Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 4 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

होणार 3 लाखांचं नुकसान? 8th Pay Commission लागू होण्यास उशीर झाला तर बसणार फटका; पण कसा? जाणून घ्या

8th Pay Commission Delay Impact : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाच्या असणाऱ्या 8th Pay Commission च्या अंमलबजावणीस विलंब झाल्यास कर्मचाऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. वेतन आयोगाच्या शिफारशी लागू होण्यास उशीर झाल्यास वाढीव वेतन आणि थकबाकीत तब्बल ३ लाख रुपयांपर्यंतचा फटका बसू शकतो.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Oct 04, 2026 | 06:43 PM
8th Pay Commission लागू होण्यास उशीर झाला तर बसणार फटका ( सौजन्य - सोशल मीडिया )

8th Pay Commission लागू होण्यास उशीर झाला तर बसणार फटका ( सौजन्य - सोशल मीडिया )

Follow Us
Follow Us:
  • होणार 3 लाखांचं नुकसान?
  • 8th Pay Commission लागू होण्यास उशीर झाला तर बसणार फटका
  • काय आहे नेमकं गणित? जाणून घ्या
8th Pay Commission Delay Impact : 8th Pay Commission च्या अंमलबजावणीची सगळे आतुरतेने वाट पाहत आहेत. पण आतापर्यंत आयोग केवळ कर्मचाऱ्यांच्या चिंता जाणून घेण्यासाठी प्रतिनिधी आणि हितधारकांशी बैठका घेत आहे. पण, अंतिम अहवाल कधी तयार होईल याबद्दल अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. मात्र, काही तज्ञांच्या मते, हा अहवाल पुढील वर्षी मे महिन्यानंतर सादर केला जाऊ शकतो आणि त्यानंतर सरकार निर्णय घेईल असा अंदाज आहे. पण जर उशीर झाला तर त्याचा फटका कर्माचाऱ्यांना बसणार असा प्रश्न उपस्थित होत आहे पण कसा काय? काय आहेत समीकरणं? ( 8th Pay Commission Delay Impact ) 

अमेरिकन शेअर बाजारात मोठा बदल? दिवसाचे 23 तास तर आठवड्याचे 5 दिवस; US Stock Market रात्रीही सुरूच

एका अहवालानुसार, याच्या अंमलबजावणीस विलंब झाल्यास Level-7 कर्मचाऱ्यांना अंदाजे ३ लाख रुपयांचे नुकसान होऊ शकते. हे कसे ते समजून घेऊया

विलंबामुळे नुकसान कसे होईल?

जर सगळ्याचा विचार केला तर अशी चर्चा आहे की आठवा वेतन आयोग १ जानेवारी २०२६ पासून लागू होईल. अशा परिस्थितीत, केंद्रीय कर्मचारी मोठ्या प्रमाणात थकबाकी मिळण्यास पात्र असतील. काही तज्ञांच्या मते, ही थकबाकी सुधारित मूळ वेतन आणि आधीच मिळालेल्या मूळ वेतनातील फरकाच्या आधारावर मोजली जाऊ शकते.
दरम्यान, आठव्या वेतन आयोगाअंतर्गत घरभाडे भत्त्यासारखे HRA भत्ते थकबाकी म्हणून दिले जाणार नाहीत. त्यामुळे इथेच नुकसानीची शक्यता निर्माण होते. जर अंमलबजावणीला बराच वेळ लागला आणि त्या कालावधीसाठी घरभाडे भत्त्यासारख्या भत्त्यांची थकबाकी दिली गेली नाही, तर कर्मचाऱ्यांना मोठे नुकसान होऊ शकते.

Level-7 कर्मचाऱ्यांचे संभाव्य नुकसान

स्तर-७ कर्मचाऱ्यांचे होणारे नुकसान लक्षात घेता, त्यांचा सध्याचा मूळ पगार ₹४४,९०० आहे. जर ८ व्या वेतन आयोगाने २.१ चा फिटमेंट फॅक्टर लागू केला, तर मूळ पगार अंदाजे ₹९४,२९० होईल. आता, ₹४४,९०० च्या सध्याच्या मूळ पगारावर २४% दराने घरभाडे भत्ता (HRA) ₹१०,७७६ आहे. २.१ च्या अंदाजित फिटमेंट फॅक्टरनुसार, या आधारावर घरभाडे भत्ता अंदाजे ₹२२,६३० आहे, ज्यामुळे मासिक फरक अंदाजे ₹११,८५४ होईल.

पण विलंबामुळे नुकसान कसे होईल?

जर सरकारने जानेवारी २०२८ पर्यंत ८ वा वेतन आयोग लागू केला, तर कर्मचाऱ्यांना त्यांच्या मूळ पगारावरील थकबाकी दिली जाऊ शकते, परंतु वर दिलेल्या गणनेनुसार त्यांना घरभाडे भत्त्यामध्ये (HRA) नुकसान होऊ शकते. याचा अर्थ असा की, लेव्हल ७ कर्मचाऱ्याला दरमहा घरभाडे भत्त्यामध्ये (HRA) ११,८५४ रुपयांचे नुकसान होऊ शकते. जर ही अंमलबजावणी जानेवारी २०२८ मध्ये झाली, म्हणजेच २५ महिन्यांचा विलंब झाला, तर कर्मचाऱ्याला २,९६,३५० रुपयांचे नुकसान होऊ शकते.

Plastic Currency आणण्याची तयारी वेगात! RBI चा मोठा प्लॅन; ‘या’ 2 मोठ्या कंपन्यांची एन्ट्री

Web Title: 8th pay commission delay causes 3 lakh rupees salary loss calculation ak

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 04, 2026 | 06:43 PM

Topics:  

  • 8th pay commission

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.