देशभरातील नागरिकांकडे 6970 कोटींच्या 2000 हजाराच्या नोटा पडून; तुमच्याकडे तर नाही ना? ...इथे करा जमा!
केंद्र सरकारने ८ नोव्हेंबर २०१६ रोजी नोटबंदीची घोषणा केली होती. ज्यामुळे चलनात नव्याने २००० रुपये आणि ५०० रुपये यांची नोट दाखल झाली होती. मात्र, केंद्र सरकारने ५०० रुपयांची नोट भारतीय बाजारात कायम ठेवली. तर त्यानंतर 19 मे 2023 रोजी केंद्रातील सरकारने २००० रुपयांची नोट चलनातून काढून घेतली होती. त्यानंतर आता बाजारातून २००० रुपयांच्या नोटा मागे घेतल्याच्या दीड वर्षांनंतर देखील २००० रुपयांच्या नोटा मोठ्या प्रमाणात नागरिकांकडे असल्याचे समोर आले आहे.
6,970 कोटींच्या नोटा नागरिकांकडे शिल्लक
भारतीय रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) दिलेल्या माहितीत म्हटले आहे की, 2000 रुपयांच्या 98.04 टक्के नोटा बँकिंग सिस्टममध्ये परत आल्या आहेत. अशातच आता अशा परिस्थितीत 6,970 कोटी रुपयांच्या नोटा लोकांकडे शिल्लक आहेत. आरबीआयने 19 मे 2023 रोजी 2000 रुपयांची नोट चलनातून काढून घेण्याची घोषणा केली होती. एक वर्षाहून अधिक काळ लोटला तरी लोक 2000 रुपयांच्या संपूर्ण नोटा का परत करत नाहीत? असा सवाल उपस्थित होत आहे.
(फोटो सौजन्य – istock)
98.04 टक्के नोटा परत
आरबीआयने म्हटले आहे की, 19 मे 2023 रोजी 2000 रुपयांच्या नोटा चलनातून काढून टाकण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्या वेळी, व्यवसाय बंद असताना, 3.56 लाख कोटी रुपयांच्या 2000 रुपयांच्या नोटा चलनात होत्या. 31 ऑक्टोबर 2024 रोजी व्यवहाराच्या शेवटी चलनात असलेल्या नोटांचे मूल्य 6,970 कोटी रुपये होते. आरबीआयने निवेदनात म्हटले आहे की, ’19 मे 2023 पर्यंत चलनात असलेल्या 2,000 रुपयांच्या 98.04 टक्के नोटा परत आल्या आहेत. या नोटा 7 ऑक्टोबर 2023 पर्यंत सर्व बँक शाखांमध्ये जमा करण्याची किंवा बदलण्याची सुविधा उपलब्ध होती. रिझर्व्ह बँकेच्या १९ क्षेत्रीय कार्यालयांमध्ये ही सुविधा आजही उपलब्ध आहे.
हे देखील वाचा – क्रिकेटचा किंग विराट कोहली कमाईतही आहे अव्वल, 1000 कोटींहून अधिक संपत्तीचा आहे मालक!
जमा न होण्याची काय आहे कारणे?
दरम्यान, देशभरातील नागरिकांकडून 2000 रुपयाच्या सर्व नोटा परत न येण्यामागे अनेक कारणे असू शकतात. याचे कोणतेही अधिकृत कारण नाही. मात्र, काही लोक काळा पैसा म्हणून 2000 रुपयांच्या नोटांचा साठा करत असतील आणि त्यामुळे ते बँकांमध्ये जमा करत नसतील. दुसरे म्हणजे, सात वर्षांत काही नोटा हरवल्या, फाटल्या किंवा खराब झाल्या असण्याचीही शक्यता आहे. या कारणास्तव ते देखील बँकेत जमा होऊ शकले नाहीत. असेही मानले जात आहे की काही नोटा परदेशात राहणाऱ्या भारतीयांकडे असू शकतात आणि त्यामुळे त्या परत आणण्यासाठी वेळ लागू शकतो.
महाराष्ट्रात कुठे मिळतील नोटा बदलून
मुंबई – जनरल मॅनेजर, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, इश्यू डिपार्टमेंट मेन बिल्डिंग, शहीद भगतसिंग मार्ग, फोर्ट, मुंबई – 400 001.
नागपूर – भारतीय रिझर्व्ह बँक महाव्यवस्थापक, इश्यू डिपार्टमेंट मेन ऑफिस बिल्डिंग, डॉ. राघवेंद्र राव रोड, पोस्ट बॉक्स नंबर 15, सिव्हिल लाइन्स, नागपूर – 440 001.