Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

3 दिवसांच्या Bank Strike मुळे सेवा विस्कळीत होणार? SBI सह इतर बँकांनी Customers साठी जारी केल्या महत्त्वाच्या सूचना!

Bank Strike Customer Guide : स्टेट बँक ऑफ इंडिया SBI आणि इतर प्रमुख सार्वजनिक बँकांनी ग्राहकांना महत्त्वाची कामे वेळेआधीच पूर्ण करण्याचा सल्ल्यासह इतर स्पष्ट सल्ले दिले आहेत. शाखांमधील कामे, Cheques व मंजुरी प्रक्रियेवर काय परिणाम होईल आणि ग्राहकांनी कोणती खबरदारी घ्यावी, हे स्पष्ट केलं आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Sep 25, 2026 | 01:54 PM
बँकांच्या ३ दिवसांच्या संपामुळे सेवा विस्कळीत होणार? ( सौजन्य - सोशल मीडिया )

बँकांच्या ३ दिवसांच्या संपामुळे सेवा विस्कळीत होणार? ( सौजन्य - सोशल मीडिया )

Follow Us
Follow Us:
  • 3 दिवसांच्या Bank Strike मुळे सेवा विस्कळीत होणार?
  • SBI सह इतर बँकांच्या सूचना
  • Customers नी नेमकं करायचं काय?
Bank Strike Customer Guide : बँकेत काही काम असेल तर ही बातमी तुमच्यासाठी फार महत्त्त्वाची आहे. कारण देशातील महत्त्वाच्या बँकांतील कर्मचारी ३ दिवसांसाठी संपावर जाणार आहे. युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स म्हणजेच UFBU ने २८ ते ३० सप्टेंबर दरम्यान पुकारलेल्या ३ दिवसांच्या देशव्यापी संपामुळे बँक शाखांमधील कामकाज प्रभावित होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर SBI आणि इतर प्रमुख सार्वजनिक बँकांनी ग्राहकांना महत्त्वाची कामे वेळेआधीच पूर्ण करण्यासह इतर काही महत्त्वाचे सल्ले दिले आहेत. ( Bank Strike Customer Guide ) 

UPI Payment Charges : फक्त भारतातच नाही, UPI सेवा असलेल्या 11 देशांमध्येही लागणार चार्जेस; वित्त मंत्रालयाचे संकेत

देशातील सर्वात मोठ्या सार्वजनिक क्षेत्रातील बँकेने, SBI ने, मंगळवारी एका निवेदनात आपल्या ग्राहकांना ही सूचना जारी केली. त्यात म्हटले आहे की, इंटरनेट बँकिंग, मोबाईल ॲप्लिकेशन्स आणि यूपीआय सुविधा नेहमीप्रमाणे सुरू राहतील.

SBI ने काय स्पष्ट केलं?

SBIने हे स्पष्ट केलं की, “काही बँक कर्मचारी संघटनांनी २८ ते ३० सप्टेंबर या तीन दिवसांच्या संपाची घोषणा केली आहे, त्यामुळे कृपया आपले अत्यावश्यक व्यवहार हे आगाई पूर्ण करा. इतर सर्व एटीएम आणि ग्राहक सेवा केंद्रे, इंटरनेट आणि मोबाईल बँकिंग, यूपीआय आणि इतर डिजिटल चॅनेल नेहमीप्रमाणे कार्यरत राहतील, त्यामुळे कृपया त्यांचा वापर करा.”

इंडियन बँकेनेही ग्राहकांना सतर्क केले आहे, “प्रस्तावित बँक संपामुळे बँकिंग सेवांवर परिणाम होऊ शकतो. कृपया मोबाईल बँकिंग, एटीएम आणि डिजिटल चॅनेलचा वापर करा.”

बँकेच्या प्रमुख सूचना

  • ग्राहकांनी बँक संपापूर्वी आपले अत्यावश्यक व्यवहार पूर्ण करावेत.
  • इंटरनेट बँकिंग, मोबाईल ॲप्लिकेशन्स आणि यूपीआय सुविधा कार्यरत राहतील.
  • SBI च्या योनो ॲपचा वापर करून सर्व आर्थिक व्यवहार पूर्वीप्रमाणेच पूर्ण करता येतील.

बँक युनियन्सच्या मागण्या काय?

हा बँक संप युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स UFBU ने पुकारला आहे. या तीन दिवसीय देशव्यापी संपाचा भाग म्हणून, बँक युनियन्स पाच दिवसांच्या कामाच्या आठवड्याची आणि कामगिरी-आधारित प्रोत्साहन PLI योजना मागे घेण्याची मागणी करत आहेत. हे समजून घ्या:

सध्या, बँका रविवारी, तसेच दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी बंद असतात. बँक कर्मचारी RBI आणि LIC प्रमाणे पाच दिवसांच्या कामाच्या आठवड्याची मागणी करत आहेत. मार्च २०२४ च्या वेतन करारामध्ये यावर सहमती झाली होती, परंतु हे प्रकरण प्रलंबित आहे.

PLI योजना मागे घेण्याची मागणी – कर्मचारी सरकारच्या सुधारित पीएलआय (PLI) योजनेच्या अंमलबजावणीचाही निषेध करत आहेत. बँकांमध्ये वरिष्ठ अधिकारी आणि कनिष्ठ कर्मचारी यांच्या प्रोत्साहनांमध्ये मोठी तफावत आहे. बँक कर्मचाऱ्यांच्या आंदोलनानंतर, केंद्रीय अर्थ मंत्रालयाने सप्टेंबर २०२६ मध्ये या सुधारित योजनेच्या अंमलबजावणीला तात्पुरती स्थगिती दिली आहे.

RBI कडून ग्राहकांना दिलासा

पाच दिवसांचा संप टाळण्यासाठी, भारतीय रिझर्व्ह बँके RBI ने सर्व सार्वजनिक क्षेत्रातील बँका आणि प्रादेशिक ग्रामीण बँकांना रविवार पासून सामान्य बँकिंग कामकाज पुन्हा सुरू करण्याची परवानगी दिली आहे. यानंतर, सर्व बँक शाखा, कार्यालये, एटीएम-संलग्न शाखा आणि करन्सी चेस्ट पूर्णपणे कार्यरत राहतील.

या महिन्यातील दुसरा संप

बँक संघटनांनी यापूर्वी ११ सप्टेंबर रोजी एक दिवसाचा संप केला होता. संपकरी बँक संघटनांनी आता इशारा दिला आहे की, त्यांच्या मागण्या पूर्ण न झाल्यास, ते २६ ऑक्टोबरपासून देशव्यापी अनिश्चित काळासाठी संप पुकारतील.

Aadhar Housing Finance: आधार हाउसिंग फायनान्सला मोठे रेटिंग अपग्रेड; ICRA कडून ‘AA+/Stable’ मानांकन

Web Title: 3 days bank strike advisory sbi and other banks issue guidelines for customers marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 25, 2026 | 01:54 PM

Topics:  

  • Bank
  • Bank Employee

संबंधित बातम्या

Sunday Bank Open: बँक ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; 27 सप्टेंबरला रविवार असूनही सरकारी बँकांचे कामकाज राहणार सुरू
1

Sunday Bank Open: बँक ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; 27 सप्टेंबरला रविवार असूनही सरकारी बँकांचे कामकाज राहणार सुरू

Bank Strike: बँकेच्या संपाची बोंबाबोंब! कोणत्या दिवशी राहणार बंद, UPI-ATM वर परिणाम होणार की नाही
2

Bank Strike: बँकेच्या संपाची बोंबाबोंब! कोणत्या दिवशी राहणार बंद, UPI-ATM वर परिणाम होणार की नाही

Bank Strike September 2026: बँक ग्राहकांनो, ‘या’ 3 तारखा लक्षात ठेवा! संपामुळे व्यवहारांवर होऊ शकतो परिणाम
3

Bank Strike September 2026: बँक ग्राहकांनो, ‘या’ 3 तारखा लक्षात ठेवा! संपामुळे व्यवहारांवर होऊ शकतो परिणाम

Bank बदलला तरी FASTagची चिंता नको! OneTagमुळे जुन्या वॉलेटचं काय होणार जाणून घ्या
4

Bank बदलला तरी FASTagची चिंता नको! OneTagमुळे जुन्या वॉलेटचं काय होणार जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.