1 लाखाचे झाले 46 लाख; 4 वर्षात 'या' शेअरने दिला तब्बल 4500 टक्के परतावा, गुंतवणूकदार मालामाल!
टेक कंपनीच्या शेअर्सने गेल्या 4 वर्षांत गुंतवणूकदारांचे पैसे जवळपास 46 पटीने वाढवले आहेत. कंपनीने अलीकडेच चेन्नई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (सीएमआरएल) कडून एक मोठा करार जिंकला आहे. हा करार चेन्नई मेट्रोच्या फेज दोनसाठी अत्याधुनिक ऑटोमेटेड फेअर कलेक्शन (एएफसी) सिस्टीम वितरीत करण्यासाठी आहे. ही कंपनी ऑरिओपेरो सोल्युशन्स आहे.
शेअर्स 35 रुपयांवरून 1634 रुपयांवर
मुंबई शेअर बाजाराच्या (बीएसई) डेटानुसार, ऑरिओपेरो सोल्युशन्सच्या शेअरची किंमत 8 नोव्हेंबर रोजी 1634.70 रुपयांवर बंद झाली. शेअर्स साेमवारी (ता.११) घसरून 1582 रुपयांवर आला आहे. 4 वर्षांपूर्वी 9 नोव्हेंबर 2020 रोजी शेअर 35.55 रुपयांवर होता. अशा प्रकारे गेल्या 4 वर्षात परतावा 4498 टक्के किंवा 4500 टक्के होता.
हे देखील वाचा – …तब्बल 99 टक्क्यांनी घसरला रिलायन्सचा शेअर; 792 रुपयांचा शेअर आला 2 रुपयांवर!
1 लाखाचे झाले 46 लाख
अर्थात एखाद्याने 4 वर्षांपूर्वी शेअर्समध्ये 10,000 रुपये गुंतवले असतील आणि अद्याप शेअर्स विकले नसतील, तर गुंतवणूक 4.60 लाख रुपये झाली असेल. त्याचप्रमाणे 20000 रुपयांची गुंतवणूक 9.20 लाख रुपयांमध्ये, 50000 रुपयांची गुंतवणूक 23 लाख रुपयांमध्ये आणि 1 लाख रुपयांची गुंतवणूक 46 लाख रुपयांमध्ये रूपांतरित झाली असती.
एका वर्षात 90 टक्के नफा
गेल्या वर्षभरात या शेअर्सने 90 टक्के परतावा दिला आहे. त्याच वेळी अवघ्या एका आठवड्यात किंमत 5 टक्क्यांहून अधिक खाली आली आहे. सप्टेंबर 2024 अखेरपर्यंत प्रमोटर्सकडे कंपनीत 26.88 टक्के हिस्सा होता. शेअर्सने 28 ऑगस्ट 2024 रोजी बीएसईवर 1,989.95 रुपयांचा 52 आठवड्यांचा उच्चांक तयार केला होता. तर 9 नोव्हेंबर 2023 रोजी 839.50 रुपयांचा 52 आठवड्यांचा नीचांक होता. कंपनीचे मार्केट कॅप 9000 कोटी रुपये आहे.
तिमाहीत नफा वाढला
जुलै-सप्टेंबर 2024 तिमाहीत ऑरिओपेरो सोल्युशन्सचा एकत्रित निव्वळ नफा 45.51 कोटी रुपये होता, जो वर्षभरात सुमारे 34 टक्क्यांनी वाढला आहे. वर्षभरापूर्वी नफा 34 कोटी रुपये होता. सप्टेंबर 2024 तिमाहीत ऑपरेशन्समधून एकत्रित महसूल 278.27 कोटी होता. जो एका वर्षापूर्वीच्या तुलनेत जवळपास 32 टक्क्यांनी वाढला आहे. सप्टेंबर 2023 तिमाहीत महसूल 211.15 कोटी रुपये होता.
(टीप : शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. वरती दिलेली माहिती माहितीस्तव देण्यात आली आहे. गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा यामागील उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)