Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nashik News: ट्रॅफिक सिग्नलवरील ही चूक पडेल महागात, एका क्षणात ऑनलाईन चालान कापलं जाणार

सिग्नल जम्पिंग केल्यास ऑनलाईन दंड भरावा लागणार आहे. तसेच ट्रॅफिक सिग्नलवरील बेशिस्त वाहनचालकांवर कंट्रोल रूममधून नजर देखील असणार आहे. त्यामुळे ट्रॅफिक सिग्नलवर कोणतीही चूक करू नका.

  • By श्वेता झगडे
Updated On: Feb 13, 2026 | 03:12 PM
ट्रॅफिक सिग्नलवरील ही चूक पडेल महागात, एक क्षणात ऑनलाईन चालान कापलं जाणार

ट्रॅफिक सिग्नलवरील ही चूक पडेल महागात, एक क्षणात ऑनलाईन चालान कापलं जाणार

Follow Us
Follow Us:

नाशिक शहरातील ४० सिग्नल्सवर बेशिस्त वाहन चालवणाऱ्या चालकांवर यापुढे पोलीस कंट्रोल रूममधून दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. कंट्रोल रूममध्ये नियुक्त असलेले कर्मचारी लक्ष ठेवून बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई करतील. शहरातील सिग्नल्सवर सर्रास लेन कटींग, सिग्नल जम्पींग तसेच इतरांचा जीव धोक्यात येईल अशा प्रकारे वाहन चालवण्याचे प्रकार घडतात. स्मार्ट सिटीने शहरातील पन्नासपेक्षा अधिक सिग्नलवर सीसीटीव्ही कार्यरत केले आहेत. या सीसीटीव्ही फुटेज पोलीस आयुक्तालयातील कंट्रोल रूम पर्यंत पोहचते. मात्र, यापूर्वी वाहनचालकांवर ऑनलाईन कारवाई करण्याची सुविधा उपलब्ध नव्हती.

SUV खरेदी करण्याचा विचार करताय? ‘या’ 5 पर्यायांवर एकदा नजर टाकाच, किंमत फक्त…

याबाबत बोलताना वाहतूक विभागाच्या सहायक पोलिस आयुक्त अद्विता शिंदे यांनी सांगितले की, आमच्याकडे फुटेज उपलब्ध होतात. फुटेजमध्ये सिग्नल जम्पींगसह वाहतूक नियमांचे उल्लंघन होत असल्याचे प्रकार दिसून येतात. यामुळे वाहतूक कोंडी तसेच जीवघेण्या अपघातांचे प्रकार घडतात. या पार्श्वभूमीवर समोर येणाऱ्या व्हिडीओ फुटेजच्या माध्यमातून थेट वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करण्याचे नियोजन आखण्यात आले आहे. यासाठी वाहतूक विभागाच्या काही कर्मचाऱ्यांना विशेष प्रशिक्षण देण्यात येईल. यात नियमाचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांचा फोटो कसा घ्यावा. तो अपलोड करून संबंधित वाहनचालकांच्या मोबाईल क्रमांकावर दंड कसे पाठवात, याबाबत कर्मचारी प्रशिक्षित केले जातील.

पुढील आठवड्यात कारवाई

पुढील आठवड्यापर्यंत प्रशिक्षण पूर्ण होईल. यानंतर वाहतूक शाखेमार्फत थेट ऑनलाईन दंड करण्यास सुरूवात होईल. प्रत्येक सिग्नलवर वाहतूक पोलिस २४ तास उपलब्ध असणे शक्य नाही. कर्मचारी नसताना वाहनचालक आपल्यासह दुसऱ्याचा जीव धोक्यात घालतात. त्यामुळे ऑनलाईन पद्धतीचा वापर झाल्यास सिग्नल जम्पींग सारख्या घटनांना आळा बसू शकेल, असे एसीपी शिंदे यांनी स्पष्ट केले.

सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित शहरात रस्त्यांसह पायाभूत सुविधांचा विकास करण्यात येतो आहे. बेशिस्त वाहन चालकामुळे वाहतूक कोंडीची समस्या वारंवार निर्माण होते, यावर नियंत्रण ठेवण्यासाठी पुढील आठवड्यापासून ऑनलाईन दंड पाठवण्यात येईल, अशी माहिती वाहतूक शाखा सहायक पोलिस आयुक्त अद्विता शिंदे यांनी दिली.

हेल्मेट नसलं तरी चालान कापलं जाणार

वाहतूक नियमांनुसार, जर तुम्ही दुचाकी चालवताना हेल्मेट घातले नाही किंवा हेल्मेट घातले पण त्याची स्ट्रिप लॉक केलेली नसेल तर तुम्हाला २००० रुपये दंड आकारला जाऊ शकतो. हा नियम दुचाकी चालकांच्या सुरक्षिततेसाठी बनवण्यात आला आहे. अनेकदा असे घडते की दुचाकी चालकाने घातलेले हेल्मेटची स्ट्रिप लावलेली नसते. अशा स्थितीत हेल्मेट अपघाताच्या वेळी डोक्यातून निघून बाजूला पडू शकतं आणि दुचाकीचालकाचा अपघातात जीव जाऊ शकतो किंवा त्याच्या डोक्याला गंभीर इजा होऊ शकते.

असं नेमकं घडलं तरी काय? BMW ने अचानक 5 लाखांपेक्षा जास्त कारसाठी जारी केला रिकॉल

Web Title: Online fines for jumping signals control room monitors misbehaving drivers at traffic signals

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 13, 2026 | 03:12 PM

Topics:  

  • Traffic
  • Traffic Police

संबंधित बातम्या

Nashik Crime: सिग्नल तोडून महिला दुचाकीस्वाराला धडक; पोलिसाच्या अंगावर कार घालण्याचा प्रयत्न अन्…
1

Nashik Crime: सिग्नल तोडून महिला दुचाकीस्वाराला धडक; पोलिसाच्या अंगावर कार घालण्याचा प्रयत्न अन्…

चक्क सोसायटीतच झालं Traffic Jam, रहिवाशी महिलेनं केलं व्हिडीओ Viral
2

चक्क सोसायटीतच झालं Traffic Jam, रहिवाशी महिलेनं केलं व्हिडीओ Viral

वडगाव एमआयडीसी महामार्गावरील वाहतूक सुरळीत! विशाल लॉन्स चौकातील वाहतूक कोंडीवर पोलिसांनी काढला तोडगा
3

वडगाव एमआयडीसी महामार्गावरील वाहतूक सुरळीत! विशाल लॉन्स चौकातील वाहतूक कोंडीवर पोलिसांनी काढला तोडगा

Sajjangad : ब्लास्टिंगचा दणका अन् सज्जनगड घाट ठप्प! दरड कोसळल्याने शेकडो भाविक-पर्यटक अडकले
4

Sajjangad : ब्लास्टिंगचा दणका अन् सज्जनगड घाट ठप्प! दरड कोसळल्याने शेकडो भाविक-पर्यटक अडकले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.