
फोटो सौजन्य - Social Media
शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांसाठी पुढील आठवडा खास ठरणार आहे. कारण पुढील आठवड्यात चार नवे IPO खुले होणार आहेत. यामध्ये जयेश लॉजिस्टिक्स, गेम चेंजर्स टेक्सफॅब, ओर्कला इंडिया आणि सेफक्योर सर्व्हिसेस या कंपन्यांचा समावेश आहे. यापैकी फक्त ओर्कला इंडियाचा IPO मुख्य (Mainboard) कॅटेगरीचा आहे, तर उर्वरित तिन्ही SME कॅटेगरीमध्ये येतात. चला तर जाणून घेऊया या IPOचे तपशील आणि त्यांचा सध्याचा GMP (ग्रे मार्केट प्रीमियम) काय आहे.
जयेश लॉजिस्टिक्स IPO
जयेश लॉजिस्टिक्सचा IPO 27 ऑक्टोबर रोजी खुला होऊन 29 ऑक्टोबर 2025 रोजी बंद होणार आहे. या IPO साठी शेअर्सचा प्राइस बँड ₹116 ते ₹122 इतका ठेवण्यात आला आहे. InvestorGainच्या माहितीनुसार, सध्या या IPOचा GMP ₹4 चालू आहे, मात्र लिस्टिंगपूर्वी यात वाढ किंवा घट होऊ शकते.
गेम चेंजर्स टेक्सफॅब IPO
गेम चेंजर्स टेक्सफॅबचा IPO 28 ऑक्टोबर ते 30 ऑक्टोबर 2025 या कालावधीत खुला राहील. या IPOचा प्राइस बँड ₹96 ते ₹102 आहे. सध्या या कंपनीचा GMP शून्य (₹0) असल्याचं InvestorGainच्या डेटानुसार दिसतं. या IPOचा एकूण साइज ₹54.84 कोटी रुपये इतका आहे.
ओर्कला इंडिया IPO (Mainboard)
मुख्य बाजाराचा सर्वात मोठा IPO म्हणजे ओर्कला इंडिया! हा IPO 29 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबर 2025 या दरम्यान खुला राहील. या IPOमध्ये शेअरचा प्राइस बँड ₹695 ते ₹730 निश्चित करण्यात आला आहे. InvestorGainच्या मते, सध्या या IPOचा GMP ₹125 इतका आहे. हा IPO एकूण ₹1,667.54 कोटी रुपये एवढ्या मोठ्या आकाराचा आहे.
सेफक्योर सर्व्हिसेस IPO
सेफक्योर सर्व्हिसेसचा IPO देखील 29 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबर 2025 या कालावधीत खुला राहील. या IPOचा प्राइस ₹102 रुपये आहे आणि सध्या या IPOचा GMP ₹0 असल्याचं सांगितलं जातं.
IPO म्हणजे काय?
IPO (Initial Public Offering) म्हणजे अशी प्रक्रिया ज्यामध्ये एखादी खाजगी (Private) कंपनी प्रथमच सार्वजनिक (Public) गुंतवणूकदारांना आपले शेअर्स विकते. या प्रक्रियेद्वारे कंपनीला आपल्या वाढीसाठी आवश्यक निधी उभारता येतो आणि गुंतवणूकदारांना त्या कंपनीत मालकी हक्क (Ownership Stake) घेण्याची संधी मिळते. IPO नंतर कंपनीचे शेअर्स BSE किंवा NSE सारख्या स्टॉक एक्सचेंजवर सूचीबद्ध (List) होतात.
शेअर बाजारात गुंतवणुकीची आवड असणाऱ्यांसाठी हा आठवडा रोमांचक ठरणार आहे. कारण चार वेगवेगळ्या कंपन्यांचे IPO एकाच आठवड्यात खुलणार आहेत!