शेअर बाजार पुन्हा सावरला; सेन्सेक्स, निफ्टी, बॅंक निफ्टीत मोठी वाढ, गुंतवणूकदारांना दिलासा!
सोमवारी (ता.४) भारतीय शेअर बाजारात मोठी घसरण पाहायला मिळाली होती. ही अमेरिकी निवडणूकीदरम्यानची आजपर्यंतची सर्वोत्तम घसरण ठरली होती. त्यानंतर मात्र, आज (ता.५) भारतीय शेअर बाजार निच्चांकी पातळीवरून पुन्हा सावरला आहे. सोमवारी झालेली सर्व घसरण कव्हर करून, वाढीसह व्यवसाय बंद करण्यात आज शेअर बाजाराला यश मिळाले आहे. सोमवारी बँक-निफ्टीने सुमारे 500-600 अंकांची घसरण दर्शवली आहे. तर आज सेन्सेक्समध्ये देखील सुमारे 1000 अंकांची सुधारणा दिसून आली आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांना मोठा दिलासा मिळाला आहे.
शेअर बाजार कोणत्या पातळीवर बंद?
मुंबई शेअर बाजाराचा (बीएसई) सेन्सेक्स 694.39 अंकांच्या किंवा 0.88 टक्क्यांच्या वाढीसह 79,476.63 वर बंद झाला आहे. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा (एनएसई) निफ्टी 217.95 अंकांच्या किंवा 0.91 टक्क्यांच्या वाढीसह 24,213.30 च्या पातळीवर बंद झाला आहे.
हे देखील वाचा – उद्या शेअर बाजारात खुला होणार हा जबरदस्त आयपीओ; पैसे तयार ठेवा, कमाईची मोठी संधी!
बँक निफ्टीमध्ये 1.92 टक्क्यांनी मजबूत वाढ?
सकाळी बाजार उघडल्यानंतर लगेचच बँक निफ्टी 51102 च्या पातळीवर दिसला. आज बाजारातील रिकव्हरीमुळे त्याला जबरदस्त उलटसुलट उलथापालथ झाली आणि तो सुमारे हजार अंकांच्या वाढीसह बंद होऊन गुंतवणूकदारांना दिलासा देऊ शकला आहे. आज मंगळवारी, बँक निफ्टीने शेअर बाजारात 992 अंकांची किंवा 1.92 टक्क्यांनी मजबूत वाढ करून 52,207 च्या स्तरावर दाखवली आहे.
हे देखील वाचा – क्रिकेटचा किंग विराट कोहली कमाईतही आहे अव्वल, 1000 कोटींहून अधिक संपत्तीचा आहे मालक!
सेन्सेक्स शेअर्सची स्थिती
मुंबई शेअर बाजाराच्या (बीएसई) सेन्सेक्समधील 30 पैकी 21 समभाग वाढीसह बंद झाले आणि 9 समभाग घसरणीसह बंद झाले. जेएसडब्लू स्टील 4.72 टक्क्यांनी तर टाटा स्टील 3.64 टक्क्यांनी वाढून बंद झाला. ॲक्सिस बँक २.७३ टक्क्यांनी, एचडीएफसी बँक २.५६ टक्क्यांनी आणि इंडसइंड बँक २.४९ टक्क्यांनी बंद झाली. देशातील सर्वात मोठी सरकारी बँक स्टेट बॅंक ऑफ इंडिया (एसबीआय 2.33 टक्क्यांच्या वाढीसह बंद झाली.
किती आहे मार्केट कॅप
मुंबई शेअर बाजाराचे (बीएसई) बाजार भांडवल 444.77 लाख कोटी रुपयांवर बंद झाले आहे आणि कालच्या तुलनेत त्यात चांगली उडी दिसून आली आहे. बीएसईवर 4058 शेअर्सचे व्यवहार झाले, त्यापैकी 2468 शेअर्स वाढले आणि 1478 शेअर्स घसरणीसह बंद झाले. 112 समभाग कोणताही बदल न करता बंद झाले.
(टीप : शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. वरती दिलेली माहिती माहितीस्तव देण्यात आली आहे. गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा यामागील उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)