Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

3 कोटी घरे, तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था; पंतप्रधान मोदींनी रशियात सांगितला 3.0 वाला प्लॅन!

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या दोन दिवशीय रशिया दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी भारतीय समुदायाला संबोधित करताना, तीनपट वेगाने काम करण्याची सरकारची योजना असल्याचे सांगितले आहे. तर देशाला जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनवणार असल्याचे उदगार देखील त्यांनी यावेळी काढले आहे.

  • By गोरक्षनाथ ठाकरे
Updated On: Jul 18, 2024 | 06:10 PM
मोदी ऑगस्टमध्ये देणार युक्रेनला भेट

मोदी ऑगस्टमध्ये देणार युक्रेनला भेट

Follow Us
Close
Follow Us:

पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या दोन दिवशीय रशिया दौऱ्यावर आहेत. राजधानी मॉस्कोमध्ये पोचताच त्यांचे रशियन राष्ट्रपती व्लादिमिर पुतीन यांनी जोरदार स्वागत केले आहे. अशातच रशियामध्ये असलेल्या भारतीय समुदायामध्ये पोचताच पंतप्रधान मोदी यांनी सांगितले आहे की, त्यांच्या तिसऱ्या कार्यकाळात कशा पद्धतीने अंक ३ हा केंद्रबिंदू असणार आहे. विशेष म्हणजे सरकारच्या सर्वच लक्ष्यांमध्ये त्याच्या प्रभाव दिसून येणार आहे. देशातील गरिबांसाठी ३ कोटी घरे बनवणे असो किंवा मग देशाला जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनवणे असो. अशा सर्वच बाबींमध्ये ३ अंकांची झलक पाहायला मिळणार आहे.

Modi 3.0 मध्ये अंक ३ ची कमाल

रशियातील भारतीय समुदायाला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे की, केंद्र सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळात देशाला तीनपट वेगाने काम करण्याबाबत ध्येय निश्चित करण्यात आले आहे. १० वर्षांपूर्वी देशात जेव्हा स्टार्टअप्सची संख्या शेकडोमध्ये होती. ती आज लाखोंच्या संख्येत पोहचली आहे. ज्यामुळे सध्या भारत जगातील तिसरा सर्वात मोठा स्टार्टअप इकोसिस्टम म्हणून समोर आला आहे. त्यांनी म्हटले आहे की भारतीय तरुणांमध्ये असलेली पॉवर आणि टॅलेंट पाहून जगभरातील देशांच्या भुवया उंचावत आहे. याशिवाय मागील दहा वर्षातील सरकारची काम करण्याची गती पाहता, विदेशातून भारतात येणारे लोक भारत बदलत आहे, हे वाक्य उच्चारत आहे.
(फोटो सौजन्य : ‘एक्स’ अकाउंट)

काय आहेत सरकारची लक्ष्य

आपल्या Modi 3.0 कार्यकाळामध्ये सरकारच्या असलेल्या योजनेबाबत नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे की, मी देशाचा पंतप्रधान म्ह्णून तिसऱ्यांदा शपथ घेतली आहे. त्यामुळे आता तीनपट वेगाने काम करण्याचे सरकारचे लक्ष्य असणार आहे. याशिवाय देशाला तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनवणार आहे. देशातील महिलांचे सशक्तीकरण करण्यासाठी लखपती दीदी योजनेद्वारे तीन कोटी महिलांना रोजगार मिळवून देण्याचे सरकारचे लक्ष्य आहे. ज्यामुळे महिलांना वार्षिक १ लाखाहून अधिक मानधन मिळण्यास मदत होणार आहे. याशिवाय सरकारकडून तीन कोटी गरिबांना घरे बांधून दिली जाणार आहे.

मागील १० वर्ष केवळ ट्रेलर होती

पंतप्रधान मोदी यांनी पुढे बोलताना म्हटले आहे की, मागील १० वर्षांपासून सरकार केवळ आरोग्य सुविधांमध्ये सुधारणा करण्यावर भर देत नाहीये. तर सरकारकडून देशातील गरीब कुटुंबांना ५ लाख रुपयेपर्यंतचे उपचार देशभरातील हॉस्पिटलमध्ये मोफत दिले जात आहे. आपल्या सरकारची मागील १० वर्ष ही केवळ ट्रेलर होती. मात्र, येणारी पुढील १० वर्ष ही देशाच्या विकासामध्ये तेजीने वाढ होणार आहे.

Web Title: 3 crore house third largest economy prime minister modi told the 3 0 plan in russia

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 09, 2024 | 04:12 PM

Topics:  

  • Naredra Modi

संबंधित बातम्या

पंतप्रधान नरेंद्र मोदी नवरात्रीमध्ये नऊ दिवस करतात उपवास! दिवसातून एकदा आहारात केले जाते ‘या’ फळाचे सेवन
1

पंतप्रधान नरेंद्र मोदी नवरात्रीमध्ये नऊ दिवस करतात उपवास! दिवसातून एकदा आहारात केले जाते ‘या’ फळाचे सेवन

पंतप्रधान नरेंद्र मोदींना आवडतात ‘या’ हिरव्या शेंगा, नियमित सेवन केल्यास आरोग्याला होतील जबरदस्त फायदे
2

पंतप्रधान नरेंद्र मोदींना आवडतात ‘या’ हिरव्या शेंगा, नियमित सेवन केल्यास आरोग्याला होतील जबरदस्त फायदे

पंतप्रधान मोदी आणि सिंगापूरचे पंतप्रधान वोंग यांच्या हस्ते जेएन पोर्ट पीएसए मुंबई टर्मिनल फेज-२ चे उद्घाटन
3

पंतप्रधान मोदी आणि सिंगापूरचे पंतप्रधान वोंग यांच्या हस्ते जेएन पोर्ट पीएसए मुंबई टर्मिनल फेज-२ चे उद्घाटन

Women’s Chess World Champion : ‘अनेक तरुणींना प्रेरणा..’, बुद्धिबळ विश्वचषक विजेत्या दिव्याचे पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
4

Women’s Chess World Champion : ‘अनेक तरुणींना प्रेरणा..’, बुद्धिबळ विश्वचषक विजेत्या दिव्याचे पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.