वाहतूक कोंडी संपवण्यासाठी १ कोटींची ऑफर! काय आहे नेमकं प्रकरण? (फोटो सौजन्य - सोशल मीडिया)
Bengaluru Traffic Marathi News: जर तुम्ही बेंगळुरूमध्ये राहत असाल किंवा तुम्ही कधी बेंगळुरूला गेला असाल तर तुम्ही बेंगळुरूची वाहतूक कोंडी नक्कीच पाहिली असेल. बेंगळुरूच्या वाहतुकीमुळे लोकांना खूप अडचणींना तोंड द्यावे लागते. लोकांना १० मिनिटांचे अंतर कापण्यासाठी तासंतास लागतात. आता बेंगळुरूच्या या वाहतूक समस्येचे निराकरण करण्यासाठी EaseMyTrip चे सह-संस्थापक प्रशांत पिट्टी यांनी १ कोटी रुपये देऊ केले आहेत. चला जाणून घेऊया काय आहे नेमक प्रकरण.
प्रशांत पिट्टी यांनी त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर पोस्ट करून बंगळुरूच्या वाहतुकीचा अनुभव शेअर केला आहे. प्रशांत पिट्टी यांनी X वर पोस्ट केली आणि ११ किमी अंतर कापण्यासाठी त्यांना २ तासांपेक्षा जास्त वेळ कसा लागला हे सांगितले.
I am committing INR 1 Cr to find Bangalore Choke-Points via Google Maps & AL.
11 km → 2.15 hours in Bangalore Traffic on Saturday late night!
I was stuck at one choke-point at ORR, where I spent 100 mins struggling to understand why there is no traffic-light or cop here!
But… pic.twitter.com/b8Nf5vnUKf
— Prashant Pitti (@ppitti) July 14, 2025
त्यांच्या पोस्टमध्ये प्रशांत पिट्टी यांनी लिहिले की शनिवारी रात्री आउटर रिंग रोड (ORR) वर फक्त ११ किमी अंतर कापण्यासाठी त्यांना दोन तासांपेक्षा जास्त वेळ लागला. ते १०० मिनिटे अशा चौकात अडकले होते जिथे सिग्नल नव्हता किंवा वाहतूक पोलिसही नव्हते.
प्रशांत पिट्टी यांनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिले आहे की त्यांना बेंगळुरूची वाहतूक सुधारायची आहे आणि त्यासाठी ते एआय अभियंते आणि पायाभूत सुविधांमध्ये १ कोटी रुपये गुंतवण्यास तयार आहेत. त्यांच्या पोस्टमध्ये त्यांनी गुगल मॅप्सच्या नवीन टूल रोड मॅनेजमेंट इनसाइटचा उल्लेख केला.
हे टूल शहराच्या ट्रॅफिकचा डेटा देते. प्रशांत पिट्टी यांना सॅटेलाइट इमेजेस आणि एआय वापरून शहरातील ट्रॅफिक जामचे कारण आणि वेळ शोधायची आहे.
प्रशांत पिट्टी यांनी त्यांच्या पोस्टमध्ये पुढे लिहिले आहे की ते एक किंवा दोन वरिष्ठ एमएल/एआय अभियंत्यांना पगार देण्यास तयार आहेत. यासोबतच, ते डेटा प्रक्रिया करण्यासाठी आवश्यक असलेले गुगल मॅप्स एपीआय कॉल, सॅटेलाइट इमेज अॅक्सेस आणि जीपीयू इन्फ्रास्ट्रक्चरचा खर्च उचलण्यास देखील तयार आहेत, परंतु हा प्रकल्प तेव्हाच यशस्वी होईल जेव्हा बेंगळुरू ट्रॅफिक पोलिस (बीटीपी) किंवा बीबीएमपी त्यांचा ट्रॅफिक डेटा किंवा एपीआय उघडतील आणि या डेटावर काम करण्यासाठी एक टीम नियुक्त करतील.