Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

50,000 कोटींच्या देशातील 8 हायस्पीड कॉरिडॉरला केंद्राची मान्यता; महाराष्ट्रात ‘हा’ कॉरिडॉर बांधला जाणार!

देशभरात 8 राष्ट्रीय हाय-स्पीड रोड कॉरिडॉर बांधले जाणार आहे. यामध्ये महाराष्ट्रातील 8 लेन एलिव्हेटेड नाशिक फाटा-खेड कॉरिडॉर देखील समावेश असून, या 8 हाय-स्पीड रोड कॉरिडॉरवर केंद्र सरकार तब्बल 50000 कोटी रुपये खर्च करणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक घडामोडींच्या मंत्रिमंडळ समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.

  • By गोरक्षनाथ ठाकरे
Updated On: Aug 02, 2024 | 10:11 PM
50,000 कोटींच्या देशातील 8 हायस्पीड कॉरिडॉरला केंद्राची मान्यता; महाराष्ट्रात 'हा' कॉरिडॉर बांधला जाणार!

50,000 कोटींच्या देशातील 8 हायस्पीड कॉरिडॉरला केंद्राची मान्यता; महाराष्ट्रात 'हा' कॉरिडॉर बांधला जाणार!

Follow Us
Close
Follow Us:

केंद्र सरकारने देशात 8 नवीन हायस्पीड रोड कॉरिडॉर बांधण्यास मान्यता दिली आहे. या 8 नवीन हायस्पीड रोड कॉरिडॉरवर केंद्र सरकार 50 हजार कोटी रुपयांहून अधिक खर्च करणार आहे. देशाच्या कानाकोपऱ्यात बांधण्यात येणाऱ्या या रस्त्यांमुळे लोकांचा वेळ तर वाचणार आहेच, शिवाय अनेक शहरांमधील अंतर देखील कमी होणार आहे. याशिवाय इंधनाची बचत होण्यासही मदत होणार आहे. आग्रा-ग्वाल्हेर, कानपूर-लखनऊ, खरगपूर-मोरेग्राम, रायपूर-रांची, अहमदाबाद, पुणे, नाशिक, अयोध्या आणि गुवाहाटी या ८ नवीन कॉरिडॉरचे बांधकाम होणार आहे.

आर्थिक घडामोडींच्या मंत्रिमंडळ समितीच्या बैठकीत निर्णय

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक घडामोडींच्या मंत्रिमंडळ समितीने शुक्रवारी (ता.२) या नवीन 8 कॉरिडॉरच्या बांधकामाला मंजुरी दिली आहे. या 8 हायस्पीड कॉरिडॉरची एकूण लांबी 936 किमी असणार आहे. विशेष म्हणजे 8 हायस्पीड कॉरिडॉर तयार करण्यासाठी केंद्र सरकारला 50,655 कोटी रुपये खर्च येणार आहेत. केंद्र सरकारने दावा केला आहे की, या रस्ते प्रकल्पांमुळे 4.42 कोटी दिवसांचा प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगारही निर्माण होणार आहे.

हेही वाचा : 2000 रुपयांच्या नोटा छपाईला किती खर्च आला होता? खुद्द अर्थमंत्र्यांनीच दिली संसदेत माहिती!

TRANSFORMATIVE boost to India’s infrastructure landscape! The Cabinet’s approval of 8️⃣ National High-Speed Road Corridor Projects at an expenditure of over Rs. 50,000 crore will have a MULTIPLIER EFFECT on our economic GROWTH and boost EMPLOYMENT opportunities. It also… pic.twitter.com/fim8aNP2Tr — Narendra Modi (@narendramodi) August 2, 2024


हे आहेत आठ हायस्पीड रोड कॉरिडॉर प्रकल्प

– 6 लेन आग्रा-ग्वाल्हेर नॅशनल हाय स्पीड कॉरिडॉर
– 4 लेन खारापूर-मोरेग्राम राष्ट्रीय हायस्पीड कॉरिडॉर
– 6 लेन थरड-दिशा-मेहसाणा-अहमदाबाद राष्ट्रीय हायस्पीड कॉरिडॉर
– 4 लेन अयोध्या रिंग रोड
– 4 लेन पाथळगाव आणि गुमला रायपूर-रांची नॅशनल हाय स्पीड कॉरिडॉर
– 6 लेन कानपूर रिंग रोड
– 4 लेन उत्तर गुवाहाटी बायपास आणि सध्याच्या गुवाहाटी बायपासचे रुंदीकरण
– 8 लेन एलिव्हेटेड नाशिक फाटा-खेड कॉरिडॉर

हेही वाचा : ‘या’ देशात प्रत्येक 7 वा व्यक्ती बनलाय करोडपती; वाचा… कसे बनताय तेथील लोक श्रीमंत!

आग्रा-ग्वाल्हेर कॉरिडॉरला 4,613 कोटी खर्च

आग्रा-ग्वाल्हेर या 88 किमी लांबीच्या ग्रीनफिल्ड कॉरिडॉरमध्ये 6 लेन असणार आहे. हा कॉरिडॉर बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा (बीओटी मॉडेल) या तत्वावर उभारला जाणार आहे. हा रस्ता तयार करण्यासाठी 4,613 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. श्रीनगर ते कन्याकुमारी महामार्गावर पडणाऱ्या या दोन शहरांदरम्यान बांधण्यात आलेल्या राष्ट्रीय महामार्गावर सध्या प्रचंड गर्दी होत आहे.

यामुळे या नवीन प्रकल्पामुळे आग्रा ते ग्वाल्हेरमधील अंतर सुमारे 7 टक्क्यांनी कमी होणार असून, प्रवासाचा वेळ सुमारे 50 टक्क्यांनी कमी होणार आहे. याच पद्धतीने सात अन्य कानपूर-लखनऊ, खरगपूर-मोरेग्राम, रायपूर-रांची, अहमदाबाद, पुणे, नाशिक, अयोध्या आणि गुवाहाटी कॉरिडॉरचे देखील बांधकाम होणार आहे.

Web Title: 50000 crore approval of 8 national high speed corridors in the country decision of the union cabinet

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 02, 2024 | 10:11 PM

Topics:  

  • narendra modi

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.