बाजाराच्या घसरणीही सरकारी कंपनीचा शेअर्स तेजीत, महिनाभरात दिला 50 टक्के परतावा
शेअर बाजारात शुक्रवारी 3 जानेवारी राेजी माेठी घसरण झाली. सेन्सेक्स 720.60 अंकांनी घसरून 79,223.11 वर बंद झाला. मात्र, या माेठ्या घसरणीमध्ये अनेक शेअर्सने वाढ नाेंदवली. यामध्ये सरकारी कंपनीचाही एक शेअर्स आहे. या शेअर्सने तेजीसह नवीन उच्चांक गाठला आहे. सरकारी कंपनी आयटीआय लिमिटेडच्या शेअर्सने विक्रमी पातळी गाठली आहे. दूरसंचार विभागाच्या अंतर्गत असलेला हा शेअर्स 20 टक्के वाढून 457.25 रुपयांच्या नवीन सर्वकालीन उच्चांकावर पाेहाेचला. यासह कंपनीचे मार्केट कॅप 43,936.56 कोटी रुपये झाले. ऑक्टोबर 2024 पासून हा शेअर्स सतत वधारत आहे.
शेअर्सचा परतावा
आयटीआय लिमिटेडचे शेअर्स गेल्या एका वर्षात 37.3 टक्के वाढले आहे. तर मागील 6 महिन्यांत या शेअर्सने 38.5 टक्के परतावा दिला आहे. तर 3 महिन्यांत 66.5 टक्के आणि 1 महिन्यात 49.2 टक्के नफा गुंतवणूकदारांना मिळाला आहे. आयटीआय लिमिटेड ही दूरसंचार उपकरणांचे उत्पादन, व्यापार आणि सर्व्हिसिंग आणि इतर संबंधित आणि सहाय्यक सेवा प्रदान करते.
सेन्सेक्स-निफ्टी काेसळले
सेन्सेक्स शुक्रवारी 720.60 अंकांच्या घसरणीसह 79,223.11 अंकांवर बंद झाला. निफ्टीही 183.90 अंकांनी घसरून 24,004.75 वर बंद झाला. निफ्टीच्या 50 शेअर्सपैकी 32 शेअर्स घसरणीसह बंद झाले. विप्रो, एचडीएफसी बँक, टेक महिंद्रा, अदानी पोर्ट्स आणि सिप्ला यांचे शेअर्स सर्वाधिक घसरले. तर ओएनजीसी, टाटा मोटर्स, टायटन, नेस्ले इंडिया आणि एसबीआय लाईफचे शेअर्स वधारले.
ऐन थंडीत खाद्यतेलाचे भाव कडाडले; किलोमागे 25 रुपयांची वाढ
दरम्यान, बिगर बँकिंग वित्तीय कंपनी श्रीराम फायनान्स आपल्या शेअर्सचे विभाजन म्हणजेच स्टॉक स्प्लिट 5:1 च्या प्रमाणात करणार आहे. म्हणजे कंपनीचा एक शेअर 5 शेअरमध्ये विभागला जाईल. याची घाेषणा 25 ऑक्टोबर 2024 रोजी करण्यात आली आहे. स्टॉक स्प्लिटची रेकॉर्ड तारीख पुढील आठवड्यात आहे. एका वर्षात श्रीराम फायनान्सचा शेअर्स 46 टक्के आणि 2 वर्षांत 125 टक्के वाढला आहे. तर एका आठवड्यात शेअर्सने 5 टक्के नफा दिला आहे. सप्टेंबर 2024 अखेरपर्यंत प्रवर्तकांकडे श्रीराम फायनान्समध्ये 25.40 टक्के हिस्सा होता.
किती आहे रेकॉर्ड तारीख
कंपनी प्रथमच स्टॉक स्प्लिट करत आहे. स्टॉक स्प्लिटची रेकॉर्ड तारीख 10 जानेवारी 2025 आहे. श्रीराम फायनान्सचे शेअर्स शुक्रवार, 3 जानेवारी रोजी 3047.55 रुपयांवर बंद झाले. कंपनीचे मार्केट कॅप 1 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. या शेअर्सने 27 सप्टेंबर 2024 रोजी 52 आठवड्यांचा उच्चांक 3,652.15 रुपये नोंदवला होता. तर 4 जानेवारी 2024 रोजी 2,092.45 शेअर्सचा 52 आठवड्यांचा नीचांक तयार झाला होता.
कंपनीचा महसूल
जुलै-सप्टेंबर 2024 या तिमाहीत कंपनीचा स्वतंत्र महसूल 10,089.54 कोटी रुपये होता. तर स्टँडअलोन निव्वळ नफा 2,071.26 कोटी रुपये नोंदवला गेला. संपूर्ण आर्थिक वर्ष 2024 साठी स्टँडअलोन महसूल रुपये 34,964.41 कोटी आणि निव्वळ नफा 7,190.48 कोटी रुपये होता.