Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 21 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मन वढाय वढाय…

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Mar 05, 2023 | 06:00 AM
मन वढाय वढाय…
Follow Us
Follow Us:

महाभारतामध्ये दुर्योधनाच्या तोंडी एक श्लोक आहे.
‘जानामि धर्मं न च मे प्रवृत्तिः जानाम्यधर्मं न च मे निवृत्तिः।
केनापि देवेन हृदि स्थितेन यथा नियुक्तोस्मि तथा करोमि॥’

मागील लेखामध्ये आपण महाभारतातील दुर्योधनाच्या तोंडी असलेला वरील श्लोक पाहिला. योग्य काय ? अयोग्य काय ? हे माहिती असूनही तशा प्रकारे वागता न येणे ही एक प्रकारे स्वतःची वंचनाच आहे. नेमके असे आपल्या आत काय असते ज्याच्यामुळे घेतलेले निश्चय मोडतात आणि कधी अशा प्रकारे वागू असे वाटलेलेही नसते आणि तरीही आपण तसे वागून जातो. या सगळ्या शक्यतांच्या मुळाशी एकच गोष्ट असते आणि ती म्हणजे “आपलं मन”. नेमकं काय आहे बरं हे मन? म्हणजे सर्व मानवी समूहांनी आणि संस्कृतीने या अजब रसायनाचा अभ्यास केला आहे. त्याच्यावर खूप काही लिहिले, बोलले गेलेले आहे, अजूनही जात आहे पण तरीसुद्धा मन म्हणजे नेमके काय रसायन आहे हे मात्र आजही पूर्णपणे उलगडलेले नाही. मन मनास उमगत नाही…

महान पदार्थ-वैज्ञानिक अल्बर्ट आईन्स्टाईन व महान मानसतज्ज्ञ डॉक्टर सिग्मंड फ्रॉईड हे समकालीन होते. त्यांच्या एका पत्रव्यवहाराचा दाखला इथे आपण घेऊ, डॉ. सिग्मंड फ्रॉईड यांनी अल्बर्ट आईन्स्टाईन यांना लिहिले की, “तुमचे संशोधन अत्यंत मूलभूत व महत्त्वाचे आहे कारण तुमच्या, ऊर्जेबद्दलच्या सिद्धांतामुळे मानवाचे विश्वाबद्दलचे आकलन बदलून गेले आहे. यावर अल्बर्ट आईन्स्टाईननी, डॉ. सिग्मंड फ्रॉईड यांना लिहिले की, “माझ्यापेक्षाही तुमचे संशोधन अधिक मूलभूत व महान आहे आणि याचे कारण असे की, मी बाहेर दिसणाऱ्या, मोजता, आजमावता येणाऱ्या जगाबद्दल लिहिले आहे पण तुम्ही मात्र आपल्या आत दडलेल्या, कधी आपल्यासमोर न येणाऱ्या, मानसिक जगाबद्दल अर्थात आपल्या मनाबद्दल आडाखे मांडले आहेत, त्याचा नकाशा तयार केलात.

जे केवळ एखादा प्रतिभावंतच करू शकतो. तर असे हे न दिसणारे, न मोजता येणारे अथांग असे मानवी मन.. पण वरती म्हटल्याप्रमाणे या मनाच्या संकल्पनेभोवती प्रचंड असे सांस्कृतिक संचित गोळा झालेले आहे. जगभरच्या लोकसंस्कृती व अभिजात संस्कृतीमध्ये आपल्याला मनाबद्दल विशेष चिंतन, आकलन सापडते. भारतीय व पौर्वात्य संस्कृतीमध्ये मनाविषयीच्या अनेक कथा, लोककथा, रूपक कथा, प्रतीक आपल्याला साकारलेली दिसतात. “मन चंगा तो कटोरी मे गंगा” असे कबीर म्हणतात. श्रीमद् भगवद्गीतेमध्ये सहाव्या अध्यायातील पाचव्या व सहाव्या श्लोकामध्ये आत्मा मन याविषयी चिंतन दिसून येते. या श्लोकांचे अनुवाद आपल्याला विनोबांच्या गीताई मध्ये येतो.

उद्धरावा स्वये आत्मा खचू देऊ नये कधी ।
आत्मा चि आपुला बंधु आत्मा चि रिपु आपुला ॥५॥
जिंकूनि घेतला आत्मा बंधु तो होय आपुला ।
सोडिला तो जरी स्वैर शत्रुत्व करितो स्वये ॥६॥
– (संदर्भ – गीताई, श्लोक क्र. ६.४ व ६.५)

आत्मा जिंकून घेतला की तो आपला बंधू होतो आणि जिंकू शकलो नाही तर तोच आपला सगळ्यात मोठा शत्रू असतो. प्रश्न असा आहे की, जिंकून घेणारा कोण ? आणि जिंकू न शकणारा कोण? अर्थात दुसरे तिसरे कुणी नसून आपले मन असते. आपले मनच आत्म्याला जिंकू शकते.

कितीतरी रूपक कथा मनाविषयी भाष्य करतात. उदाहरणार्थ, एकदा एक अत्यंत गरीब दिसणारा याचक राजाकडे येतो, “मला काहीतरी वाढ, काहीतरी दे” असे म्हणतो. त्याच्या हातात एक अतिशय छोटी कटोरी असते. राजा हसतो आणि विचारतो “एवढेच हवे तुला?” त्यावर तो याचक म्हणतो, “हो.. ही कटोरी भरली की माझे पोट भरले.” राजा थोडासा छदमीपणे हसतो आणि कटोरी भरून धान्य ओतायला जातो.

राजा ओतत राहतो आणि कटोरी रिकामीच होत राहते. राजाने आणलेले सगळे धनधान्य, दाग-दागिने, सोने, चांदी, हे सगळं राजा इरेला पेटून त्याच्या त्या छोट्याशा कटोरीत ओतत राहतो आणि तरीसुद्धा कटोरी भरत नाही. तो हिन-दिन दिसणारा याचक, नक्कीच कोणीतरी वेगळा आहे, हे आता राजाच्या ध्यानी आलेले असते. त्याला शरण जाऊन राजा विचारतो, “बाबा ही कुठली जादूची कटोरी आहे जी कशानेच भरत नाही?” त्यावर तो याचक म्हणतो, “अरे राजा, तुला अजून कळले नाही, ही माणसाच्या मनापासून बनवलेली कटोरी आहे. “ये दिल मांगे मोर” अजून काय?

पौर्वात्य, पाश्चात्य सर्वच संस्कृतीमध्ये आपल्याला अशा अनेक रूपक कथा दिसतात. महाराष्ट्रातील व भारतातली संत परंपरा तर, बरीचशी मनाच्या शुद्धीकरणावर आणि वर्तनाच्या शुद्धीकरणावर आधारलेली आहे. स्वामी रामदासांनी तर अंजारून-गोंजारून फक्त मनालाच उपदेश केला आहे. इतर संतांनी देखील मानवी मनाचा स्वतंत्र विचार केला आहे.

षट दर्शनांपैकीचे योगदर्शन हे सर्व, मानवी चित्ताविषयी व चित्ताचा जो महत्त्वाचा भाग, “मन” ह्या विषयीचे चिंतन करते. पाश्चिमात्य जगामध्ये सुद्धा अगदी अरिस्टॉटलच्या काळापासून किंवा त्याही आधीपासून इसापांच्या गोष्टी मधून तसेच इतर कथा, लोककथांमधून मनाविषयीचे चिंतन केलेले आपल्याला आढळून येते. मनाविषयीची विविध प्रारूपे, विविध संस्कृतींनी उभी केली आहेत. या प्रारूपांचा धांडोळा घेणे अतिशय रोचक आहे. पुढील काही लेखांमधून आपण नेमके हेच करणार आहोत. या प्रारूपांचा लेखाजोखा उभा करताना काही सांस्कृतिक भेद आहेत, ते आपण समजून घेणार आहोत. मराठी मनाला कायम भुरळ घालणारी मनाविषयीची एक आधुनिक कविता म्हणजे बहिणाबाई चौधरींची कविता. जगाच्या दृष्टीने अशिक्षित असलेल्या, अतिशय सामान्य जीवन जगलेल्या, अतिशय कष्टमय जीवन जगलेल्या… बहिणाबाई. पण त्यांच्या कविता वाचताना, मानवी जीवन व्यवहाराविषयी त्यांचे प्रगल्भ ज्ञान आपल्याला थक्क करून जाते. अतिशय सोप्या ओघवत्या शैलीमध्ये बहिणाबाई मानवी जीवनाविषयीची, स्त्री जीवनाविषयीची, निसर्गाविषयीची अनेक सत्य फार मार्मिकपणे उलगडून दाखवतात. बहिणाबाईंनी मानवी मनाविषयी पण त्यांच्या “मन” या कवितेतून असेच अप्रतिम भाष्य केले आहे. आपल्याला सतत चकवा देणारे हे मन, त्यांची कविता वाचताना मात्र, कुठेतरी पळभर का होईना पण आपल्या चिमटीत सापडले आहे, असे नक्कीच वाटून जाते. बहिणाबाईंची कविता अशी..

मन वढाय वढाय
उभ्या पिकातलं ढोर
किती हाकला हाकला
फिरी येतं पिकांवर
मन मोकाट मोकाट
त्याले ठायी ठायी वाटा
जशा वाऱ्यानं चालल्या
पान्याव-हल्यारे लाटा
मन लहरी लहरी
त्याले हाती धरे कोन ?
उंडारलं उंडारलं
जसं वारा वाहादन
मन जह्यरी जह्यरी
याचं न्यारं रे तंतर
अरे, इचू, साप बरा
त्याले उतारे मंतर !
मन पाखरू पाखरू
त्याची काय सांगू मात ?
आता व्हतं भुईवर
गेलं गेलं आभायात
मन चप्पय चप्पय
त्याले नही जरा धीर
तठे व्हयीसनी ईज
आलं आलं धर्तीवर
मन एवढं एवढं
जसा खाकसचा दाना
मन केवढं केवढं ?
आभायात बी मायेना
देवा, कसं देलं मन
आसं नाही दुनियात
आसा कसा रे तू योगी
काय तुझी करामत !
देवा आसं कसं मन ?
आसं कंस रे घडलं
कुठे जागेपनी तुले
असं सपन पडलं !

– (संदर्भ : बहिणाबाईची गाणी (बहिणाबाई चौधरी))

आकाशासारखं, सर्वत्र असलेले, सूक्ष्म, स्थूल, गडद, फिक्क पण कुठेच हाती न सापडणारे, हे मन म्हणजे खरच एक अजब निर्मिती आहे. “देवाला पडलेले जादुई स्वप्न म्हणजे मन”, असे बहिणाबाई म्हणतात. मला वाटते, मनाला एवढी सुंदर उपमा क्वचितच कोणी दिली असेल. शिवाय अत्यंत व्रतस्थ, साधे जीवन जगलेल्या बहिणाबाई आणि तरीही मनाविषयीची असलेली त्यांची प्रगल्भ जाणिव पाहिली, त्यांची प्रतिभा पाहिली, की आपले मन नक्कीच स्तिमित होते. अशी मनाविषयीची खूप उदाहरणे, खूप प्रारूपे आपल्याला येणाऱ्या लेखांमधून उलगडून पाहायची आहेत.

डॉ. सुचित्रा नाईक

naiksuchitra27@gmail.com

Web Title: Special article about mental health nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 05, 2023 | 06:00 AM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.