अवघ्या 22 व्या वर्षी शान पटेल हा भारतातील सर्वात तरुण फंड मॅनेजर
शान पटेलने अवघ्या 22 वर्षांच्या वयात भारतातील सर्वात तरुण फंड मॅनेजर होऊन इतिहासात आपले नाव कोरले आहे. तसेच त्याने शान पटेल ॲसेट मॅनेजमेंट एलएलपी नावाची सेबी-नोंदणीकृत ॲसेट मॅनेजमेंट कंपनी सुरू केली असून, या अंतर्गत त्यांनी श्रेणी III पर्यायी गुंतवणूक निधी सादर केला आहे, ज्याने यापूर्वीच 31 कोटी रुपयांचा निधी उभारला आहे.
शान पटेलचे फंड मॅनेजमेंट मधील पदार्पण हे भारताच्या वित्तीय क्षेत्रातील पिढ्यानपिढ्याच्या बदलाचे संकेत देते. फायनान्स, डेटा सायन्स आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स यांसारख्या क्षेत्रातील त्यांची शैक्षणिक पार्श्वभूमी, नव्या युगातील गुंतवणूकदारांचे प्रतिक ठरते, जे आर्थिक मूलभूत तत्त्वे आणि प्रगत तांत्रिक अंतर्दृष्टी यांचा प्रभावी कॉम्बिनेशन साधतात.
टाटा कॅपिटलचा IPO शेवटच्या दिवशी पूर्णपणे बुक; GMP फक्त 7.5, लिस्टिंग 330-340 दरम्यान अपेक्षित
शान पटेल ॲसेट मॅनेजमेंट अंतर्गत प्रमुख फ्लेक्सी-कॅप फंड आर्टिफिशियल इंटेलिजन्स, फिनटेक आणि अक्षय ऊर्जा यांसारख्या उच्च-वाढीच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. या फंडाची विशेष स्ट्रॅटर्जी म्हणजे ‘इंटेलिजंट चर्निंग’, जी पोर्टफोलिओचे सक्रिय मॅनेजमेंट करण्यासाठी क्वांट-शक्तीवर आधारित मॉडेल वापरते. पारंपारिक ‘खरेदी करा आणि धरून ठेवा’ धोरणांच्या विपरीत, हा दृष्टिकोन तात्पुरत्या अति-मूल्यांकनांना ओळखतो, नफा बुक करतो आणि मूल्यांकन सामान्य झाल्यावर पुन्हा स्टॉक्समध्ये प्रवेश करतो. या गतिमान मॉडेलचा उद्देश धोका कमी करताना परतावा जास्तीत जास्त वाढवणे आहे.
गुंतवणूकदारांचे संरक्षण सुनिश्चित करण्यासाठी फंडामध्ये रिस्क मॅनेजमेंटचे नियम आहेत. यामध्ये कोणत्याही एका स्टॉकवर 10% पेक्षा जास्त एक्सपोजर न ठेवण्याची मर्यादा समाविष्ट असून याद्वारे पोर्टफोलिओचे विविधीकरण आणि स्थिरता सुनिश्चित होते.
Share Market Closing: IT शेअर्समध्ये खरेदी असूनही बाजारात घसरण; सेन्सेक्स 153 अंकांनी कोसळला
या लाँचबद्दल बोलताना, संस्थापक आणि सीआयओ शान पटेल यांनी सांगितले, “आमचे उद्दिष्ट पारंपारिक गुंतवणुकीच्या शिस्तीला डेटा आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या सामर्थ्याशी जोडणे आहे. ‘इंटेलिजंट चर्निंग’च्या माध्यमातून, आम्ही बाजारचक्रांपेक्षा एक पाऊल पुढे राहून सातत्यपूर्ण, रिस्क ॲडजस्ट परतावा देण्याचे लक्ष्य ठेवले आहे.”
भारतातील सर्वात तरुण फंड व्यवस्थापक म्हणून शान पटेल यांची ही कामगिरी, भारतातील संपत्ती व्यवस्थापन क्षेत्रातील दूरदर्शी आणि तंत्रज्ञान-आधारित दृष्टिकोनाची शक्यता अधोरेखित करते.