Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

वाट पाहे ‘देवबाभळी’ची!

'भेटी लागी जीवा, लागलीसें आस, पाहे रात्रंदिवस वाट तुझी!' असं संत तुकाराम यांनी विठोबाला म्हटलंय. त्यांच्या अभंगातील प्रतिकात्मकता ही आज चारशे वर्षानंतरच्या संगणक युगातही कायम आहे. 'शब्द हेच खरे धन' मानणाऱ्या तुकोबांचे शब्द आजही दिशादर्शक ठरतात. 'देवबाभळी' या प्राजक्त देशमुख यांच्या नाटकाने अंतर्मुख करणाऱ्या रूपक नाट्याचा संमृद्ध अनुभव मराठी रंगभूमीवर दिलाय. या नाट्यसंहितेचा समावेश हा विद्यापीठ स्तरावर नुकताच झालाय आणि नाबाद पाचशे प्रयोगाची पताका ही येत्या नोव्हेंबर महिन्यात कळसापर्यंत पोहचत आहे…

  • By Amrut Sutar
Updated On: Sep 17, 2023 | 06:01 AM
वाट पाहे ‘देवबाभळी’ची!
Follow Us
Close
Follow Us:
काळ बदलला तरी काही गोष्टी कायम मार्गदर्शक आणि प्रेरणादायी असतात. ‘जुने जाऊ द्या मरणा लागुनी’ असे जरी केशवसुतांनी म्हटले असले तरीही काही विचार हे काळाच्या बंधनापलिकडे असतात. ते कायम खूणावत राहातात. त्याचा प्रतिकात्मक अर्थ हा पिढ्यान् पिढ्यांना साथसोबत करतो. संतकाळाची एक वैभवशाली परंपरा महाराष्ट्राला लाभली आहे. त्यात असणारे आध्यात्मिक अर्थ आजही अभ्यासकांपुढे आणि संशोधकांमध्ये विचार करायला लावतात. अनेक देश-विदेशी विद्यापीठात महाराष्ट्रातील संत साहित्यावर अभ्यास होतोय. अगदी संत तुकारामांचे अभंग ही एम्. ए.च्या परीक्षेसाठी नेमले आहेत. या अभंगाशिवाय अभ्यास पूर्ण होणार नाही. शब्द त्याचे अर्थ हे खरे धन आहे. कारण शब्दांची ताकद सामर्थ्य हे इतर कशातही नाही. एके ठिकाणी संत तुकाराम म्हणतात – ‘आम्ही घरी धन शब्दांचीच रत्ने! शब्दांची शस्त्रे यत्ने करू!!’ संत तुकोबांची अभंगवाणी म्हणजे सहज सुंदर शब्दात एकेक दाखले देऊन अर्थ स्पष्ट करणारी आहे. मराठी भाषेतले अभंग म्हणजे ज्ञानवृक्ष आहे, हे अभ्यासक तज्ञांनी, वाचक आणि रसिकांनींही यापूर्वी मान्य केलय.
या नाटकातली गोष्ट ही संतकाळात अलगद घेऊन जाणारी आहे. संत तुकाराम यांची बायको आवली आणि विठ्ठलाची बायको रखुमाबाई यांच्यातला हा तसा संवादच. त्या संवादातून नाट्य आकाराला येते. एक गोष्ट सांगितली जाते की आवलीच्या पायात काटा अडकतो आणि तो खुद्द विठोबा काढून टाकतो. तिच्या वेदना दूर करतो. पण इथे त्याच आख्यायिकेचा आधार घेऊन विठ्ठलाच्या पत्नी रखुमाबाई आवलीच्या पायातला काटा काढते, असे केलंय. आपला पती तुकोबासाठी न्याहारी घेऊन निघालेली आवलीच्या पायात काटा रुतल्यामुळे ती बेशुद्ध पडते. आता न्याहारी तुकोबापर्यंत कशी काय पोहचणार, हा प्रश्न उभा राहातो. विठ्ठलाच्या आदेशाने फक्त काटा काढेपर्यंत नव्हे तर ती पूर्ण बरी होईस्तोवर रखुमाबाई सेवा करते. ती लखुबाई म्हणून काम करते. घरकामात मदत करते. विठोबाचा शेला हा आवलीच्या पायात बांधणं. विठ्ठलाची मूर्ती तिथेच सोडून जाणं. परमेश्वर असलेल्या विठोबाच्या पत्नीने आपला भक्त तुकोबाची पत्नी आवलीची सेवा करणं, हे सारं काही यात नाट्यपूर्ण व काव्यातून, संवादातून उभं केलंय. जे विलक्षणच. एक देवाची बायको, दुसरी भक्ताची बायको. यातील हा संवादरूपी आविष्कार!
आज एका नाटकाच्या निमित्ताने हा नाट्यजागर. नव्या पिढीचा नाटककार आणि दिग्दर्शक प्राजक्त देशमुख यांचे ‘देवबाभळी’ ही संहिता विद्यापीठ स्तरावर अभ्यासक्रमात लावण्यात आलीय. प्रगत संगणकावर अभ्यास करणाऱ्यांना हे कथानक, त्याचा अन्वयार्थ त्यातील अभंग हे आजचे वाटतात. लागू पडतात. ते अभ्यास बनतात! या नाटकाचा शुभारंभी प्रयोग २२ डिसेंबर २०१७ ला विलेपार्ले येथील दिनानाथ मंगेशकर नाट्यगृहात झाला होता. भद्रकाली प्रॉडक्शनची ही निर्मिती होती. विषय – आशय हा संतकाळात घेऊन जाणारा. २०१७ पासून ते २०२३ पर्यंत नाटक गाजत आहे. चर्चेत आहे. हाऊसफुल्ल गर्दी खेचतेय. या काळात कोरोना संकटामुळे नाट्यगृह बंद होती. पण तरीही रसिकांची विचारणा सुरूच होती. नाट्यगृह पुन्हा सुरू झाल्यानंतर नव्या जोमात प्रयोग सुरू झाले. महाराष्ट्रभरात याचे प्रयोग गावोगावात झाले. ‘देवबाभळी’ची जाहिरात आणि प्रयोग नाहीत, असे आजवर झालेले नाही. रंगभूमीच्या वाटचालीत हे नाटक म्हणजे एक चमत्कारच जणू व जसा झालाय. याची नोंद नाट्यइतिहासात निश्चितच घेतली जाईल.
मुंबई विद्यापीठाच्या बीए अभ्यासक्रमात साहित्य म्हणून या नाटकाची संहिता यंदाच्या अभ्यासक्रमात लावण्यात आलीय. सोबतच कोकणातील देवरुख शिक्षण संस्था आणि कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठ यातही या नाटकाचा अभ्यासक्रमात समावेश करण्यात आलाय. या नाटकाची एक दर्जेदार साहित्यकृती म्हणून हा सन्मानच झालाय. नाटककार प्राजक्त देशमुख हा नव्या पिढीचा नाटककार. तरुणपणी त्याला हे भाग्य लाभलय. या नाटकाने व्यावसायिक रंगभूमीवर चक्क ४४ पुरस्कार पटकाविले, तर युवा साहित्य अकादमीनेही त्याचा संहितेसाठी गौरव केलाय. येवढ्या कमी वयात प्रचंड पुरस्कार आणि रसिकांचे प्रेम लाभलेला नाटककार म्हणून त्याने एक रंगभरारीच घेतली आहे. अभ्यासक्रमात समावेश झाल्याने तर त्याला वलय निर्माण झालय आणि भविष्यात अधिक काही करण्याची जबाबदारीही आलीय. मूळचा नाशिकचा असलेला रंगकर्मी आज एका संहितेमुळे नाटककार, साहित्यिक म्हणून गाजतोय.
‘देवबाभळी’ नाटकाची संहिता आता आवृत्त्यांवर आवृत्त्या निघतील. मुंबईच्या प्रतिष्ठित पॉप्युलर प्रकाशनने याची संहिता पुस्तकरूपाने २०१८ साली दिमाखात प्रसिद्ध केलीय. आजवर पुस्तकाच्या दोनचार आवृत्त्या हातोहात खपल्या. केवळ महाराष्ट्रात नव्हे तर देशभरातून या नाटकाच्या पुस्तकाला चांगली मागणी आहे. परदेशातील महाराष्ट्र मंडळानेही याची संहिता संग्रही केलीय. संहितेप्रमाणे पुस्तकाचे आकर्षक मुखपृष्ठ हे संदिप देशपांडे यांनी अर्थपूर्ण केलय. जे बघताच ग्राहकांना पुस्तक खरेदी करण्याची इच्छा होतेय. ही कबूली खुद्द विक्रेत्यांचीच आहे. वाचनाचे अनेक पर्याय हे घराघरात हाताच्या बोटावर असतांनाही पुस्तकाला असणारी मागणी ही आश्चर्यकारक म्हणावी लागेल. आता तर पुस्तकच अनेक विद्यापीठांनी क्रमीक साहित्य म्हणून स्वीकारल्याने मागणी ही वाढतच जाणार आहे. यात शंका नाही. भारतातील प्रसिद्ध मराठी नाटकांच्या यादीतही ‘देवबाभळी’ने मानाचे स्थान मिळविले आहे. ही बाब बऱ्याच जणांना आजवर ठावूक नाही. फोब्सने भारतातील प्रसिद्ध नाटकांची एक यादी मध्यंतरी जाहीर केली होती. त्यात अमर फोटो स्टुडिओ, वाडा चिरेबंदी, इंदिरा, शिवाजी अंडरग्राउंड इन भीमनगर मोहल्ला या नाटकांचा समावेश करण्यात आला होता. त्यात ‘संगीत देवबाभळी’ने प्रवेश केलाय. एक संगीतनाटक म्हणून त्याचे वेगळेपण अधोरेखित त्यात करण्यात आलय. मराठी रंगभूमीला संगीत नाटकांची परंपरा व वारसा आहे. त्या पार्श्वभूमीवर आजकाल संगीत नाटके ही जवळजवळ गायब आहेत. त्यात ‘देवबाभळी’ने वळणावरलं नाटक म्हणून बहुमान मिळविला आहे.
मराठी व्यावसायिक रंगभूमीने अनेक एकांकिकांना पूर्ण नाटकात सादर केलं. राज्यभरात विविध एकांकिका स्पर्धेतून नवनवीन संकल्पना या आजवर आकाराला आल्यात. हे नाटक देखिल मुळची एकांकिकाच! त्याचे दोन अंकी नाटक करण्यात आलय. ‘भद्रकाली’चे प्रसाद कांबळी यांनी एक आव्हान म्हणून नाटक हाती घेतले आणि ‘वस्त्रहरण’ नंतर संस्थेचे सर्वाधिक गाजलेले नाटक म्हणून सिद्ध झाले. मराठी साहित्यात संतांच्या असणाऱ्या अभंगांचे महत्त्व लाख मोलाचे आहे. या अभंगातल्या रचनांमधून मराठी समाजावर संस्कार झालेत. हरि नारायण आपटे यांनी १९११ साली ‘संत सखुबाई’  हे संगीतनाटक रंगभूमीला दिले. त्यात अभंगांचा वापर हे वैशिष्ट्यच होते. भाविक नसलेला रसिकही अभंगामुळे जवळ आल्याच्या नोंदी आहेत. संत  सखुबाईच्या विठ्ठल भक्तीचे कथानक त्यातही होते. नारायण विनायक कुलकर्णी या नाटककारांनी ‘संत कान्होपात्रा’ हे अभंगमय पाच अंकी नाटक लिहीले. गंधर्व नाटक कंपनीने १९३१ च्या सुमारास त्याचे प्रयोग सुरू केले. संत कान्होपात्राच्या भूमिकेत बालगंधर्व असल्याने नाटक गाजले. भक्तीरसातले अभंग असल्याने रसिकांवर मोहिनी पडली. आणि १९१२ साली म्हणजे १११ वर्षापूर्वी रंगभूमीवर आलेले ‘संगीत संत तुकाराम’ जे एवढ्या कालावधीनंतर आजही रंगभूमीवर आहे. त्याचे प्रयोग होताहेत. ओम नाट्यसंस्था या संस्थेची निर्मिती आणि विनोदी अभिनेते संतोष पवार यांचे दिग्दर्शन आहे. संत तुकारामाच्या भूमिकेत विक्रांत आजगांवकर दिसताहेत. अभंग, विनोद, संगीत असा तिहेरी योग त्यात आहे. याचे नाटककार होते बाबाजी राणे. त्यांची एक आठवण. ते या नाटकात जिजाऊची भूमिका करायचे. नागपूर मुक्कामी दौऱ्यावर असतांना नाटक सुरू असतांनाच त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि ते त्यात गेले. असो. तर अशा बऱ्याच मराठी नाटकात अभंगांचा वापर आजवर केलाय. संगीत नाटकांना त्यामुळे एक वेगळी चमक आली. आजही संगीत संत तुकाराम याप्रमाणेच संगीत देवबाभळी रसिकांच्या हृदयसिंहासनावर राज्य करतेय.

अभंगांनी भरलेले संगीत नाटक, शुभांगी सदावर्ते (आवली), मानसी जोशी (सखुबाई), हे दोनच कलाकार, गंभीर विषयावरले आध्यात्मिक विचार मांडणारे नाट्य – हे सारं काही असूनही देवबाभळीने पाचशे प्रयोगांची मजल ही गेल्या साडेचार वर्षात मारली. २२ डिसेंबर २०१७ ते २२ नोव्हेंबर २०२३ असा हा प्रवाह. जो भक्तीरसाने भरलेला. येत्या २२ नोव्हेंबरला भव्य षण्मुखानंद सभागृहात याचा समारोपाचा प्रयोग होत आहे. जो रसिकांना, निर्मात्यांना चटका लावून जाणारा ठरेल. ज्याचा शुभारंभ झालाय, त्याचा समारोप हा अटळ असतो. पण नाटकाच्या प्रयोगाचा समारोप जरी वाटला तरी त्यातल्या आध्यात्मिक विचारांचा कदापि समारोप होणार नाही.

– संजय डहाळे
anjaydahale33@gmail.com 

Web Title: Waiting for devbabhali

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 17, 2023 | 06:00 AM

Topics:  

  • article

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.