AI च्या जगात अंबानींची मोठी एन्ट्री! (Photo Credit- X)
Reliance-Meta Venture: भारतातील सर्वात मोठ्या व्यावसायिक समूहांपैकी एक असलेल्या रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (RIL) ने मेटा प्लॅटफॉर्म्स (Meta Platforms) च्या फेसबुक ओव्हरसीज (Facebook Overseas) कंपनीसोबत भागीदारी करत एका नवीन आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) संयुक्त उपक्रमाची घोषणा केली आहे. या नवीन कंपनीचे नाव रिलायन्स एंटरप्राइज इंटेलिजेंस लिमिटेड (REIL) असेल आणि ती भारतात एंटरप्राइज AI सेवांचा विकास आणि व्यवसाय करेल.
Big Move in India’s Tech Landscape! When Reliance joins hands with Meta, it’s not just collaboration — it’s the foundation of India’s next AI empire. The Rise of Reliance Enterprise Intelligence Ltd On Oct 24, 2025, Reliance Intelligence officially incorporated REIL in India —… pic.twitter.com/LBw3cMBSis — Smart Sync Investment Advisory Services (@SmartSyncServ) October 25, 2025
दोन्ही कंपन्या मिळून सुमारे ८५५ कोटी रुपयांची प्रारंभिक गुंतवणूक करतील. या नवीन कंपनीत रिलायन्स इंटेलिजन्सची (Reliance Intelligence) ७० टक्के आणि फेसबुकची (मेटा) ३० टक्के हिस्सेदारी असेल. सुरुवातीला रिलायन्स इंटेलिजन्सने २ कोटी रुपयांच्या भांडवलासह REIL ची १००% उपकंपनी म्हणून स्थापना केली होती, जी आता करारानुसार संयुक्त उपक्रम म्हणून काम करेल. REIL च्या स्थापनेसाठी कोणत्याही सरकारी किंवा नियामक मंजुरीची आवश्यकता नव्हती, असे कंपनीने स्पष्ट केले आहे.
रिलायन्सची ही नवीन AI कंपनी भारतात मोठ्या उद्योगांसाठी अद्ययावत AI तंत्रज्ञान आणि सोल्यूशन्स उपलब्ध करून देण्यावर लक्ष केंद्रित करेल. ही कंपनी META च्या ओपन-सोर्स लार्ज लँग्वेज मॉडेल (Llama) वर आधारित ‘एजेंटिक एंटरप्राइझ AI प्लॅटफॉर्म’ आणि टूल्स विकसित करण्यावर भर देईल.
ऑगस्टमध्ये झालेल्या RIL च्या ४८ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत (AGM) मेटाचे संस्थापक मार्क झुकरबर्ग यांनी व्हर्च्युअल माध्यमातून सहभाग घेतला होता. Llama मॉडेल मानवी क्षमता, उत्पादकता आणि नवनवीनता वाढवू शकते, असे त्यांनी म्हटले होते. मुकेश अंबानी यांनी याच AGM मध्ये ‘रिलायन्स इंटेलिजन्स’ (Reliance Intelligence) या AI क्षेत्रातील महत्त्वाकांक्षा पूर्ण करणाऱ्या उपकंपनीची घोषणा केली होती, याच घोषणेनंतर आता हा संयुक्त उपक्रम औपचारिकरित्या अस्तित्वात आला आहे.
कमाईची संधी! 25 रुपयांपेक्षा कमी किमतीच्या ‘या’ शेअरने 5 वर्षांत 58000 टक्क्यांचा दिला परतावा!






