
संभाजीनगरमध्ये शेअर मार्केटच्या नावाखाली मोठी फसवणूक (Photo Credit - Ai)
कशी झाली फसवणूक?
प्रकरणात मुबारक बिन हबिब अलजाबरी (४३, रा. रहेमानिया कॉलनी, किराडपुरा) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, फिर्यादीची ओळख आरोपी राजेंद्र बरडे याच्याशी झाल्यानंतर त्याने पुण्यात सुरू असलेली कंपनी आणि शेअर मार्केटमधील उलाढाल याबाबत माहिती देत फिर्यादीस गुंतवणुकीस प्रवृत्त केले. १३ जुलै २०२३ रोजी फिर्यादीने २० हजार रुपयांची गुंतवणूक केली. सुरुवातीला दररोज १ टक्के प्रमाणे आठवड्याला परतावा नियमित मिळू लागल्याने विश्वास बसला. नंतर एका हॉटेलात आयोजित बैठकीत बरडे याच्या संपूर्ण कुटुंबाने कंपनीत सक्रिय सहभाग असल्याचे सांगून गुंतवणूकदारांना आश्वस्त केले.
परताव्याच्या आमिषाने केला विश्वासघात
सर्व काही सुरळीत सुरु असतांना राजेंद बरडे याने बिजनेस वाढला असून आता आठवड्याला परतावा देणे शक्य नाही, त्यामुळे १६ महिन्यांनंतर मूळ रक्कम मिळेल व तोपर्यंत महिन्याला १२.५ प्रमाणे परतावा देण्यात येईल असे सांगत एक चेक फियांदीला दिला. व त्यासोबत १६ महिन्यांनतर मूळ रक्कम परत करेल असे अग्रीमेंट देखील करुन दिले.
गुजरात-बिहार कनेक्शन
चौकशीदरम्यान आरोपी हे कानपूर येथून गुटखा व पानमसाल्याचे रॅपर मागवत असल्याचे उघड झाले आहे. या रॅपरवर गुजरात, बिहार व राजस्थान येथील पत्ते नमूद असल्याने बनावट गुटख्याची विक्री त्या राज्यांतही होत असल्याचा पोलिसांना संशय आहे. तसेच तय्यब हा बनावट गुटखा मुंबईतही विक्री करीत असल्याची माहिती उपनिरीक्षक जगन्नाथ मेनकुदळे यांनी दिली.
इतर ठेवीदारांनाही बसला मोठा फटका
या प्रकरणात केवळ फिर्यादीच नव्हे तर इतर गुंतवणूकदारांचीही मोठी रक्कम अडकली आहे. यात प्रदिप कोळगे ३ लाख, कालिंदा कोळगे ८ लाख ९५ हजार, पांडुरंग म्हस्के ४ लाख १० हजार, तुषार गुप्ता १२ लाख, मिरा धावणे २ लाख २५ हजार, देविदास धावणे २ लाख ५४ हजार ५५० रुपये असे एकूण ३२ लाख ८४ हजार ५५० रुपये तसेच, फिर्यादीसह एकूण फसवणूक रक्कम ४४ लाख १ हजार ५५० रुपये गंडा घालण्यात आला. प्रकरणात सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे.
हे देखील वाचा: Kolhapur News : पाणीपुरवठा योजनेत भष्टाचार; उद्घाटनापूर्वीच पाण्याच्या टाकीचे तीनतेरा