फोटो सौजन्य - Social Media
पुढील आठवडा शेअर बाजारासाठी फार महत्वाचा असणार आहे. या आठवड्यामध्ये गुंतवणूकदार फार व्यस्थ दिसून येणार आहेत. कारण पुढील आठवड्यात ७ IPO खुले केले जाणार आहेत. महत्वाची बाब म्हणजे याच आठवड्यात ६ IPO ची लिस्टिंग केली जाणार आहे. तर साऱ्यांचे लक्ष या दोन्ही कृतींकडे लागून असणार आहे.
Standard Glass Lining Technology IPO
फार्मा क्षेत्र तसेच केमिकल क्षेत्राला अभियांत्रिकी सामग्री पुरवणारी कंपनी स्टॅंडर्ड ग्लास लायनिंग टेक्नॉलॉजी पुढील आठवड्यात आपला IPO लाँच करत आहे. या IPO चा साईज ४१०.०५ कोटी आहे. हा IPO ६ जानेवारीपासून ८ जानेवारीपर्यंत खुला राहील. या IPO चा प्राईज बँड १३३ रुपयांपासून ते १४० रुपयांपर्यंत फिक्स केला गेला आहे.
Quadrant Future Tek IPO
क्वाड्रंट फ्युचर टेक IPO ७ जानेवारी २०२५ ते ९ जानेवारी २०२५ या तारखेपर्यंत खुला करण्यात येईल. या IPO साठी प्राईज ब्रँड २७५ रुपये ते २९० रुपये प्रति शेअर फिक्स केले गेले आहे.
Capital Infra Trust IPO
कॅपिटल इन्फ्रा ट्रस्ट IPO ७ जानेवारी २०२५ ते ९ जानेवारी २०२५ या तारखेपर्यंत खुला करण्यात येईल. या IPO साठी प्राईज ब्रँड ९९ रुपये ते १०० रुपये प्रति शेअर फिक्स केले गेले आहे.
Indobell Insulation IPO
इंडोबेल इन्सुलेशन IPO ६ जानेवारी रोजी खुला करण्यात येणार आहे. या IPO चा प्राईज बँड ४६ रुपये निश्चित करण्यात आले आहे. हा IPO जानेवारी पर्यंत खुला असणार आहे. या IPO च्या माध्यमातून कंपनीने १०.१४ कोटी जमवण्याचा निर्धार केला आहे.
B R Goyal Infrastructure IPO
बी आर गोयल इंफ्रान्स्ट्रक्चर IPO प्राईस ब्रँड १२८ रुपये ते १३५ रुपये निश्चित करण्यात आली आहे. कंपनीने ८५.२१ कोटी जमवण्याचे निश्चित केले आहे. हे IPO ७ जानेवारी ते ९ जानेवारीपर्यंत खुले राहणार आहे.
Delta Ortocorp IPO
डेल्टा ओरटोकॉर्प IPO हे IPO ७ जानेवारी रोजी खुले करण्यात येणार आहे. तर ९ जानेवारीपर्यंत हे IPO खुले ठेवण्यात येणार आहे. या IPO चे साईज ५४.६० कोटी निश्चित करण्यात आले आहे. तर प्राईज बँड १२३ रुपये ते १३० रुपयांदरम्यान ठेवण्यात आले आहे.
Avax Appreals and Ornaments IPO
Avax Appreals and Ornaments IPO हा IPO ७ जानेवारी ते ९ जानेवारी दरम्यान खुला करण्यात येईल. तसेच या IPO साठी प्राईज बँड ७० रुपये निश्चित करण्यात आले आहे.