होते. अशा प्रकारे प्रथम-द्वितीय क्रमांकाचे हे चक्र ठरले!

नाटककार प्रेमानंद गज्वी हे एकांकिका आणि राज्यनाट्य स्पर्धेतून प्रकाशात आलेले प्रतिभासंपन्न नाटककार. त्यांची नाटके ही स्पर्धेतून व्यावसायिकवर पोहचली. स्पर्धेमुळे त्यांच्या नाटकांकडे लक्ष वेधले गेले. ‘देवनवरी’ एकांकिकेवरून त्यांनी मालाडच्या ‘प्रयोग’साठी राज्यनाट्यस्पर्धेसाठी नाटक दिले. ‘किरवंत’ हे नाटकही स्पर्धेत गाजलं.

परीक्षकांशी वादही झाले. पुढे हे नाटक व्यावसायिकवर डॉ. श्रीराम लागू यांच्या पुढाकाराने रसिकांमुळे आले. बेठबिकारीचं चित्रण असलेली अशीच एक ‘गाहान’ ही त्यांची एकांकिका. १९८३-८४ चा सुमार असावा. रवींद्र नाट्यमंदिर केंद्रातूनही ‘तनमाजोरी’ प्रथम आली. अंतिम फेरीत तिसरं नाटक पण मालकाची भूमिका केलेल्या सुनील तावडेला अभिनयाचं रौप्यपदक मिळाले. अशी किमान सहा-सात नाटकांनी प्रेमानंद गज्वी यांच्या विषयाकडे साऱ्यांचेच लक्ष वेधले गेले.

एके ठिकाणी गज्वी म्हणाले होते – ‘आजही मला राज्यनाट्यस्पर्धेसाठी नाटक लिहीण्याची इच्छा होते. अशी ही स्पर्धा शासनाने कधीही बंद करू नये. कारण नव्या होतकरू तरुणांना ही स्पर्धा खरोखरच स्वतःला अजमावून पाहण्यासाठी खुलं ‘बोधपीठ’ आहे. यातूनच नवनवे कलावंत मराठी रंगभूमीला मिळत आले आहेत.

या स्पर्धेच्या संदर्भात डॉ. जब्बार पटेल म्हणतात- ‘आज मागे वळून बघतांना असे निश्चितपणे म्हणता येते की मुख्य धारेतील मराठी नाटकाची श्रीमंती आणि त्या रंगभूमीवरले नावाजलेले माईलस्टोन ही सर्वार्थाने राज्य नाट्यस्पर्धांची देणगी होती. या स्पर्धेतून तरुण कलावंतांनी अगदी अपुऱ्या साधनसामुग्रीतूनही लक्षणीय प्रयोग साकारले. ही फार मोठी कमाई होती. राज्य नाट्यस्पर्धेमुळे नव्या नाट्य जाणीवा, नवे तंत्रज्ञान याचा उदय रंगभूमीवर झाला. ही स्पर्धा म्हणजे सक्षम प्रयोगशाळाच!

नाटककार प्रशांत दळवी आणि दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांनी त्यांच्या ‘जिगीषा’ संस्थेतर्फे राज्य नाट्यस्पर्धेत भाग घेऊन केवळ मुंबई-पुणे-नागपूर या पुरता रंगकर्मीचा सहभाग नव्हे, तर ‘औरंगाबाद’ ही मागे नाही हे दाखवून दिले. मदर्स हाऊस, पौगंडे, हमिदाबाईची कोठी, आषाढ का एक दिन ही नाटके गाजली.

स्पर्धेत गाजलेलं ‘मदर्स हाऊस’ हे नाटक प्रशांत दळवीने चक्क २२व्या वर्षी लिहिलेले आणि चंद्रकांत कुलकर्णी यांनी त्याच्या २०व्या यावर्षी दिग्दर्शित केलेले. पहिलं दोन अंकी नाटक. तेव्हापासूनची ही औरंगाबादची ‘दोस्ती’ मुंबईपर्यंत पोहचली. आता तर व्यावसायिकवर त्यांचे ‘चारचौघी’ नाटक पुन्हा एकदा नव्या दमात सुरू आहे.

राज्यनाट्यस्पर्धेने आपल्या कक्षा रुंदावून नवनव्या प्रकारांना, भाषेला प्राधान्यही दिले. १९६९-७० यावर्षी संगीत नाटकांच्या स्पर्धा सुरू झाल्या. त्यात भरत नाट्य संशोधन मंदिर, पुणे यांचे संगीत स्वयंवरने प्रथम क्रमांक पटकावला! संगीत नाटकांची असणारी परंपरा जागं ठेवून स्पर्धेतून एका सुवर्णकाळाचे प्रत्यंतर रसिकांना घडले.

१९९१-९२ च्या सुमारास व्यावसायिक नाटकांच्याही स्पर्धा सुरू करण्यात आल्या. ओम नाट्यगंधाचे ‘आई रिटायर होतेय’ यांने प्रथम क्रमांक मिळविला. त्यात नाटकासाठी दिलीप कोल्हटकरांना दिग्दर्शनाचा पुरस्कारही मिळाला होता.

बालनाटकांची स्पर्धाही २००३-०४, च्या सुमारास सुरू झाली. त्यातून राज्यभरातील अनेक शाळा-महाविद्यालये यातील रंगकर्मीना भाग घेण्याची संधी मिळाली. जयसिंगपूरच्या जनतारा कल्पवृक्ष विद्यामंदिरच्या ‘चांदणी’ या बालनाट्याने आणि बाजी मारली. बालनाट्य चळवळीला यामुळे हातभारच लागला. अनेकांच्या जीवनातले हे मंतरलेले दिवस ठरले आहेत. ठरणार आहेत…

१०६०-६१ चा सुमार. संस्कृत नाटकांनीही हक्काचे व्यासपीठ सरकारने खुले केले. रूपारेल कॉलेज म्हणजे नाटकवालं कॉलेज अशी ओळखच. कॉलेजने पहिल्या वर्षी ‘नागानंद’ हे नाटक सादर करून प्रथम पुरस्काराचा बहुमान पटकाविला. पुढे हिंदी नाटकांनाही स्पर्धेतून व्यासपीठ मिळाले. पण मराठी नाटकांसाठी ही स्पर्धा आजही एक रंगचळवळ म्हणून सिद्ध झालीय.

‘राज्यनाट्यस्पर्धा आणि महाराष्ट्रातील सांस्कृतिक जडणघडण’ यावर एखादा प्रबंध नक्कीच होऊ शकेल. केवळ शहरापूरती ही स्पर्धा मर्यादित नाही, तर उभा महाराष्ट्र आणि काहीदा राज्याबाहेरही याचे पडसाद उमटत असतात. मराठीमाणूस आणि नाटक याचे परस्परांशी असणारे घट्ट नातेसंबंध हे या स्पर्धेमुळे अधिकच बहरले आहेत, हे नाकारून चालणार नाहीत.

संजय डहाळे

sanjaydahale33@gmail.com

Web Title: Cultural formation of maharashtra focus on state drama competation nrvb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 18, 2022 | 06:00 AM

Topics:  

  • marathi rangbhoomi

संबंधित बातम्या

Marathi Rangbhumi : मैत्री, विश्वास आणि सर्जनशीलतेचा संगम; मुक्ता-मीरा आणताहेत ‘पुन्हा नक्की भेटू’
1

Marathi Rangbhumi : मैत्री, विश्वास आणि सर्जनशीलतेचा संगम; मुक्ता-मीरा आणताहेत ‘पुन्हा नक्की भेटू’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.